आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आठ वर्षीय वृंदा जैनने मेट्रो शहरांच्या रस्त्यांवर रुग्णवाहिकांना मार्ग दाखवण्यास मदत करणारे अॅप तयार केले. १० वर्षांच्या गर्वित सूदने डोळे तपासणी करणारे दृष्टी अॅप बनवले आहे. पार्किंगशी संबंधित तंत्रज्ञान असो की आरोग्याशी संबंधित अॅप, व्हाइट हॅट ज्युनियर या ऑनलाइन कोडिंग क्लासची ६ ते १८ वर्षांची मुले उत्कृष्ट काम करत आहेत. अलीकडेच अमेरिका व भारताच्या २६ मुलांनी व्हाइट हॅट ज्युनियर सिलिकॉन व्हॅली चॅलेंजमध्ये भाग घेतला. ऑगस्टमध्ये बायजूने व्हाइट हॅट ज्युनियरचे अधिग्रहण केले. ‘दैनिक भास्कर’चे शादाब समी यांनी कंपनीचे संस्थापक आणि सीईओ करण बजाज यांच्याशी चर्चा केली.
मुलांना कोडिंग शिकवण्याची कल्पना तुम्हाला कशी सुचली ?
मला दोन मुली आहेत. माझ्या मुलींनी काही नवे बनवावे अशी माझी इच्छा आहे. जे क्रिएटिव्ह असतात त्यांचे जीवन व्यग्र असते. मी कादंबरी लिहिण्यास सुरुवात केली त्यामुळे आयुष्य बदलले. मी काही करेन असे वाटल्याने ते सुरू केले. आज कोडिंग असेच नव्या गोष्टी बनवण्याचे माध्यम आहे. उदा. औद्योगिक क्रांतीच्या वेळी गणिताचा ट्रेंड सुरू झाला, ती एक भाषा बनली. तशीच आज काही बनवण्याची बनवण्याची भाषा कोडिंग आहे. मी मुलांना त्यासाठी तयार करू इच्छितो.
तुमच्यासोबत किती मुले आणि शिक्षक आहेत?
आमचे ११ हजार शिक्षक आहेत. आतापर्यंत सुमारे १८ महिन्यांत ५० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. दीड लाख मुलांनी रक्कम भरली आहे. ते भारत, अमेरिका, ब्रिटन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलियासारख्या देशांतीलही आहेत. रोज ४० हजार वर्ग होतात.
व्हाइट हॅट ज्युनियरमध्ये महिलाच शिकवतात?
होय, आमच्याकडे शिकवण्यासाठी सर्व महिलाच आहेत. त्या आमच्याकडे येण्याआधी वर्कफोर्सचा भाग नव्हत्या. त्या खूप शिकलेल्या आहेत, बुद्धिवंत आहेत, पण कुठे नोकरी करत नव्हत्या. काही कारणास्तव नोकरीसाठी बाहेर जाण्यास सक्षम नव्हत्या. आम्ही अशाच महिलांना संधी दिली.
फक्त शिक्षिकाच का ?
माझे वडील लष्करी अधिकारी होते. आई दिल्ली विद्यापीठाची टॉपर होती. पण वडिलांची वारंवार बदली होत असल्याने आईचे करिअर घडू शकले नाही. बुद्धिमान असूनही करिअर न घडवू शकणाऱ्या अशा लाखो महिला देशात असतील असे वाटले. त्यामुळे अशाच महिलांना शिकवण्यासाठी घेण्याचे मी ठरवले. त्यांना संधी देण्याची माझ्यासारख्या आंत्रप्रेन्योरची जबाबदारी आहे.
एवढ्या लहान मुलांनी कोडिंग का शिकावे ?
मुलांची ‘पीक क्रिएटिव्हिटी’ वयाच्या ५-६ वर्षांतच असते असे एक आंतरराष्ट्रीय संशोधन आहे. त्यानंतर दर १० वर्षांनी त्याची क्रिएटिव्हिटी अर्धी होत राहते. त्यामुळे कोडिंगसारखी क्रिएटिव्हिटी मुले बालपणीच शिकली तर त्यांची क्रिएटिव्हिटी कायम राहण्याची शक्यता आहे.
हे मुलांवर ओझे असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे?
जगात नवीन गोष्ट आली की तिला विरोध होतोच. पण कोडिंगचा अनुभव घेत असलेल्या मुलांनाच आपण विचारायला हवे. मुलगा स्वत: एक रॉकेट बनवतो तेव्हा त्याला किती आनंद मिळत असेल याची कल्पना करा. तो शिकत असतो. आठवड्यात फक्त दोन वर्ग असतात. त्यामुळे हे ओझे नाही. १८-२० महिन्यांतच आम्ही बायजूनंतर देशातील दुसरी सर्वात मोठी एज्युटेक कंपनी झालो आहोत. मुलांना आवडले नसते तर हे शक्यच नव्हते.
मुलांसाठी हे भविष्यात कसे फायदेशीर आहे?
नवे आणि क्रिएटिव्ह शिकण्यासोबतच त्याचा मोठा फायदा म्हणजे मुलांना तंत्रज्ञान समजते. जी मुले सध्या शिकत आहेत त्यांची भावना अशी आहे की, भविष्यात मी स्वत: माझ्यासाठी काही तयार करेन.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.