आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर एक्सप्लेनर:काय आहे डबल मास्किंग? जाणून घ्या ही पध्दत इन्फेक्शन रोखण्यात किती फायदेशीर, कशाप्रकारे घालावे डबल मास्क

23 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्क नेहमी फायदेशीर ठरतो. सरकारने देखील मास्क घालण्याचा नियमच केला आहे. मास्कचे प्रकार आणि वेगवेगळ्या मास्कचे संक्रमण रोखण्याच्या क्षमतेवर अनेक रिपोर्ट्स आले आहेत. दरम्यान अमेरिकेच्या Centers for Disease Control and Prevention (CDC) ने मास्क विषयी नवा खुलासा केला आहे. CDC च्या विशेषज्ञांचे म्हणणे आहे की, एका मास्कऐवजी दो मास्क घालणे जास्त फायदेशीर आहे. याला डबल मास्किंग म्हटले जाते. हे शरीरात जाणाऱ्या संक्रमणाच्या ड्रॉपलेटला रोखण्यात 90 टक्केपेक्षा जास्त प्रभावी असते.

एक्सप्लेनरवरुन समजून घेऊया की, डबल मास्किंग काय आहे, एकाच वेळी दोन मास्क कसे घातले जातात. कधी मास्क घालायचे आहे आणि कधी नाही, या सारख्या प्रश्नांची उत्तरे...

डबल मास्किंग काय आहे?
डबल मास्किंग म्हणजेच एकाच वेळी दोन मास्क घालणे. यामध्ये एक सर्जिकल मास्क आणि एक साधारण मास्क असते.

डबल मास्क कसा घालावा?
सर्वात पहिले दोन मास्क खरेदी करा. विशेषज्ञांनी सर्जिकल मास्कवरुन साधारण कपड्याचे मास्क घालणे योग्य समजले आहे. हे दोन्ही नसतील तर दोन कपड्याचे मास्कही एकावर एक घातले जाऊ शकतात.

सर्वात पहिले मेडिकल मास्क घ्या.

 • यासाठी इलास्टिकच्या दोन्ही बाजूंनी गाठ बांधा.
 • नंतर नाक आणि चेहऱ्यावर मास्कचा उरलेला कपडा आतल्या बाजूने घडी करा. यामुळे मास्क योग्य प्रकारे फिट होतो आणि संक्रमण पसरण्याची शक्यता कमी असते.
 • याच्यावर साधारण कपड्याचा मास्क घाला.

फिटिंग कशी तपासावी ?
तपासून घ्या की, दोन्ही मास्कची फिटिंग चेहऱ्याला पूर्णपणे कव्हर करत आहे की नाही. चेहरा आणि मास्कच्या काठांमध्ये अंतर नसावे. जेणेकरुन हवा थेट नाकात जाणार नाही. जर तुम्ही चष्मा लावता आणि काचेवर वाफ जमा होत आहे तर तुम्ही मास्क योग्य प्रकारे घातलेला नाही.

डबल मास्किंगनंतर काय करावे?
डबल मास्क घातल्यानंतर थोडा वेळ चालून श्वास घेऊन पाहा. जर श्वास घेण्यास त्रास होत असेल तर एकच मास्क घाला.

हे दोन मास्क एकाच वेळी घालू नका

 • एकावर एक दोन सर्जिकल मास्क
 • N95 च्या वर दुसरा एखादा मास्क

डबल मास्क कधी घालू नये

 • जर तुम्ही घरात आहात तर एका मास्कने तुमचे काम चालू शकते.
 • तुम्ही अशा ठिकाणी आहात जिथे सोशल डिस्टेंसिंगकडे पूर्णपणे लक्ष दिले जात आहे, तर डबल मास्क घालू नका.
 • मुलांना डबल मास्क घालू नका.

डबल मास्क कधी घालावे?

 • घराबाहेर जाताना
 • डॉक्टरांजवळ जात असताना
 • प्रवास करताना
 • कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी जाताना
 • अशा ठिकाणी जेथे सोशल डिस्टेंसिंगचे पालन करणे कठीण आहे.

डबल मास्किंग किती उपयुक्त ?
साधारण पध्दतीने घातल्यावर सर्जिकल मास्क ड्रॉपलेटला रोखण्यात 56.1% उपयुक्त
इलास्टिंगमध्ये गाठ बांधल्याने आणि काठ फोल्ट केल्यावर सर्जिकल मास्क 77% उपयुक्त
डबल मास्क ड्रॉपलेटला रोखण्यात 85.4 टक्के उपयुक्त

एक चांगला मास्क काय पाहून खरेदी करावा
लेयर
जेव्हाही मास्क खरेदी कराल तेव्हा त्यामध्ये लेयर अवश्यक तपासून पाहा. असा मास्क खरेदी करा जो कमीत कमी दोन किंवा तीन लेयरचा असेल. अनेक संशोधनात हा खुलासा झाला आहे की, सिंगल लेअर मास्कच्या तुलनेत हे दोन किंवा तीन लेयरचा मास्क संक्रमण रोखण्यात जास्त फायदेशीर आहे.

फिल्टर असणारे मास्क
कपड्याच्या काही मास्कमध्ये एक छोटा खिसा असतो. जेथे तुम्ही कॉफी किंवा व्हॅक्यूम फिल्टर लावू शकता. हा मास्क साधारण मास्कच्या तुलनेत चांगला असतो.

नोज वायरचे मास्क
काही मास्कमध्ये नाकाच्या ठिकाणी एक स्टीलची पातळ पट्टी असते. ही मास्कला नाकाच्या जवळ योग्यप्रकारे फिट करते.

असा मास्क घालणे टाळावे

 • तुमच्या चेहऱ्यावर पूर्णपणे फिट होत नसेल किंवा ढिला असेल.
 • ज्यामध्ये श्वास घेण्यासाठी वेगळा वाल्व दिला असेल.
 • अशा मटेरियलचा बनला असेल ज्यामुळे श्वास घेण्यास अडचण होईल. जसे की, प्लासिंक किंवा लेदर
 • ज्यामध्ये श्वास घेण्यासाठी वेगळा वाल्व दिला आहे.
 • संपूर्ण चेहऱ्याला कव्हर न करणारा
 • एकच लेअर असणारा.
बातम्या आणखी आहेत...