आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महिला दिन विशेष:‘दिव्य मराठी’चा फक्त महिलांसाठी खास सर्व्हे

2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

८ मार्च हा महिला दिन. यानिमित्त दै. दिव्य मराठी या वेळीही नवा उपक्रम हाती घेऊन महिलांचा एक विशेष सर्व्हे करणार आहे. या माध्यमातून आम्ही देशभरातील महिलांकडून जाणून घेणार आहोत...

महिलांच्या सर्वात मोठ्या ५ आशा आणि सर्वात महत्त्वाच्या ५ चिंता कोणत्या आहेत. केवळ एका मिस्ड कॉलच्या माध्यमातून फॉर्म भरून आपण या सर्व्हेत ३ मार्चपर्यंत सहभागी होऊ शकता. या सर्व्हेतून मिळालेले निष्कर्ष ८ मार्च, अर्थात जागतिक महिलादिनी दै. दिव्य मराठीच्या विशेष अंकात प्रसिद्ध केले जातील.

सर्व्हेत असे सहभागी होऊ शकाल - दिव्य मराठीच्या या सर्व्हेत फक्त महिला वाचक सहभागी होऊ शकतील. सर्व्हेत सहभागी होण्यासाठी आपल्याला 8239978601 वर एक मिस्ड कॉल द्यावा लागणार आहे. - मिस्ड कॉलनंतर लगेच तुम्हाला एसएमएसच्या माध्यमातून एक लिंक मिळेल. त्यावर क्लिक करताच मोबाइलवर एक सर्व्हे फॉर्म उघडेल. यात आपण आपल्या ५ आशा आणि ५ प्रमुख चिंतांबद्दलचे विचार सबमिट करू शकाल. आपले विचार ३ मार्चपर्यंत अवश्य पाठवा.

याशिवाय पुरुष वाचकांचाही एक सर्व्हे फॉर्म आम्ही उद्या २७ रोजी प्रसिद्ध करत आहोत. यात फक्त पुरुष वाचकच सहभागी होऊ शकतील. त्यांच्याकडून जाणून घेऊत की, देशातील महिलांची स्थिती सुधारावी, त्यांना प्रगतीच्या संधी मिळाव्यात आणि बरोबरीचा हक्क मिळावा म्हणून ५ मुख्य कोणत्या गोष्टी व्हायला हव्यात. हा सर्व्हे पण ८ मार्च रोजीच प्रसिद्ध केला जाईल.

बातम्या आणखी आहेत...