आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गेमिंगच्या सवयीमुळे टॉयलेटला जाण्याचेही भान नाही:मुलींमधील गेमिंग डिसऑर्डरचा दिव्य मराठीने घेतला आढावा

समीर शर्मा8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जयपूरच्या एका सुप्रसिद्ध उद्योजक कुटुंबाला त्यांच्याच 12 वीत शिकणाऱ्या मुलीने ओक्साबोक्शी रडवले. हे कुटुंब अद्यापही त्या धक्क्यातून सावरले नाही. 3 वर्षांपूर्वी दहावीत 86 % मार्क्स घेणारी त्यांची हुशार मुलगी अचानक एवढी संतापी बनली की, ती प्रत्येक गोष्टीसाठी कुटुंबियांना ब्लॅकमेल करू लागली. ऑनलाइन शिक्षणासाठी दिलेल्या स्मार्टफोनमुळे तिला मोबाईल गेमचे व्यसन जडले होते. पण, याची खबरबातही तिच्या पालकांना लागली नाही. फोनवर बंदी घातल्यामुळे ती घर सोडून थेट गुजरातला पळून गेली.

ही केवळ एकाच कुटुंबाची समस्या नाही. आज शेकडो कुटंब याच समस्येचा सामना करत आहे. मुलांमधील ऑनलाइन गेम खेळण्याची सवय एका गेमिंग डिसऑर्डरचे रुप घेत आहे. देश-विदेशातील झालेल्या संशोधनाच्या विश्लेषणानंतर दिव्य मराठीने या प्रकरणाचा नव्या दृष्टिकोनातून धुंडाळा घेतला.

अर्धा डझनहून अधिक मानसोपचारतज्ज्ञ व समुपदेशकांशी (काउंसलर) चर्चा केली. त्यात थक्क करणारी वस्तुस्थिती उजेडात आली. मोबाईलच्या व्यसनाला बळी पडलेल्या 10 मुलांत 4 मुली असल्याचे स्पष्ट झाले. दिव्य मराठीने पीडित कुटुंबांची भेट घेतली. त्यांनी डॉक्टरांच्या मदतीने आपल्या मुलांना या त्रासातून बाहेर काढले. महत्प्रयासाने यातील 2-3 कुटुंबांनी नाव न सांगण्याच्या अटीवर ही माहिती दिली. हे ऑनलाइन गेम्स तुमची मुलेच नाही तर मुलींच्याही मेंदूशी कसे खेळत आहेत, हे आम्ही तुम्हाला आजच्या मंडे स्पेशल स्टोरीत सांगणार आहोत.

बातम्या आणखी आहेत...