आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोनाच्या बाबतीत नवनवीन दावे केले जात आहेत. आता शास्त्रज्ञांनी सांगितल्याप्रमाणे कोरोनाचा प्रसार हा हवेतूनही होऊ शकतो. एका खोलीच्या सरासरी लांबीपर्यंत विषाणू पसरून जवळपास ३ तासांपर्यंत हवेत राहू शकतो. ज्या ठिकाणी मोकळी हवा खेळत नाही आणि नेहमी गर्दी असते अशा बंदिस्त जागेवर याचा अधिक धोका आहे. कोरोनाचा विषाणू हवेतून पसरत असल्याचे ३२ देशांतील २३९ शास्त्रज्ञांनी काही दिवसांपूर्वी डब्ल्यूएचओला कळवले होते. शास्त्रज्ञांची ही शंका नाकारता येत नसल्याचे आता डब्ल्यूएचओने म्हटले आहे. ड्रॉपलेटसच्या तुलनेत शिंकल्याने किंवा खोकलल्याने हवेत विषाणूचा प्रसार किती प्रमाणात होतो हे आताच सांगणे कठीण असल्याचे अमेरिकेतील संशोधन विद्यापीठ व्हर्जिनिया टेकच्या शास्त्रज्ञ डॉ. लिंसे मर उन यांनी म्हटले आहे.
लक्षण नसणाऱ्या रुग्णांकडून अधिक धोका
बाहेर पडताना चष्मा वापरा.सेंट्रलाइझ्ड एसी असलेल्या ठिकाणी विषाणू हवेत असण्याची शक्यता जास्त. बाधित व्यक्ती शिंकला वा खोकलला आणि तेथे हवा खेळती असेल तर आसपासच्या लोकांना लागण होण्याचा धोका आहे. त्यामुळे मास्क अवश्य वापरा. लक्षण नसलेल्या व्यक्ती जास्त धोकादायक. - प्रा.अरुण शर्मा, कम्युनिटी मेडिसिन, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ मेडिकल सायन्सेस
हवेतून पसरणाऱ्या विषाणूपासून असा करा बचाव
> गर्दी होत असलेल्या बंदिस्त जागी कमीत कमी वेळ घालवा. मोकळी हवा खेळणाऱ्या जागी कमी धोका.
> बंदिस्त जागी जात असाल तर मास्क घालाच. दुकान-कार्यालयाच्या खिडक्या-दरवाजे उघडे ठेवा.
> कापडापासूनचे बनवलेले मास्कही हवेतून प्रसार होणाऱ्या विषाणूचा धोका कमी करतात. पण शक्यतो चांगल्या दर्जाचे मास्क वापरा.
> घर, कार व कार्यालयातील एसीच्या फिल्टरला अपग्रेड करा. गर्दी जास्त असेल तर एसीच्या सेटिंगला आऊटडोअर एअरवर सेट करा. रिसर्कुलेटेड एअर सेटिंग बंद करा.
> कार्यालय व इमारतीत उत्तम दर्जाचे एअर प्युरिफायर वापरा.
> बंदिस्त जागी अल्ट्राव्हायोलेट लाइट्सचा वापर करणे चांगले. यामुळे विषाणू नाहीसा होईल.
> गर्दीच्या ठिकाणी मास्कसह फेस शील्ड घालणे सुरक्षित राहील.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.