आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Diwali Vacation For Ellora Ajanta Professionals; If The State Approves Like The Center, Crores Of Flights

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पर्यटन:वेरूळ-अजिंठ्यातील व्यावसायिकांना दिवाळी व्हॅकेशनचे वेध; केंद्राप्रमाणे राज्याचा होकार मिळाल्यास कोटींची उड्डाणे

संतोष भांडवले | औरंगाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सात महिन्यांत येथे सुमारे दहा ते बारा कोटींची उलाढाल ठप्प

अनलॉकनंतर सर्वच क्षेत्रांनी आता उभारी घेतली आहे. यामुळे थांबलेल्या अर्थचक्राला पुन्हा एकदा गती मिळाली आहे. लॉकडाऊनच्या काळात घरी बसून कंटाळलेले पर्यटनप्रेमी आता हिवाळ्यात राज्यभरातील प्रसिद्ध पर्यटनस्थळांना भेट देण्यासाठी आतुर झाले आहेत. जागतिक वारसास्थळे म्हणून जगभरात प्रसिद्ध असलेल्या अजिंठा आणि वेरूळ लेण्यांना आता दिवाळी व्हॅकेशनचे वेध लागले आहेत. या स्थळांना पुन्हा सुरू करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले असले तरी अद्याप राज्य सरकारकडून मात्र या स्थळांना सुरू करण्याबाबत कोणताही पुढाकार घेतला जात नसल्याचे दिसून येते. राज्य सरकारही लवकरच सकारात्मक निर्णय घेत ही दोन्ही वारसास्थळे सुरू करेल आणि सात महिन्यांपासून बंद असलेल्या येथील व्यवसायाला पुन्हा गती मिळेल आणि हे व्यवसाय पुन्हा भरारी घेतील, असा विश्वास येथील व्यावसायिकांना आहे.

जागतिक वारसा : देवगिरी किल्ला, बीबी का मकबरा, वेरूळ लेणी, अजिंठा लेणी, पाणचक्की यासह म्हैसमाळ व शूलिभंजन आदी.

अजिंठा व वेरूळ येथे हंगामात २०,००० ते २२,००० पर्यटक दरराेज येतात, नियमित ७००० ते ८००० पर्यटक दरराेज येतात

सध्या काय करतात हे व्यावसायिक ?

काही बेराेजगार लाेकांना सध्या धुळे-साेलापूर महामार्ग तसेच डीबीएल कंपनी व समृद्धी महामार्गाचा आधार घ्यावा लागत आहे. काहींनी शेतीचा पर्याय निवडला, तर काहींनी अाैरंगाबाद गाठले.

(स्रोत : भारतीय पुरातत्त्व विभाग)

काय करताहेत व्यावसायिक?

दुकाने बंद असल्याने उपजीविकेसाठी अनेकांनी शेती व इतर व्यवसाय करणे पसंत केले अाहे. काहींनी कंपन्यांमध्ये काम सुरू केले.

हँडिक्राफ्ट, बेलफूल, हॉटेल, मूर्ती, प्रसादालय, फळे, छायाचित्रकार, गाइड, माहिती पुस्तक विक्रेते, शीतपेये विक्रेते, नाष्टा सेंटर, किराणा, पूजा साहित्य, रुद्राक्ष भांडार यासह हॉकर्स, पुजारी, ब्रह्मवृंद अादींची उपजीविका थांबली.

केंद्राचे आदेश, राज्याचे नाहीत

पुरातत्त्व विभागाच्या अंतर्गत येणारी पर्यटन व धार्मिक स्थळे उघडण्याची केंद्राची परवानगी आली आहे. त्यानुसार योग्य ती यंत्रणा आम्ही उभारली आहे. परंतु राज्य सरकारचे सद्य:स्थितीला अजून कोणतेही आदेश नाहीत. पर्यटनस्थळे उघडल्यानंतर पर्यटन वाढीसाठी उपाययोजना करू -आर. यू. वाकळेकर, संवर्धन सहायक, पुरातत्त्व विभाग