आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Doctors Misguided On Coronavirus; Dr Harsh Vardhan, Delhi AIIMS Randeep Guleria To Biswarup Roy Choudhury

सर्व डॉक्टर देव नाहीत:एकीकडे देशात कोरोना पसरत होता, दुसरीकडे चुकीची माहिती देऊन हजारो लोकांचा जीव धोक्यात घालत होते हे डॉक्टर

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • काही डॉक्टरांनी कोरोनासंदर्भात चुकीची माहिती पसरवली, जाणून घेऊयात त्याविषयी...
  • डॉ. हर्षवर्धन

कोण आहेत- डॉ. हर्षवर्धन हे देशाचे आरोग्यमंत्री आहेत आणि कोरोनाविरोधाच्या लढाईत देशाच्या नेतृत्व करत आहेत.

काय केले- यावर्षी फेब्रुवारीमध्ये डॉ. हर्षवर्धन बाबा रामदेव यांची कंपनी पतंजली निर्मित कोरोनिल टॅब्लेटच्या लाँचिंग कार्यक्रमास उपस्थित होते. बाबा रामदेव यांनी कोरोनिल हे कोरोना औषध असल्याचा दावा केला आणि असेही म्हटले होते की, त्यांना 'डब्ल्यूएचओचे प्रमाणपत्र' मिळाले आहे.

काय कारवाई झाली - इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ने पतंजलीला कोरोनिल टॅब्लेटसाठी डब्ल्यूएचओ सर्टिफिकेट मिळवल्याच्या दावा पूर्णपणे खोटा असल्याचे म्हटले आहे आणि अशा खोट्या दाव्यांबद्दल संताप व निराशा व्यक्त केली आहे. इतकेच नव्हे तर आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांना कोरोनिलच्या लाँचिंग कार्यक्रमात सहभागी झाल्याबद्दल स्पष्टीकरणही त्यांनी मागितले.

  • डॉ. रणदीप गुलेरिया

कोण आहेत- डॉ. रणदीप गुलेरिया हे दिल्लीतील एम्सचे संचालक आणि देशातील मोठ्या डॉक्टरांपैकी एक आहेत. देशात कोरोनाला सामोरे जाण्यासाठी धोरण तयार करण्यात त्यांचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे.
काय केले - गुलेरिया पत्रकार परिषदेत म्हणाले, 'कोरोनाच्या सौम्य प्रकरणांमध्ये सीटी स्कॅन करण्याला काही अर्थ नाही. 1 सीटी स्कॅन 300-400 एक्स-किरणांसारखे असते. जर तरुणांनी वारंवार सीटी स्कॅन केले तर त्यांच्या नंतरच्या जीवनात कर्करोगाचा धोका वाढू शकतो.
काय कारवाई झाली - इंडियन रेडिओलॉजिकल अँड इमेजिंग असोसिएशन (IRIA) या डॉक्टरांच्या संघटनेने गुलेरिया यांचा हा दावा फेटाळून लावला. संघटना म्हणाली होती, 'आधुनिक सीटी स्कॅनरमधून निघणारे रेडिएशन फक्त 5-10 क्ष-किरणांसारखेच आहे. छातीचे सीटी स्कॅन केल्यामुळे रोगाच्या सौम्य, मध्यम आणि गंभीर संक्रमणांची माहिती मिळते. विशेषत: ज्या रूग्णांची प्रकृती खालावत चालली आहे त्यांची स्थितीबद्दलही सीटी स्कॅनद्वारे माहिती मिळू शकते.'

  • डॉ. बिस्वरूप रॉय चौधरी

कोण आहेत - अपारंपारिक पद्धतींनी गंभीर आजारांवर उपचारांचा दावा करणा-या बिस्वरुप रॉय चौधरी यांच्या फॉलोअर्सची संख्या लाखांत आहे.
काय केले- डिसेंबर 2020 मध्ये बिस्वरूप रॉय चौधरी यांनी कोविड -19 वर 'कोविड 1981' नावाचे पुस्तक प्रकाशित केले. यात कोरोना आणि त्याच्या लसीशी संबंधित बरेच खोटे दावे होते. उदाहरणार्थ, कोविड हा सामान्य खोकला किंवा सर्दी सारखा रोग आहे किंवा लॉकडाउन आणि मास्क घालण्याचा सरकारचा निर्णय चुकीचा आहे.

काय कारवाई झाली - कोविड -19 संबंधित खोट्या आणि दिशाभूल करणार्‍या दाव्यांमुळे फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूब सारख्या मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर यावर बंदी घातली गेली. पण माध्यमांच्या वृत्तानुसार, चौधरी यांचे फॉलोअर्स अजूनही व्हॉट्सअ‍ॅप व इतर मेसेजिंग अ‍ॅप्सद्वारे लोकांमध्ये आपले खोटे दावे पसरवत आहेत.

  • हीलर भास्कर

कोण आहेत - भास्कर तमिळनाडूच्या लोकांमध्ये 'हीलर भास्कर' या नावाने लोकप्रिय आहे. शिबिरांचे आयोजन करुन लोकांवर उपचार करतो. यूट्यूबवर त्याचे 6.4 लाख सब्सक्राइबर आहेत.

काय केले- कोरोनाची पहिली लाट पसरली होती, तेव्हा भास्करने असा दावा केला होता की, कोरोना विषाणूची लागण झालेल्या लोकांना पहिले वेगळे करण्यात येईल आणि मग लोकसंख्या कमी करण्यासाठी त्यांचा जीव घेतला जाईल. भास्करने अलीकडेच एक नवीन दावाही केला आहे, ज्यात त्याने म्हटले की, 'मास्क घातल्याने लोकांची ऑक्सिजनची पातळी कमी होत आहे.'

काय कारवाई झाली - कोविड -19 संबंधित अवैज्ञानिक पद्धतीने उपचार सांगणा-या एका व्हायरल ऑडिओ क्लिपसाठी भास्करला कोयंबटूरमध्ये अटक करण्यात आली. मास्क घातल्याने ऑक्सिजनची पातळी कमी करण्याच्या भास्करच्या दाव्याविरोधात द्रमुकच्या एका नेत्याने एफआयआरही दाखल केला आहे.

  • थानिकासलम

कोण आहेत - कुठल्याही वैद्यकीय पदवीशिवाय कोयंबटूरमध्ये सिद्धा नावाचे हॉस्पिटल चालवतो.

काय केले- कोरोनाच्या पहिल्या लाटेदरम्यान कोरोनावर उपचार करण्यासाठी हर्बल औषध शोधल्याचा दावा केला होता. सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांद्वारे चुकीच्या औषधाची जाहिरात करत होता.

काय कारवाई झाली - डायरेक्टर ऑफ इंडियन मेडिसिन अँड होमिओपॅथीने या व्यक्तीविरूद्ध तक्रार दाखल केली. यानंतर मे 2020 मध्ये तामिळनाडू पोलिसांनी याला महामारी कायद्यांतर्गत अटक केली.

बातम्या आणखी आहेत...