आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Director Ashish Ningurkar's 'Rules', 'Locked', 'Sankraman' Short Films Appreciated In Film Festivals

दिव्य मराठी विशेष:भारताच्या कोरोना लघुपटांचा झेंडा सातासमुद्रापार, दिग्दर्शक आशिष निनगुरकर यांच्या "नियम’, कुलूपबंद’, ‘संक्रमण’ लघुपटांचे कौतुक

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोर्ट ब्लेअर, सिंगापूर आणि इंडोनेशिया येथील फेस्टिव्हलमध्येही प्रदर्शन

देशासह जगभरात कोरोनाने उद्रेक घातला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाबाबत जनजागृती करण्यासाठी तीन लघुपटांची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. पोर्ट ब्लेअर, सिंगापूर आणि इंडोनेशिया येथील फेस्टिव्हलमध्ये आशिष निनगुरकर लिखित - दिग्दर्शित लघुपटांनी वाहवा मिळवली आहे.

आशिषने घरात राहून ‘कोरोना’ विषयक सामाजिक संदेश देणाऱ्या “नियम’, “कुलूपबंद’ व ‘संक्रमण’ या लघुपटांची निर्मिती केली होती. अत्यंत कमी वेळेत उत्कृष्ट सामाजिक संदेश देणाऱ्या या लघुपटांची नोंद याअगोदर कॅनडाच्या “वर्ल्ड ग्लोब’ या संस्थेने घेतली होती व त्याचा अनोखा प्रीमियर टोरंटोमध्ये पार पडला होता. अनेक फेस्टिव्हलमध्ये दखल व पुरस्कारप्राप्त कोरोनाविषयक जनजागृती करणाऱ्या लघुपटांना आता पोर्ट ब्लेयर, सिंगापूर व इंडोनेशिया येथील फेस्टिव्हलमध्ये दाद मिळाली आहे.

ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शनाचीदेखील संधी मिळाली असून त्यालादेखील उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आशिष स्वतःच लेखक असल्याने त्याने या तिन्ही लघुपटांची मांडणी अत्यंत नेटकी केली असून योग्य आशय उत्तमरीत्या मांडला आहे. ‘नियम’, ‘कुलूपबंद’ आणि ‘संक्रमण’ या लघुपटांची निर्मिती काव्या ड्रीम मूव्हीजअंतर्गत किरण निनगुरकर यांनी केली असून या लघुपटांमध्ये अशोक निनगुरकर, जयश्री निनगुरकर, स्वरूप कासार, अनुराग निनगुरकर, प्रदीप कडू, प्रतिश सोनवणे, विजय कांबळे, सुमेध गायकवाड, सुनील जाधव व सिद्धेश दळवी यांनी भूमिका साकारल्या आहेत. एकूणच निनगुरकर यांच्या या लघुपटाला मिळालेल्या यशाचे चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकारांनी कौतुक केल आहे. यापुढेही चित्रपट व लघुपट तयार करू, असेही त्यांनी सांगितले.

असा आहे संदेश
“एकत्र येण्याची नको घाई, पुन्हा हा जन्म नाही’, ‘नियम पाळा, कोरोना टाळा’ व बाहेरच्या जिल्ह्यातून घरी आल्यावर ‘क्वॉरंटाइन’ म्हणून ‘नियम’ पाळणे बंधनकारक आहे. साखळी तोडण्यासाठी “फिजिकल डिस्टन्स’ ठेवून सगळ्यांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असा संदेश या लघुपटांमधून देण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...