आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:रुग्णसेवेसाठी डाॅक्टरने 200 किलोमीटर अंतर दुचाकीवरून कापत गाठली मुंबई; पोहोचल्यानंतर थेट रुग्णालयामध्ये रुजू

नाशिकएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • डाॅ. नीलेश साेनवणेंची काेराेनावर उपचारासाठी सायन रुग्णालयात कर्तव्यपरायणता

(नीलेश अमृतकर)

काेराेना रुग्णांसाठी सलग ३० दिवस अहाेरात्र कर्तव्य बजावणाऱ्या सायन हाॅस्पिटलमधील डाॅ. नीलेश साेनवणे यांना हाॅस्पिटलने काही काळ विश्रांतीसाठी वैद्यकीय रजा दिली खरी, पण चार दिवस उलटत नाही ताेच त्यांना रुग्णसेवेसाठी पुन्हा बाेलावण्यात आले. कुटंुबीयांची समजूत काढून डाॅ. साेनवणे मुंबईकडे निघालेे. पण संचारबंदीमुळे त्यांना कुठलेही खासगी, सरकारी वाहन मिळाले नाही. त्यामुळे त्यांनी थेट स्वत:च्या दुचाकीने २०० किलाेमीटर अंतर भर उन्हात कापत नाशिकहून मुंबई गाठली व पुन्हा रुग्णसेवेसाठी कर्तव्यावर हजर झाले.

बागलाण तालुक्यातील नामपूरचे मूळ रहिवासी डाॅ. साेनवणे २००४ मध्ये शासकीय आराेग्य सेवेत रुजू झाले. खात्यांर्तगत परीक्षा दिल्यानंतर पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षणासाठी डाॅ. साेनवणेंची मुंबईतील सायन रुग्णालयात निवड झाली. गेल्या २ वर्षांपासून शिक्षण घेत नियमित रुग्णसेवा करणाऱ्या डाॅ. साेनवणे यांना काेराेनाच्या संकटात पहिल्या दिवसापासून नियुक्त करण्यात आले. सलग महिनाभर काम केल्यानंतर त्यांना रुग्णालयाकडून १० दिवसांची वैद्यकीय रजा मिळाली.

आपल्या मित्र, नातलगांना व्हॉट्सअॅपवर घरात थांबण्याचे आवाहन करतानाच या आजाराची साखळी ताेडण्याचे व त्याच्या दुष्परिणामांची माहिती ते देत हाेते. चारच दिवसांत त्यांना सायन हाॅस्पिटलमधून काॅल आला. त्यांनी कुटुबीयांची समजूत काढून लागलीच मुंबईला जाण्याचा निर्णय घेतला. संचारबंदीच्या काळात कारसाठी विचारपूस केली, मात्र कोणतेही वाहन मिळाले नाही. जास्त वेळ वाया जाऊ नये म्हणून ते दुचाकीनेच मुंबईला निघाले. सायंकाळी थेट रुग्णालयात पाेहोचून त्यांनी रुग्णसेवेला सुरुवातही केली.

पाड्यावर ‘स्वाइन फ्लू’ची बाधा

नाशिक जिल्ह्यात अंबासन, जायखेडा या प्राथमिक आरोग्य केंद्रात सेवा देत असतानाच स्वाइन फ्लूच्या साथीच्या काळात ते स्वत:ही बाधित झाले हाेते. मात्र, इच्छाशक्ती, प्रतिकारक्षमतेच्या जोरावर त्यांनी या आजारावर मात केली.

दुर्गम भागात प्रसंगी १०-२० किमी पायपीटही केली

डाॅ. नीलेश साेनवणे यांनी आराेग्य सेवेत दाखल झाल्यापासून सुरुवातीला अतिदुर्गम भागात गुजरात सीमेवरील आराेग्य उपकेंद्रात सेवा बजावली. अक्कलकुवा, धडगावसारख्या भागात तसेच नर्मदा सरोवराच्या दुर्गम भागात कधी बोटीने, तर कधी १०-२० किमी पायी जाऊन वैद्यकीय सेवा बजावली.

बातम्या आणखी आहेत...