आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
 • Marathi News
 • Dvm originals
 • Digital University Vs Nirmala Sitharaman Budget Digital University To Open In The Country |Marathi News

दिव्य मराठी एक्सप्लेनर:देशात उघडणार डिजिटल विद्यापीठ, जाणून घ्या हे काय आहे? घरी बसून विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण कसे मिळणार

अभिषेक पाण्डेय4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी 2022 च्या अर्थसंकल्पात देशात डिजिटल युनिव्हर्सिटी स्थापन करण्याची घोषणा केली आहे. डिजिटल युनिव्हर्सिटीची घोषणा करताना सीतारामन म्हणाल्या की, याचे निर्माण हब अँड स्पोक मॉडेलच्या आधारे तयार केले जाईल. कोरोना महामारीच्या काळात शिक्षणावर झालेल्या परिणामाचा संदर्भ देत त्यांनी डिजिटल विद्यापीठाची घोषणा केली.

जाणून घ्या, डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय? त्याचे फायदे काय आहेत? देशात आणि जगात डिजिटल विद्यापीठे कुठे आहेत?

देशात बनणार डिजिटल युनिव्हर्सिटी
देशभरातील विद्यार्थ्यांना त्यांच्या घरात जागतिक दर्जाचे शिक्षण देण्यासाठी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी डिजिटल विद्यापीठाच्या निर्मितीची घोषणा केली.

 • अर्थमंत्र्यांनी सांगितले की डिजिटल विद्यापीठाची स्थापना इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन्स टेक्नॉलॉजी (ICT) स्वरूपावर केली जाईल, जे हब अँड स्पोक मॉडेल नेटवर्कवर काम करेल.
 • डिजिटल विद्यापीठांच्या माध्यमातून देशातील विविध भाषांमध्ये शिक्षण उपलब्ध करून दिले जाईल, असे अर्थमंत्र्यांनी सांगितले.
 • डिजिटल विद्यापीठाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (ISTE) च्या मानकांवर जागतिक दर्जाचे शिक्षण दिले जाईल.
 • देशातील सर्वोच्च केंद्रीय विद्यापीठांच्या सहकार्याने डिजिटल विद्यापीठाची उभारणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

डिजिटल विद्यापीठ म्हणजे काय?

 • डिजिटल विद्यापीठ हे एक असे विद्यापीठ आहे जे विद्यार्थ्यांना विविध अभ्यासक्रम आणि पदवी शिक्षण पूर्णपणे ऑनलाइन प्रदान करते.
 • डिजिटल विद्यापीठ आवश्यक डिजिटल पायाभूत सुविधा आणि प्रशिक्षण देण्यासाठी देशातील इतर केंद्रीय विद्यापीठांशी जवळून काम करेल.
 • डिजिटल विद्यापीठात कोणत्या प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातील, हे अद्याप अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केलेले नाही.
 • यामध्ये तंत्रशिक्षणासह अनेक अभ्यासक्रम ऑनलाइन शिकवले जाऊ शकतात, असे मानले जात आहे.
 • याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे देशातील दुर्गम भागातील विद्यार्थ्यांनाही जागतिक दर्जाचे शिक्षण घेता येणार आहे.
 • देशातील आघाडीच्या विद्यापीठांना डिजिटल विद्यापीठात जोडण्याची योजना आहे, यामुळे विद्यार्थ्यांना एकाच व्यासपीठाद्वारे अनेक उच्च विद्यापीठांमधून अभ्यासक्रम करण्याची संधी मिळणार आहे.
 • डिजिटल विद्यापीठामुळे कोणत्याही विद्यार्थ्याला कोणत्याही शहरात न जाता त्या शहरातील अव्वल विद्यापीठात शिक्षण घेण्याचे स्वप्न पूर्ण करता येणार आहे.
 • आता प्रश्न असा आहे की, देशात आधीच अस्तित्वात असलेल्या इंदिरा गांधी नॅशनल ओपन युनिव्हर्सिटी (IGNOU) किंवा सिक्कीम मणिपाल युनिव्हर्सिटी यांसारख्या दूरस्थ शिक्षणाची सुविधा देणाऱ्या संस्था आणि डिजिटल विद्यापीठांमध्ये काय फरक आहे?
 • वास्तविक, डिस्टन्स लर्निंग किंवा दूरस्थ शिक्षण देणाऱ्या संस्था ऑनलाइन वर्ग चालवत नाहीत, त्याऐवजी ते संबंधित अभ्यासक्रमाचे अभ्यास साहित्य विद्यार्थ्याला त्यांच्या घरी पोस्टाद्वारे पाठवतात. त्याचबरोबर डिजिटल लर्निंग किंवा डिजिटल युनिव्हर्सिटीमधून विद्यार्थी घरी बसून ऑनलाइन अभ्यास करू शकतील.
 • डिजिटल युनिव्हर्सिटीचे कॅम्पस असते, जिथे शिक्षक आणि कर्मचारी असतात. या कॅम्पसच्या माध्यमातून विविध अभ्यासक्रमांचे ऑनलाइन शिक्षण विविध ठिकाणी उपस्थित विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते.

हब अँड स्पोक मॉडेल नेटवर्क म्हणजे काय?
प्रस्तावित डिजिटल विद्यापीठ हब अँड स्पोक मॉडेल नेटवर्कवर स्थापन करण्याची सरकारची योजना आहे.

 • हब-अँड-स्पोक मॉडेल हे असे डिस्ट्रिब्यूशन मॉडेल आहे, ज्यामध्ये प्रत्येक गोष्ट एका सेंट्रलाइज्ड 'हब' मधून उगम पावते आणि नंतर अंतिम उपभोगासाठी लहान जागा, म्हणजे 'स्पोक्स' पर्यंत प्रवास करते.
 • डिजिटल युनिव्हर्सिटीच्या संदर्भात हब अँड स्पोक मॉडेल पाहिल्यास, एका कॅम्पस म्हणजे 'हब' मधून शिक्षण वितरित केले जाईल, आणि देशाच्या विविध प्रदेशांमध्ये उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना म्हणजेच 'स्पोक' पर्यंत डिस्ट्रिब्युट होईल.
 • सोप्या शब्दात सांगायचे तर हब अँड स्पोक मॉडेलचा अर्थ असा आहे की तुम्ही एक संदेश (हब) तयार केले आणि नंतर ते ट्विटर, फेसबुक, इंस्टाग्राम सारख्या वेगवेगळ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर (स्पोक) शेअर केले.

देशात पहिलेच सुरु झाले आहे डिजिटल विद्यापीठ

 • देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ फेब्रुवारी २०२१ मध्ये केरळमध्ये उघडले आहे. केरळातील टेक्नोसिटीमध्ये देशातील पहिले डिजिटल विद्यापीठ स्थापन करण्यात आले आहे.
 • केरळमधील डिजिटल विद्यापीठाची स्थापना दोन दशके जुनी भारतीय माहिती तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन संस्था केरळ (IIITM-K) मध्ये अपग्रेड करून करण्यात आली आहे.
 • केरळचे डिजिटल विद्यापीठ विविध डिजिटल तंत्रज्ञान क्षेत्रात पदव्युत्तर कार्यक्रम आणि संशोधन अभ्यासक्रम देते.
 • हे विद्यापीठ कॉम्प्युटर सायन्स, इंफॉर्मेटिक्स, अप्लाइड इलेक्ट्रॉनिक्स आणि ह्युमॅनिटीज तसेच आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, ब्लॉकचेन, सायबर सिक्युरिटी, डेटा अॅनालिटिक्स यासह इतर उद्योग-आधारित अभ्यासक्रम उपलब्ध करते.
 • राजस्थानमधील जोधपूर येथे देशातील दुसरे डिजिटल विद्यापीठ स्थापन होत आहे. जोधपूर डिजिटल युनिव्हर्सिटी 30 एकर परिसरात सुमारे 400 कोटी रुपये खर्चून बांधली जात आहे.
 • जोधपूर डिजिटल युनिव्हर्सिटीमध्ये ट्विन टॉवर्सच्या आकारात बनवल्या जाणार्‍या कॅम्पसमध्ये खिडक्यांऐवजी विंडोज मॅट्रिक्स दिसेल.

जगातील अनेक विद्यापीठे डिजिटल पदवी प्रदान करत आहेत
संपूर्णपणे डिजिटल विद्यापीठ म्हणून काम करण्यासाठी जगात कोणतेही विद्यापीठ नाही. जगातील अनेक टॉप विद्यापीठे ऑनलाइन पदवी देतात. यासोबतच ही विद्यापीठे कॅम्पसमध्ये ऑफलाइन शिक्षणासह ऑनलाइन शिक्षण देखील प्रदान करतात.

उदाहरणार्थ, लंडन विद्यापीठ 20 ऑनलाइन पदवी प्रदान करते, तर एडिनबर्ग विद्यापीठ 66 आणि जॉन हॉपकिन्स विद्यापीठ 88 ऑनलाइन पदवी ऑफर करते. यासोबतच ही सर्व विद्यापीठे कॅम्पस एज्युकेशन किंवा ऑफ-लाइन पदवी देखील देतात.

बातम्या आणखी आहेत...