आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

करिअर फंडा:शालेय शिस्तीचा आधुनिक अर्थ अन् शिस्त राखण्याचे 8 मार्ग

शिक्षणतज्ज्ञ संदीप मानुधने3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिस्तीचे पालन तेव्हाच शक्य आहे, जेव्हा मनुष्याला तो करत असलेल्या कामाची आवड असेल. त्याशिवाय शिस्त हे केवळ अनुकरण ठरेल -महात्मा गांधी

करिअर फंडात स्वागत!

शिस्त म्हणजे काय?

डिसिप्लिन म्हणजे ते करणे, जे करण्याची गरज आहे. मग भलेही तुमची ती करण्याची इच्छाही का नसेना. तुम्ही स्वतः शिस्त पाळली नाही तर जगही तुमच्याशी तसाच व्यवहार करेल. शाळेची शिस्त म्हणजे आचारसंहिता. ती शाळेची व्यवस्था व स्टडी पॅटर्नमध्ये अडथळा निर्माण झाल्यानंतर शिक्षक किंवा शाळेकडून लागू केली जाते.

शाळेत शिस्त का?

वर्गातील शिस्त विद्यार्थ्यांना शिक्षणावर लक्ष केंद्रीत करण्यास मदत करते. कालानुरुप ती त्यांना अन्य पद्धतीने लक्ष केंद्रीत करणे शिकवते. एक शिस्तप्रिय विद्यार्थी आपल्या लक्षावर फोकस करुन आपल्या कामाला प्राधान्य देण्यास सक्षम असतो. त्याचे लाइफ-लाँग फळे मिळतात. पण सोशल मीडिया व इंटरनेटच्या युगात शिक्षकांना शिस्त लागू करण्यात अडचणी येत आहेत.

शालेय शिस्तीचा अर्थ

आज शिक्षणाचे उद्दीष्ट विद्यार्थ्यांत 'गुड सिटीझनशिप' व चांगल्या सामाजिक व्यवहाराची भावना तयार करण्याचे आहे. तर शालेय शिस्तीचा अर्थ अंतर्गत व बाह्य शिस्त आहे. यामुळे शारीरीक, मानसिक, सामाजिक व नैतिक मूल्यांचा विकास होतो. अर्थात स्व-नियंत्रण व स्व-नियमन.

शिस्तीचा इतिहास

19 व्या शतकात आधुनिक शिक्षण पद्धती लागू झाली. शिक्षकांची एकतर्फी शिस्त विद्यार्थ्यांना पूर्णपणे दाबून टाकत होती. यामुळे केव्हा मार मिळेल या भीतीने विद्यार्थी कायम घाबरलेले व दहशतीत राहत होते. सुप्रसिद्ध रॉक बँड "पिंक फ्लॉयड"च्या रॉजर वॉटर्स यांची रचना "अनादर ब्रिक इन द वॉल"ने (वी डोंट नीड नो एज्युकेशन) खळबळ माजवली. या गीताच्या माध्यमातून त्यांनी शिस्तीच्या नावाखाली करण्यात येणाऱ्या क्रूरतेवर प्रकाश टाकला. त्यानंतर हळूहळू शाळा व महाविद्यालयांनी स्वतःच्या शिस्तीला थोडीशी मुरड घातली.

मला आठवते की, शाळेत आम्हाला खूप मार खावा लागायचा, काही शिक्षक हातात छडी घेऊन चालत होते. त्यावेळी ही सर्वसामान्य गोष्ट होती. पण समाज बदलला, आता शारीरीक शिक्षा जवळपास शून्य झाली आहे.

शालेय शिस्तीचा आधुनिक अर्थ

शिस्त आताही शिक्षणाचा एक महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. पण चांगल्या शाळांत आता शिक्षा दिली जात नाही. तर विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला जातो. विद्यार्थ्यांना वैयक्तिक जबाबदारीची जाणीव करून दिली जाते. काय करावे याहून पुढे जात हे का केले जावे किंवा आपण हे कसे करणार आहोत ही भावना वाढली आहे.

आधुनिक शिस्तीची मुख्य चिंता म्हणजे मुलाची मानसिक स्थिती, आदेशांचे पालन न करणे. असे गृहीत धरले जाते की, मुले जलद वाढीच्या काळात आहेत. मॉडर्न डिसिप्लिन असे मानते की, व्यवहाराची जबाबदारी हळूहळू स्वतः विद्यार्थ्यांवर हस्तांतरित करणे आवश्यक आहे. आधुनिक शिस्तीचे कार्य एकप्रकारे आचरण सुरक्षित करण्याचे आहे. यामुळे मुलामध्ये उत्तम चारित्र्य आणि व्यक्तिमत्व विकसित होईल.

शाळांसाठी 8 पॉवरफुल टिप्स
1 - वर्गात सोशल मीडियाच्या वापरावर बंदी घाला.
2 - विद्यार्थ्यांना मित्र बनवा, पण मर्यादा केव्हाही ओलांडू नका.
3 - मन जिंकण्यासाठी शिस्त सहजपणे लागू करता येते.
4 - अपराधीपणाऐवजी जिवंत उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रेरित करा.
5 - मुलांना लेबल चिकटवू नका की, "रोहित तर बदमाश आहे", "प्रीति तर नालायक आहे."
6 - विद्यार्थ्यांना प्रश्न विचारण्यासाठी कधीही दरडावू नका. उत्तर आले नाही तर त्याचा स्वीकार करा.
7 - शाळा व्यवस्थापनाने शिक्षेच्या पद्धती आणि ग्रेड आधीच लेखी निश्चित करावेत.
8 - स्मार्टक्लास, प्रोजेक्टर, स्मार्ट-बोर्ड हे केवळ टूल्स आहेत, एज्युकेशन नाही. शिक्षकच सर्वात ताकदवान फोर्स आहेत. हे लक्षात घ्या.

या पद्धतींचे फायदे

आजचे विद्यार्थी सहजपणे इंटरनेटवर सहजपणे सर्वच प्रकारची माहिती, व्हिडिओ व शिक्षणाच्या टूल्सपर्यंत पोहोचतात. त्यामुळे काही बाबतींत त्यांना शिक्षकांपेक्षा जास्त फॅक्ट माहिती असण्याची शक्यता असते. ही काही शरमेची किंवा स्पर्धेची गोष्ट नाही. हे केवळ आजचे वास्तव आहे. हे मान्य करा. वर सांगण्यात आलेल्या 8 टिप्सचा वापर करुन, तुम्ही मैत्रीपूर्ण मार्गाने नवे नातेसंबंध तयार करू शकता.

तर आजचा करिअर फंडा हा आहे की, 'बदललेल्या जगात शिक्षकांनी आधुनिक पद्धतीने शिस्त लागू करावी, अन्यथा लर्निंग आउटकम वाईट येईल.'

करून दाखवूया.

बातम्या आणखी आहेत...