आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Divya Marathi Knowledge Series: If The Symptoms Go Away, RTPCR Testing Is Not Necessary; News And Live Updates

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी नॉलेज सिरीज:जर लक्षणे गेली तर आरटीपीसीआर चाचणी गरजेची नाही

9 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • घरातील इतर सदस्यांमध्ये लक्षणे नसल्यास 7 ते 10 दिवसांनी कोरोना चाचणी करावी

होम आयसोलेशन सुरू झाल्यानंतर किती दिवसांनी आरटीपीसीआर चाचणी करावी, यात पहिला दिवस कोणता धरावा, तपासणीसाठी नमुने दिल्याचा दिवस की चाचणी अहवाल आल्याचा दिवस?
औषधी संपल्यानंतर किंवा आजाराची लक्षणे नसल्यास तीन ते पाच दिवसांनी संसर्ग तपासण्यासाठी पुन्हा आरटीपीसीआर चाचणी करू शकता. यानंतर व्यक्ती बाधित नसल्याचे समजले जाते. केंद्र सरकारच्या नव्या प्रोटोकॉलनुसार संसर्गमुक्त होण्यासाठी आरटीपीसीआर आवश्यक केलेले नाही.

रुग्ण होम आयसोलेशनमध्ये असल्यास कुटुंबातील इतर सदस्यांनीही आरटीपीसीआर चाचणी करायला हवी का, केव्हा करावी?
घरातील दुसऱ्या सदस्यांनीही चाचणी करायला हवी. लक्षणे असल्यास लगेच करावी व लक्षणे न दिसल्यास बाधित व्यक्तीच्या संपर्कात आल्याच्या सातव्या ते दहाव्या दिवसादरम्यान तपासणी करावी.

बाधित व्यक्तीच्या घरात जर वयस्कर व्यक्ती किंवा इतर आजारांनी ग्रस्त व्यक्ती असल्यास आणि कोरोना रुग्णासाठी वेगळी खोली नसल्यास काय करायला हवे?
अशा स्थितीत कोरोना रुग्णाला कोणत्याही स्थितीत क्वॉरंटाइन सेंटर किंवा दुसऱ्या आयसोलेशन सेंटरमध्ये पाठवायला हवे. जर असे न केल्यास वयस्करांचा जीव धोक्यात टाकला जात आहे.

बाधित व्यक्तीसाठी वेगळे स्वयंपाकघर नसल्यास त्याला जेवण देताना काय काळजी घ्यायला हवी? त्याने वापरलेली भांडी कशी स्वच्छ करता येतील?
बाधित व्यक्तीसाठी वेगळ्या स्वयंपाकगृहाची गरज नाही. त्याची भांडीच फक्त वेगळी असावीत. बाधित व्यक्तीने त्याची भांडी स्वच्छ केल्यास जास्त चांगले, यासाठी प्रयत्न करायला हवेत. रुग्णाला घरातील कोणताही दुसरा सदस्य मास्क लावून योग्य अंतर राखून जेवण देऊ शकतो.

आता सांगितले जात आहे की, विषाणू हवेतून पसरू शकतो. अशात जर बाधित व्यक्ती एका खोलीत आयसोलेट असली तरी इतर सदस्यांना दुसऱ्या खोलीत संसर्ग होऊ शकत नाही का?
नक्कीच होऊ शकतो. आता विषाणू हवेतही काही काळ उपस्थित असतो. यामुळे कुटुंबातील दुसऱ्या सदस्यांनाही फक्त मास्कच नव्हे तर घरातही एकमेकांपासून शारीरिक अंतर ठेवायला हवे. ते सहज घेऊ नये, हाच बचाव आहे.

बातम्या आणखी आहेत...