आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:सोशल मीडियामुळे पती-पत्नींमध्ये डिस्टन्सिंग, लाॅकडाऊन काळात फेसबुक-व्हाॅट्सअॅपमुळे गृहकलह

अहमदनगर (अरुण नवथर)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घटस्फोटाची वेळच येऊ नये, याच उद्देशाने पोलिस प्रशासनातर्फे राज्यभर “दिलासा’ सेल काम करत आहे

व्हाॅट्सअॅप तसेच फेसबुकवरून चोरून-लपून मित्र-मैत्रिणींशी चॅटिंग करणाऱ्या अनेक नवरा-बायकांची चोरी लॉकडाऊन काळात एकमेकांकडून पकडली गेली. त्यानंतर सुरू झालेले नवरा- बायकोचे भांडण थेट पोलिसांच्या ‘दिलासा सेल’पर्यंत येऊन पोहोचले आहे. सोशल मीडिया चॅटिंगसह वेगवेगळ्या कारणांनी भांडलेल्या अशा ११३ नवरा-बायकांनी एकमेकांच्या विरोधात दिलासाकडे तक्रार अर्ज दाखल केले आहेत. विशेष म्हणजे लॉकडाऊन शिथिल झाल्यापासून दररोज असे १० ते १५ तक्रार अर्ज दाखल होत असल्याने दिलासा 

एकमेकांवरील विश्वास महत्त्वाचा

मोबाइलचा अतिवापर, चारित्र्यावर संशय, दारूचे व्यसन, माहेरच्या लोकांचा हस्तक्षेप, तसेच विभक्त राहण्याची इच्छा ही संसार विस्कटण्याची प्रमुख कारणे आहेत. एकमेकांवरील विश्वास संसारासाठी महत्त्वाचा आहे. - जे. एन. काळे, पीएसआय, प्रमुख, दिलासा सेल.

विस्कटलेल्या संसारासाठी राज्यभर ‘दिलासा’

एकमेकांविरुद्ध गुन्हे दाखल करून अनेक संसार थेट घटस्फोटापर्यंत पोहचतात. घटस्फोटाची वेळच येऊ नये, याच उद्देशाने पोलिस प्रशासनातर्फे राज्यभर “दिलासा’ सेल काम करत आहे.

> 40% अर्ज उच्चशिक्षित नवरा बायकोचे

> 13 सरासरी दररोजच्या तक्रार अर्जांचा ओघ

> 20 टक्के अर्ज अशिक्षित नवरा-बायकोचे

> 40 टक्के अर्ज कमी शिक्षित नवरा बायकोचे

> 113 तक्रार अर्ज १५ दिवसांत दाखल

> 32 तक्रार अर्ज समुपदेशनाने निकाली

बातम्या आणखी आहेत...