आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रानी तेरो... चिर जीयो जसराज:पंडित जसराज आधी तबलावादक होते, लाहोरच्या संगीत मैफलीत गायकांसोबत मंचावर बसू न दिल्याने तबलावादन सोडले

नवनीत गुर्जरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • बडे गुलाम अली खाँ साहेबांना शिष्य बनवायचे होते, मात्र पंडितजी म्हणाले- माझे गुरू पं. मणिराम आहेत

बालवयातच ध्येय निश्चित असेल, निर्धार पक्का असेल व त्याचा पाठलाग करत सर्वाेच्च स्थानावर पोहोचून अनेक वर्षांपर्यंत अढळपद कायम राखण्याची क्षमता म्हणजे पंडित जसराज. ते आधी तबलावादक होते. थोरले बंधू महान गायक पंडित मणिराम यांची संगत करत. एकदा तर लाहोरच्या संगीत सभेत गायकांना व्यासपीठावर, तर संगतकारांची व्यवस्था जमिनीवर करण्यात आली होती. त्या दिवसापासून पंडित जसराज यांनी तबला सोडला. त्या दिवशी संगीत सभेत संगतही केली नाही. असेही म्हटले जाते की, पंडित कुमार गंधर्व यांच्या सांगण्यावरून त्यांनी तबला सोडून गायकी सुरू केली. मंचावरही गाऊ लागले. दरम्यान, ते आजारी उस्ताद बडे गुलाम अली खान यांची विचारपूस करण्यासाठी गेले. ज्यांचा शागीर्द होणे महाकठीण होते ते बडे गुलाम अली खान साहेब जसराज यांना म्हणाले, ‘तुम्ही इतकं छान गाता, माझे शागीर्द बना.’ नकार देत जसराज म्हणाले, ‘पं. मणिराम हेच माझे गुरू आहेत, मी त्यांच्याकडूनच शिकेन.’

वडील मोतीराम हे मेवातचे राजगायक, सासरे चित्रपट निर्माते व्ही. शांताराम, मात्र स्वत:च्या गायकीच्या जोरावर पं. जसराज अढळपदाला पोहोचले. शास्त्रीय, उपशास्त्रीय गायन-भजने गायली. त्याच्या आवाजात एक गोडवा होता, जो गळ्यातील खर्जातून यायचा. उदा. पं. छन्नूलाल मिश्र यांच्या गळ्यात सर्वात भरजरी खर्ज होता. त्यांचं साधं बोलणंही सुरेल असायचं. गाताना शब्दांसोबत निर्झर खळाळत असल्याचं वाटायचं.

शास्त्रीय गायनाच्या प्रत्येक मंचावर बडा ख्याल, छोटा ख्याल, तराणा, सर्वकाही पूर्ण झाल्यानंतर श्रोत्यांची फर्माईश असायची - रानी तेरो, चिर जीयो गोपाल... जोवर ती गायली जायची नाही तोवर जसराज यांचा स्वरसोहळा पूर्ण झाल्यासारखा वाटायचा नाही.

काही दर्दी मंडळी पं. भीमसेन जोशी यांच्याशी त्यांची तुलना करत पं. जसराज थोडंस टेक्निकल होतात, अशी दबक्या अावाजात टीका करायचे. खरं तर, ते शास्त्रीय गायन करताना तंत्रशुद्ध वाटायचे. मात्र हे त्यांचं वैगुण्य नव्हे तर पूर्णत्व होतं. परिपक्वता हाेती. ते तबलावादकही असल्याने विजा कडाडल्यासारख्या दीर्घ ताना, मंद्र ते तार व तेथून पुन्हा मंद्र सप्तकापर्यंत येणाऱ्या आलापांशी खेळत, सम गाठण्यात अत्यंत पारंगत होते. मात्र भजन गायचे तेव्हा पं. भीमसेन जोशी यांच्यासारखाच साधेपणा व प्रवाहीपण दिसायचं. चिर जीयो गोपाल, हमारे माही राधा जू को राज, माई मेरो मन मोह्यो सांवरे, मोहे घर अंगना ना सुहाय... हे अशी हजारो भजने त्यांच्या गायकीच्या साधेपणाचे साक्षीदार आहेत. पंडितजींनी जसरंगी या रागाचीही रचना केली आहे. हा राग कोणीही एकट्याने गाऊ शकत नाही हे या रागाचे श्रेष्ठत्व आहे. दोघे मिळून गाऊ शकतात. यातही एक पुरुष आणि एक महिला हवी. खरे तर हा एक प्रकारे जुगलबंदीचा राग आहे. जो अभोगी व कलावती यांच्या संगमातून तयार केला आहे. याची सर्वात कठीण आणि सुंदर बाजू म्हणजे महिला गायिकेचा मध्यम (म), पुरुषाचा षड्ज (सा) असतो. तर पुरुषाचा पंचम (प), महिला गायिकेचा षड्ज (सा) असतो.

पंडित जसराज यांनी आधी हा राग त्यांचे शिष्य मुलगी दुर्गा जसराज, शिष्य संजीव अभ्यंकर यांच्याकडून गिरवून घेतला. नंतर तो संजीव अभ्यंकर व अश्विनी भिडे देशपांडे यांनी सर्वाधिक गायला.

गुजरातशी त्यांचे घनिष्ठ नाते होते. त्यांनी साणंदमध्ये दीर्घकाळांपर्यंत गायन केले. त्यांचे शिष्य देश-विदेशात आहे. यातील काही दिग्गज संगीतकार आहेत. त्यांनी गायलेने भजन, राग आणि जगभरात पसरलेले त्यांचे शिष्यच त्यांची अनमोल संपत्ती आहे, जी आता ते मागे सोडून गेले आहेत.

बातम्या आणखी आहेत...