आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
देशात एकूण ८० लाख लोकांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. यातील १० लाख फ्रंटलाइन वर्कर्स आहेत. केंद्र सरकारने मार्चच्या मध्यापर्यंत ३ कोटी लोकांना (आरोग्य-फ्रंटलाइन वर्कर्स) डोसचे लक्ष्य ठेवले आहे. हे लक्ष्य आतापर्यंत एक तृतीयांशच पूर्ण झाले आहे. दिल्ली, चंदीगडसह काही राज्ये अशी आहेत, जेथे लसीकरण केंद्रांवर फक्त २०-२५ लोकच येत आहेत. यामुळे अनेक राज्यांत लसीकरण केंद्रांचे विलीनीकरण करून उर्वरित सध्या बंद करण्यात आली आहेत. सामान्य लाेकांना डोस सुरू होतील तेव्हा ही केंद्रे पुन्हा उघडली जातील. या केंद्रांवर लसीकरणाच्या सर्व सुविधा उपलब्ध आहेत. दुसरीकडे केंद्र सरकारने ५० वर्षांवरील २७ कोटी लोकांना मार्चच्या मध्यापासून डोस सुरू करण्याची घोषणा केली आहे. यात प्रश्न हा आहे की, या लोकांना एक महिना वाट का पाहावी लागणार आहे? सध्या देशात १० कोटी डोस तयार आहेत. ८ कोटी डोस दर महिन्याला तयार होतील. आता लसीची कमतरता नाही, शिवाय एक महिन्यात कुठेही पुरवठा किंवा स्टोअरेजबाबत उणिवा नव्हत्या. केंद्रेही सज्ज आहेत. त्यामुळे केंद्राने ठरवले तर सामान्यांना डोस देण्यासाठी फेब्रुवारीतच केंद्रांवर बोलवणे शक्य आहे.
डॉ. नरेंद्र अरोरा चेअरमन, ऑपरेशन रिसर्च टास्क फोर्स, आयसीएमआर यांना थेट प्रश्न
प्रश्न : लसीकरणाला वेग का येऊ शकला नाही?
उत्तर : अद्याप कोविन अॅपची तयारी पूर्ण झालेली नाही.
> रोज १० लाख डोसचा दावा होता, परंतु एक महिन्यानंतर रोजची संख्या ४ लाखांवरही नाही, का?
- लसीकरणाला वेग आला नाही तर अडचणी येऊ शकतात, हे सत्य आहे. आम्ही सुधारणा करत आहोत. आम्ही ३ हजार केंद्रांपासून सुरुवात केली होती. आता १० हजार केंद्रे आहेत. यात क्षमतेपेक्षा ३५ ते ४०% कमी डोस दिले जात आहेत, हे पण सत्य आहे.
> मग ५० वर्षांवरील ५० कोटी लोकांना डोस देण्यास प्रारंभ का करू शकत नाहीत?
- अजून कोविन अॅप डॅशबोर्डची तयारी व्हायची आहे. हे पण विलंबाचे एक कारण आहे.
> लसीकरण कधी वेग घेईल?
- रोज ७० ते ८० लाख डोस देण्याची तयारी करत आहोत. तरच जुलैपर्यंत ३० कोटी डोस देण्याचे लक्ष्य गाठता येईल. यासाठी आगामी काळात ५० हजार केंद्रे उघडली जातील. राज्यांनाही सूचना दिल्या आहेत.
> या हिशेबाने रोज ८० लाख डोस लागतील...?
- होय... सध्या गरजेपेक्षा अधिक लस आमच्याकडे उपलब्ध आहे. सध्या दोन कंपन्या लस तयार करत आहेत. पुढील काळात पाच कंपन्या लस तयार करू लागतील. पुढील वर्षी देशात २५० कोटी डोस तयार होऊ लागतील.
राज्येही सज्ज : आम्ही गेल्या वर्षीच तयारी केली होती : मप्रचे आरोग्यमंत्री
मध्य प्रदेशचे आरोग्यमंत्री प्रभुराम चौधरी म्हणाले, केंद्र सरकारने आम्हाला ५० वर्षांवरील लोकांना डोस सुरू करा, असे सांगितले तर आमची तयारी आहे. आमच्याकडे ४८ हजार हेल्थ वर्कर्सचा ताफा आहे. आम्ही तर डोसची तयारी पण गेल्या वर्षी मेमध्येच सुरू केली होती.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.