आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:भक्तांविना साईबाबांचा गाभारा सुना, मात्र देणग्यांचा ओघ कायम; लॉकडाऊनच्या साडेपाच महिन्यांत झोळीत 21 कोटी रुपयांचे दान

नवनाथ दिघे | शिर्डी5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • ना दर्शनरांगा, ना भाविकांची रेलचेल... गेल्या वर्षीच्या तुलनेत देणगीत तब्बल 182 कोटी रुपयांची घट

कोरोनाच्या दुष्टचक्रात बाजारपेठा बंद राहिल्या, मंदिरे भक्तांविना ओस पडली. मात्र शिर्डीमध्ये साईबाबा समाधी मंदिराकडे येणारा देणगीचा ओघ सुरूच आहे. यंदा लॉकडाऊनच्या काळात १७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत साई संस्थानला साईभक्तांकडून विविध माध्यमांतून २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये देणगी प्राप्‍त झाली. गेल्या वर्षी प्राप्त देणगीचा विचार करता ही रक्कम अत्यल्प आहे. गतवर्षी याच कालावधीत तब्बल २०३ कोटी ३७ लाख ७१,७९५ रुपये देणगी मिळाली होती. म्हणजेच यंदा देणगीमध्ये १८२ कोटी ६१ लाख १७,६४४ रुपये इतकी घट झाली. कोरोनाचा संसर्ग देशात सुरू झाल्यानंतर या महामारीला अटकाव करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रतिबंधात्मक उपाय सुरू करण्यात आले. यात राज्य व केंद्र सरकारच्या दिशानिर्देशांनुसार टप्पेवार लॉकडाऊन सुरू झाले. याच दरम्यान शिर्डी संस्थानने १७ मार्चपासून साईबाबा समाधी मंदिर दर्शनासाठी बंद करण्यात आले. दक्षिणापेटीत येणारी देणगी रक्कम मिळालीच नाही.

गतवर्षी १७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीतील देणग्या

> १७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत संस्थनला १ कोटी ८९ लाख ७९, १६२ रुपये ऑनलाइन देणगी.

> दक्षिणापेटीतून ७५,२९,७८,९२७ रुपये, तर रोख देणगी २८,०६,४७,८०५ रुपये देणगी स्वरुपात मिळाले.

> चेक/डी.डी. ११,३०,२४,३८३.०४ रुपये, मनीऑर्डर ९८,६१,०४८ रुपये, पर‍कीय चलन २,५२,६१,७१०.३१ रुपये, डेबिट/क्रेडीट कार्ड ११,३६,५०,७९१ रुपये व इतर मार्गाने ७१ कोटी ९३ लाख ६७,९६८.४८ रुपये, अशा विविध माध्यमांतून २०३ कोटी ३७ लाख ७१ हजार ७९५ रुपये श्री साईबाबा संस्थानला मिळाले होते.


देणगी स्वरूपात ८८६८.१३० ग्रॅम सोने व १९४४८१.४८० ग्रॅम चांदी संस्थानला मिळाली होती.

१७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०२० या कालावधीत ११ कोटी ४७ लाख ९९,७९४ रुपये ऑनलाइन, १८,३२,३९७ रुपये रोख, चेक/डी.डी. ९३,०५,४११.६९ रुपये, मनीऑर्डर ६६,२१,०५६ रुपये, पर‍कीय चलन १५,३५,९६३.३१ रुपये, कार्ड २,३६,९९१ रुपये व इतर मार्गाने ७,३३,२२,५३८.८८ रुपये असे विविध प्रकारे २० कोटी ७६ लाख ५४ हजार १५१ रुपये संस्थानला प्राप्त झाले.

दक्षिणापेटी रिक्तच... गतवर्षी १७ मार्च ते ३१ ऑगस्ट २०१९ या कालावधीत दक्षिणापेटीतून ७५ कोटी २९ लाख ७८,९२७ रुपये देणगी मिळाली होती. मात्र या वर्षी याच कालावधीमध्ये दक्षिणापेटीत देणगी प्राप्त झाली नाही, अशी माहिती साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हुराज बगाटे यांनी दिली.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser