आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधारावर चालून जाणार रातरागिणी:अंधाराला तुम्ही पराभूत केल्याचा प्रसंग आम्हालाही सांगा व्हिडिओद्वारे

औरंगाबाद7 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • व्हिडिओ पाठविण्याची अंतिम मुदत 18 डिसेंबर 2020

शाळा- महाविद्यालयांतील मुलींपासून ते नोकरदार, गृहिणी. अनेक रातरागिणींनी कधी ना कधी, छेडखानी, वाईट नजर, टोमणेबाजी आणि अशा अनेक प्रकारच्या भीतीचा पराभव केला आहे. मनातील भीतीच्या अंधारावर मात केली आहे. तो प्रसंग इतर महिलांना नक्कीच प्रेरणा देऊ शकतो. म्हणून तो प्रसंग नेमका काय होता, तुम्ही त्यावर मात कशी केली, याची कहाणी आम्हाला व्हिडिओद्वारे पाठवा. ‘दिव्य मराठी’ डिजिटल मीडियाद्वारे तुमचा व्हिडिओ जगभरात प्रसारित होईल. तुम्ही केलेले धाडस जगासमोर आले तर कोट्यवधी महिलांना त्यातून प्रेरणा मिळेल. म्हणूनच आम्ही यंदा २२ डिसेंबरच्या ‘रातरागिणी’ वर्षपूर्ती दिनानिमित्त हे आयोजन केले आहे. व्हिडिओ पाठवणाऱ्या मुली, महिलांना क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

असा असावा व्हिडिओ

> हा व्हिडिओ एक मिनिटाचा असावा.

> मोबाइल आडवा ठेवूनच चित्रीकरण करा.

> फ्रेममध्ये हेडस्पेस (वरून जागा) सोडा.

> चेहऱ्यावर पुरेसा प्रकाश असावा.

> चित्रीकरण आणि आवाज सुस्पष्ट असावा

> प्रारंभी तुमचे आणि शहराचे नाव सांगा.

खालीलपैकी केवळ एका व्हॉट्सअॅप क्रमांकावर व्हिडिओ पाठवा

> वंदना धनेश्वर : ९३४००६१६२९

> मिनाज लाटकर : ७०५८९४००५४

> उषा बोर्डे : ९६७३२०५९३२

> मोहसीना सय्यद : ८९५६८४५३९३

व्हिडिओ पाठविण्याची अंतिम मुदत १८ डिसेंबर २०२०

व्हिडिओ कसा असावा?

बातम्या आणखी आहेत...