आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Divyamarathi Survey | 60% Of Parents Want To Send Their Children To School After The Vaccine Has Been Developed Against The Corona Virus; 56% Said If The School Starts We Will Leave The Children Ourselves

दिव्य मराठी सर्व्हे:60% पालक कोरोना विषाणूवर लस तयार झाल्यानंतर मुलांना शाळेत पाठवू इच्छितात; 56% म्हणाले- शाळा सुरू झाल्यास स्वत: मुलांना सोडू

एका महिन्यापूर्वी
 • कॉपी लिंक
 • दिव्य मराठीचा सर्व्हे, 73,271 लोकांनी दिले उत्तर या १० प्रश्नांच्या माध्यमातून आम्ही जाणून घेतले पालकांना काय वाटते?

कोरोनामुळे शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग संस्था बंद आहेत. अशा परिस्थितीत पालकांची इच्छा काय आहे? ते मुलांना शाळेत कधी पाठवू इच्छितात? शाळा उघडल्यावर मुले कशी जातील? अशा सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी दैनिक दिव्य मराठीने २१ ते २८ जून या काळात देशव्यापी सर्वेक्षण केले. यात मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, गुजरात, महाराष्ट्र, पंजाब, हिमाचल प्रदेश, हरियाणा, बिहार, झारखंड आणि दिल्ली येथील ७३ हजारांहून अधिक वाचक सहभागी झाले. यामध्ये ५५ हजारांहून अधिक पुरुष आणि १७ हजारांहून अधिक महिलांचा समावेश होता. यातील सर्वाधिक २४,३५२ लोक ३६-४५ वर्षे वयोगटातील होते, तर २५-३६ वर्षांचे १६,९०९ आणि ४६-५५ वयोगटातील १५,४१४ लोक सहभागी झाले.

सर्व्हेच्या निष्कर्षानुसार ६०% लोक म्हणाले की, जेव्हा कोरोना हद्दपार होईल किंवा लस येईल तेव्हाच मुलांना शाळेत पाठवू. ७१% लोकांना वाटते कोचिंग संस्था, महाविद्यालये, विद्यापीठ तेव्हाच उघडली पाहिजेत, जेव्हा कोरोना नियंत्रणात येईल. तसेच ४४% लोकांना वाटते, शाळा सुरू झाल्या तर फक्त ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग भरवावेत, तर केजी ते आठवीचे वर्ग केवळ ऑनलाइन व्हावेत.

1. मुलांची सुरक्षा आणि त्यांचा अभ्यास लक्षात घेऊन...

 • यावर्षी फक्त ऑनलाइन अभ्यासक्रम हवा. 17%
 • संसर्ग नियंत्रणात आल्यावर शाळा उघडण्याचा िनर्णय घ्या. 55%
 • या शैक्षणिक वर्षास शून्य वर्ष म्हणून गृहीत धरावे. 25%
 • काहीही सांगू शकत नाही. 3%

2. प्राथमिक शाळा ( केजी ते ५ वी पर्यंतचे वर्ग) केव्हा सुरू होणार ?

 • संसर्ग नियंत्रणात आल्यास शाळा उघडल्या पाहिजेत. 29%
 • सर्व वर्ग सुरू झाल्यानंतर, सर्वात शेवटी. 20%
 • कोरोनाची लस आल्यानंतरच शाळा सुरू कराव्यात. 49%
 • काहीही सांगू शकत नाही. 2%

3. ६ वी ते १२ वी पर्यंतच्या शाळा कधीपासून उघडल्या पाहिजेत?

 • संसर्ग नियंत्रणात आल्यास शाळा उघडल्या पाहिजेत. 45%
 • जेव्हा रोजची रुग्णसंख्या अर्धी होईल तेव्हा १ ऑगस्टपासून. 18%
 • कोरोनाची लस आल्यानंतरच शाळा उघडा. 35%
 • काहीही सांगू शकत नाही. 2%

4. कोचिंग संस्था आणि कॉलेज, विद्यापीठे कधी उघडतील ?

 • जेव्हा सरकार निर्णय घेईल तेव्हापासून. 13%
 • शाळांपेक्षा १५ दिवस आधी उघडले पाहिजे. 14%
 • कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आल्यानंतरच उघडाव्यात. 71%
 • काहीही सांगू शकत नाही. 2%

5. जर शाळा सुरू झाल्या तर तेथील व्यवस्था कशी असावी?

 • प्रत्येक विभाग दोन पाळ्यांत (५०-५०%) विभागला पाहिजे. 27%
 • निम्मा विभाग ऑड/इव्हन पॅटर्ननुसार शाळेत बोलवावा. 24%
 • फक्त ९ वी ते १२ वी पर्यंतचे वर्ग सुरू व्हावेत, केजी ते ८ वी पर्यंतचे आॅनलाइन घ्यावेत. 45%
 • काहीही सांगू शकत नाही. 4%

6. शाळा सुरू झाल्यानंतर मुलांना ने-आण करण्याची सुविधा कशी असावी?

 • पूर्वीसारख्याच स्कूल बस सुरू असाव्यात. 25%
 • मुलांना पालकांनीच शाळेत सोडावे आणि आणावे. 56%
 • स्कूल बसच्या क्षमतेपेक्षा ५०% मुलांनाच बसवावे. 14%
 • काहीही सांगू शकत नाही. 5%

7. शाळा बंदच, ऑनलाइन वर्ग सुरू झाले तर त्याचा वेळ किती असावा?

 • ९ वी-१२ वीसाठी ३-५ तास, लहान वर्गासाठी २-३ तास. 3%
 • ९ वी-१२ वीसाठी २-३ तास, लहान वर्गासाठी १-२ तास. 41%
 • सर्व वर्गातील मुलांसाठी शाळेच्याच वेळेत ऑनलाइन क्लासेस घ्या. 53%
 • काहीही सांगू शकत नाही. 3%

8. सद्य:स्थितीत ऑनलाइन वर्ग सुरू झाले तर शाळांनी काय करावे?

 • शाळांनी फक्त शैक्षणिक कामे करावीत. म्हणजे अभ्यास पूर्ण करावा. 34%
 • अभ्यासासोबत परीक्षा/चाचणी/ मूल्यांकन आणि अन्य गृहपाठ मुलांकडून करून घ्यावा. 24%
 • अभ्यास, परीक्षा, चाचणीसोबत मुलांचा सर्वांगीण विकास आणि सराव करून घ्यावा. 38%
 • काहीही सांगू शकत नाही. 4%

9. शाळा उघडल्यानंतर काेणते ज्यादा वर्ग सुरू करावेत, कोणते बंद करावेत?

 • शाळेत पहिला तास योगासनांचा घ्यायला हवा. 19%
 • कोरोनाची लस येईपर्यंत खेळाचे तास घेऊ नयेत. 22%
 • डिस्टन्सिंगचे खेळ चालू ठेवावेत. योगाही सुरू ठेवावा. 56%
 • काहीही सांगू शकत नाही. 3%

10. जेव्हा शाळा सुरू होतील तेव्हा...

 • मी माझ्या मुलांना पहिल्या दिवसापासून शाळेत पाठवेन. 17%
 • ...तरीसुद्धा मी काही दिवसांनी मुलांना शाळेत पाठवेन. 21%
 • कोरोना हद्दपार झाल्यानंतर किंवा लस आल्यानंतरच पाठवेन. 60%
 • काहीही सांगू शकत नाही. 2%
0