आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Divyang Ironman Niket, Paralympian Swimmer Suyash Vinadnes Short's Film Awakens Respect For Kareena Yedhya Paelis

दिव्य मराठी विशेष:दिव्यांग आयर्नमॅन निकेत, पॅरालिम्पियन स्विमर सुयश-विनाेदनेशाॅर्ट फिल्ममधून जागवला काेराेना याेद्ध्या पाेलिसांबद्दलचा आदर

एकनाथ पाठक | औरंगाबादएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • साे द सीड्स ऑफ : शाॅर्ट फिल्मच्या माध्यमातून पाेलिसांच्या कार्याचा केला गाैरव

काेराेनाच्या वाढत्या धाेक्यातही प्राण पणास लावून याेद्धे महाराष्ट्रीय पाेलिस कर्तव्य बजावत आहेत. या कार्याचा गाैरव करण्यासाठी दिव्यांग खेळाडूंनी एक वेगळ्या प्रकारचा प्रयाेग साकारला. देशातील पहिला दिव्यांग आयर्नमॅन निकेत दलाल, एशियन पॅरागेम्स चॅम्पियन, पॅरालिम्पियन स्विमर सुयश जाधव आणि पॅरालिम्पियन फेन्सर, माेटाेराेबेल रायडर विनाेद रावतने शाॅर्ट फिल्मच्या माध्यमातून पाेलिसांप्रतीचा आदर जागवला. दिग्दर्शक सार्थक कुर्डूकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘साे द सीड्स ऑफ’ नावाने ही शाॅर्ट फिल्म तयार केली आहे. जालना येथील पाेलिस कर्मचारी सुरेश पंचभाई हे पाेलिसाच्या भूमिकेत आहेत.

पत्नी, आई व मुलाकडून लघुपटाचे चित्रीकरण

लाॅकडाऊननंतर दिग्दर्शक सार्थक यांनी पाेलिसांच्या कार्याचा गाैरव करणारी शाॅर्ट फिल्म तयार करण्याचे निश्चित केले. मात्र, सार्थक यांनी सहभागी कलाकारांच्या नजीकच्या व्यक्तीकडे चित्रीकरणाची जबाबदारी साेपवली. यातूनच या फिल्मसाठी पल्लवी दलाल (पत्नी), सविता जाधव (आई) व जाॅन रावत (मुलगा) यांनी कॅमेरामनची भूमिका पार पाडली.

लंडनच्या फेस्टिव्हलमध्ये निवड

लंडन येथील पाइनवूड स्टुडिआेत ‘साे द सीड्स ऑफ’ या शाॅर्ट फिल्मचे स्क्रीनिंग करण्यात येईल. दिग्दर्शक सार्थक कुर्डूकर यांनी ही फिल्म्स जगभरातील २१ फेस्टिव्हलसाठी पाठवली. यातील लिफ्ट ऑफ सेशनमध्ये या फिल्मची निवड झाली. याशिवाय जगभरातील ११ प्रतिष्ठेच्या फेस्टिव्हलमध्येही या फिल्मची चर्चा आहे.

सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपणा सर्वांची भूमिका महत्त्वाची

समाजातील कर्तव्यनिष्ठ व्यक्ती, अधिकाऱ्यांबद्दलचा आदर सातत्याने कायम राहावा, याशिवाय त्यांच्याविषयीचे प्रेम निर्माण व्हावे याच सकारात्मक विचारातून मी ही फिल्म तयार केली. सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी आपणा सर्वांची भूमिका महत्त्वाची आहे. - सार्थक कुर्डूकर, दिग्दर्शक, आैरंगाबाद

बातम्या आणखी आहेत...