आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:काेराेनामुक्तीनंतर डाॅक्टरची प्लाझ्मा दान चळवळ, भुसावळच्या डॉक्टरचा पुढाकार

पुणे10 महिन्यांपूर्वीलेखक: मंगेश फल्ले
  • कॉपी लिंक
  • आठ जणांनी केला प्लाझ्मा दान, आणखी शंभर लाेकांना प्रवृत्त करण्याचा संकल्प

जळगाव जिल्ह्यातील भुसावळ येथे शल्यचिकित्सक म्हणून काम करत असलेल्या डाॅ. आशुताेष केळकर यांना पत्नी, मुलगी व दाेन सहकाऱ्यांसह काेराेनाची लागण झाली. त्यामुळे, कुटुंबासह ते पुण्यातील रुग्णालयात दाखल झाले. काही दिवसांतच ते कोरोनामुक्त झाले. त्यानंतर डाॅक्टर व त्यांच्या मुलीने प्लाझ्मा दान करत काेराेनामुक्त झालेल्या रुग्णांनी प्लाझ्मा दान करण्याची जनजागृती चळवळ हाती घेतली आहे.

सात ते आठ काेराेनामुक्त झालेले व्यक्ती प्लाझ्मा दान करण्यासाठी तयार झाले असून किमान १०० जणांनी दान करावे, यादृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

भुसावळ येथे १९८८ पासून डाॅ.आशुताेष केळकर हे सर्जन म्हणून तर त्यांची पत्नी डाॅ.सुजाता केळकर या स्त्रीराेगतज्ञ म्हणून वैद्यकीय व्यवसाय करत आहे. लाॅकडाऊनच्या काळातही या डाॅक्टर दांपत्याने अनेक रुग्णांवर उपचार करत वैद्यकीय सेवा पार पाडली. डाॅ. केळकर यांच्या आईचे ११ जून राेजी कॅन्सरच्या दुर्धर आजार व वृद्धापकाळाने निधन झाले. काही दिवसांनतर त्यांना थकवा जाणवू लागला. मात्र, पहिल्या दिवशी त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, नंतर गांभीर्य आेळखून त्यांनी स्वत:सह कुटुंब आणि रुग्णालयातील सहकाऱ्यांचे स्वॅब तपासणीसाठी जळगावच्या प्रयाेगशाळेत दिले. १५ जून राेजी सदर डाॅक्टर दांपत्य, त्यांची कन्या सुप्रिया व दाेन सहकाऱ्यांचा अहवाल पाॅझिटिव्ह आल्याने आणि न्यूमाेनियाची सुरुवात झाल्याचे समजल्याने त्यांना धक्का बसला. यापूर्वी त्यांची बायपास सर्जरी झाली असल्याने तसेच रुग्णालयातील एका सहकाऱ्याची अंॅजिआेप्लास्टी झाल्याने त्यांनी पुढील धाेके लक्षात घेऊन पुण्यातील फुप्फुसतज्ञ जावई डाॅ.स्वप्निल कुलकर्णी यांच्याशी संपर्क साधून त्यांना सद्य:स्थिती सांगितली. त्यानंतर भुसावळहून ते कुटुंब व एका सहकाऱ्यासह पुण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

अभियंता मुलीसह स्वत: केले प्लाझ्मा दान

डाॅक्टर असल्यामुळे औषधे, ऑक्सिजन, सिलिंडर तसेच आवश्यक साहित्यसाेबत घेत त्यांनी पुणे गाठले. केईएम रुग्णालयात कुटुंबासह दाखल झाल्यानंतर त्यांनी विलगीकरण केल्यानंतर दहा दिवसांनी त्यांचा अहवाल निगेटिव्ह आला. ससून रुग्णालयात २६ व्यक्ती प्लाझ्मा थेरेपीतून गंभीर अवस्थेतून बरे झाल्याचे त्यांना समजले. त्यामुळे अभियंता मुलीसह डाॅक्टरांनी ससून रुग्णालयात प्लाझ्मा दान करून यापुढील काळात अधिकाधिक लाेकांनी प्लाझ्मा दान करण्यासाठी चळवळ सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...