आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी इम्पॅक्ट:काेराेना चाचणी आता 2200 रुपयांत, देशात सर्वात स्वस्त; दिव्य मराठीच्या स्टिंग आॅपरेशननंतर निर्णय

नाशिक (भूषण महाले)10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • खासगी लॅब आकारत होत्या 4500 पेक्षा जास्त शुल्क

काेविड-१९ अर्थात काेेराेना निदान चाचणीच्या दरात महाराष्ट्र सरकारने थेट निम्म्याने कपात केली आहे. आता कोरोना चाचणीसाठी जास्तीत जास्त २२०० रुपयांपर्यंत शुल्क आकारले जाईल. रुग्णाच्या घरी जाऊन स्वॅब घेतल्यास त्यासाठी २८०० रुपये आकारणी हाेणार आहे. यापूर्वी खासगी लॅबकडून ३,००० ते ४,५०० रुपयांपर्यंत शुल्क घेतले जात होते.

दैनिक दिव्य मराठीने स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून कोरोना चाचण्यांच्या सुरू असलेल्या या बाजाराचा पर्दाफाश केला होता. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टाेपे यांनी अवघ्या १३ दिवसांत तज्ज्ञांची समिती नेमून अहवाल घेत काेराेना चाचणीचे दर निम्म्याहून अधिक घटवले. पूर्वी साडेचार हजार रुपयांत हाेणाऱ्या काेराेना चाचणीचे ‘अपर लिमिट’ आता २२०० रुपये इतके करण्यात आले आहे.

दिव्य मराठीच्या स्टिंग आॅपरेशननंतर निर्णय

1 ‘दिव्य मराठी’ने २ जूनच्या अंकात ‘काेराेना चाचणीचा खासगी बाजार’ या मथळ्याखाली स्टिंग आॅपरेशन करून खासगी लॅबकडून चाचण्यांसाठी कशा पद्धतीने दर आकारणीची मनमानी केली जाते याचा भंडाफाेड केला हाेता. या वृत्तानंतर सरकारला जाग आली.

2 एका चाचणीसाठी ४,५०० रुपयांपेक्षा जास्त शुल्क घेऊ नये, असे केंद्राने म्हटले होते. त्या वेळी चाचणीचे किट हे परदेशातून येत असल्यामुळे चाचणीचा दर अधिक हाेता.

3 काही लॅब २ हजारांपर्यंत चाचणी करून देण्यास तयार असल्यामुळे दर तफावत व कमिशनखाेरीवर प्रश्न उपस्थित केल्यानंतर आराेग्यमंत्री टाेपे यांनी गंभीर दखल घेतली हाेती.

4 टाेपे यांच्या आदेशानुसार आरोग्य विभागाने चार सदस्यीय समिती नेमली. समितीने शासनाला अहवाल सादर केला असून त्यांच्या शिफारशीनुसार नवे दर निश्चित झाले आहेत.

सर्वात कमी दर निश्चित करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य : टोपे

‘दिव्य मराठी’शी बाेलताना टाेपे यांनी जिल्हाधिकारी व पालिका आयुक्तांना अधिकार देऊन खासगी लॅबशी स्थानिक पातळीवर चर्चा करून काेराेना प्रतिचाचणीचे दर १७०० ते १८०० रुपयांपर्यंत आणण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट केले. ‘दिव्य मराठी’च्या दणक्यानंतर काेराेना चाचणीसाठी सर्वात कमी दर निश्चित करणारे महाराष्ट्र हे एकमेव राज्य ठरणार आहे.

निर्धारित दरापेक्षा जास्त शुल्क घेतल्यास कारवाई करणार

हातात कमी दिवस असताना विषयाचे गांभीर्य लक्षात घेत समितीने दर कमी केले. दर कमी करताना प्रतिचाचणीसाठी लागणारे मटेरियल, मॅन वाॅपर, किट्स, ट्रान्सपाेर्ट, मशिनरी भांडवल या सर्वांचा विचार केला. कमी केलेल्या दरात २५ टक्के तरी प्राॅफिट आहे. त्यामुळे लॅबचे नुकसान नाही. यापेक्षा जास्त दराने चाचणी करणाऱ्या लॅबवर गंभीर कारवाई हाेईल. - सुधाकर शिंदे, अध्यक्ष, काेविड चाचणी दर समिती.

बातम्या आणखी आहेत...