आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादेशाच्या 15व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्मू यांची निवड झाली आहे. राष्ट्रपती बनलेल्या मुर्मू या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी आहेत. त्या संथाल आदिवासी समाजातून येतात. गोंड आणि भिल्लांनंतर संथाल हा देशातील तिसरा मोठा आदिवासी समुदाय आहे.
अशा परिस्थितीत, आज आपण संथाल जमाती कशी आहे? त्यांची सामाजिक-आर्थिक परिस्थिती कशी आहे? आणि त्यांच्या अद्वितीय अशा परंपरा काय आहेत? हे आपण दिव्य मराठी एक्सप्लेनर मध्ये जाणून घेणार आहोत.
झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये जास्त लोकसंख्या
या समाजाला संथाला किंवा संताल असेही म्हणतात. संथा म्हणजे समाज आणि आला म्हणजे माणूस. म्हणजेच शांत व्यक्ती असा त्याचा अर्थ होतो. झारखंड, ओडिशा आणि पश्चिम बंगालमध्ये संथाल समाजाचे बहुतांश लोक राहतात. द्रौपदी मुर्मू या मूळच्या ओडिशाच्या मयूरभंज जिल्ह्यातील आहेत, जिथे संथाल समाजातील लोक मोठ्या संख्येने राहतात.
लिखित नोंदी नसल्यामुळे, संथाल समाजाच्या उत्पत्तीची अचूक तारीख माहित नाही, परंतु ते उत्तर कंबोडियातील चंपा राज्यातून आले असावेत असे मानले जाते. भाषाशास्त्रज्ञ पॉल सिडवेल यांच्या मते, संथाल 4000 ते 3500 वर्षांपूर्वी ओडिशाच्या किनारपट्टीवरून भारतात आले. 18 व्या शतकाच्या अखेरीस हा भटक्यांचा समूह हळूहळू बिहार, ओडिशा आणि झारखंडच्या छोटा नागपूर पठारावर स्थायिक झाला.
संथाल जमातीचे लोक संथाली भाषा बोलतात. ही भाषा संथाल विद्वान पंडित रघुनाथ मुर्मू यांनी ओल चिकी नावाच्या लिपीत लिहिली आहे. ओल चिकी लिपीतील संथालीचा राज्यघटनेच्या 8 व्या अनुसूचीमध्ये समावेश करण्यात आला आहे. संथाली व्यतिरिक्त ते बंगाली, उडिया आणि हिंदी देखील बोलतात.
संथाल जमातींमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक
सामान्यतः, ईशान्येकडील राज्यांव्यतिरिक्त इतर राज्यांमध्ये राहणाऱ्या आदिवासी समुदायांमध्ये साक्षरतेचे प्रमाण कमी आहे, परंतु संथाल लोकांमध्ये ते सर्वाधिक आहे. याचे कारण म्हणजे 1960 पासूनी त्यांना झालेली शालेय शिक्षणाची जाणीव.
हेच कारण आहे की ओडिशा, पश्चिम बंगाल आणि झारखंडमधील इतर जमातींच्या तुलनेत संथालांमध्ये साक्षरतेचे प्रमाण सर्वाधिक आहे. 55.5% संथाली लोक शिक्षित आहेत. याचा परिणाम असा झाला आहे की, समाजातील अनेक लोक कमी उत्पन्न गटाच्या मर्यादेच्या वर गेले आहेत.
संथाल समाजातील लोक खूप वेगळ्या परंपरा पाळतात
यांच्यात 12 प्रकारे लग्न होते...
महिला पतीला वाटेल तेव्हा घटस्फोट देऊ शकतात
संथाल समाजात घटस्फोटाला निषिद्ध मानले जात नाही. म्हणजेच येथे घटस्फोट देण्यास आडकाठी नाही. कोणताही पुरुष किंवा स्त्री घटस्फोट देऊ शकतो. संथाल पुरुष आपल्या पत्नीला डायन असल्याचे सिद्ध झाल्यास किंवा ताच्या आदेशाचे पालन न केल्यास घटस्फोट देऊ शकतो.
दुसरीकडे, संथाली स्त्री स्वत:ची काळजी घेण्याच्या असमर्थतेच्या आधारावर तसेच दुसऱ्या पुरुषाशी लग्न करण्याची तिची इच्छा या आधारावर घटस्फोट घेऊ शकते. मात्र, महिलेने ज्या व्यक्तीशी दुसरे लग्न केले त्या व्यक्तीला पहिल्या पतीला नुकसान भरपाई द्यावी लागते.
पत्नी गरोदर असताना पती कोणत्याही प्राण्याला मारू शकत नाही
संथाल समाजात नवऱ्यासाठीही काही अनोखे नियम आहेत, जे पाळलेच पाहिजेत. उदाहरणार्थ, पत्नी गरोदर असताना, पती कोणत्याही प्राण्याला मारत नाही आणि अंत्यसंस्काराला उपस्थित राहत नाही.
करम हा संथाळ्यांचा मुख्य सण
महिला टॅटू बनवतातच
त्यांची सामाजिक उन्नती झालेली असूनही, संथाल सामान्यतः त्यांच्या मुळाशी जोडलेले आहेत. ते निसर्गाचे उपासक आहेत आणि त्यांच्या गावांमध्ये झहेर (पवित्र उपवन) मध्ये पूजा करताना दिसतात. त्यांचा पारंपारिक पोशाख, पुरुषांसाठी धोतर आणि गमचा आणि महिलांसाठी शॉर्ट-चेक साडी, सहसा निळी किंवा हिरवी असते. तसेच महिला टॅटू बनवतातच.
संथालांची घरे म्हणजेच ओलाह खास रंगामुळे दुरूनच ओळखू येतात
दामोदर नदीतच अस्थिकलशाचे विसर्जन केले जाते
संथालांच्या धार्मिक जीवनात दामोदर नदीचे विशेष महत्त्व आहे. संथाल मरण पावला की त्याच्या अस्थी दामोदर नदीत विसर्जित केल्या जातात.
400 गावांतील 50,000 लोकांनी इंग्रजांविरुद्ध घोषित केले होते युद्ध
इंग्रजांविरुद्धचे पहिले स्वातंत्र्ययुद्ध 1857 मध्ये झाले असे मानले जात असले तरी झारखंडमधील संथाल जमातीने 1855 मध्येच ब्रिटिशांविरुद्ध बंडाचा झेंडा रोवला होता. याला संथाल हूल असे म्हणतात. संथाली भाषेत हूल म्हणजे बंड.
30 जून 1855 रोजी सिद्धू आणि कान्हू यांच्या नेतृत्वाखाली साहिबगंज जिल्ह्यातील भगनाडीह गावातून बंडाची सुरुवात झाली. भोलनाडीह गावात पोहोचल्यानंतर 400 गावांतील 50,000 हून अधिक लोकांनी युद्धाची घोषणा केली होती. येथे आदिवासी बांधव सिद्धू-कान्हू यांच्या नेतृत्वाखाली संथालांनी महसूल न भरण्याबरोबरच इंग्रजांनी आमची माती सोडावी अशी घोषणा केली होती.
यामुळे घाबरून इंग्रजांनी बंडखोरांना रोखण्यास सुरुवात केली. ज्याचा संथालांनी जोरदार मुकाबला केला. दरम्यान, त्यांना रोखण्यासाठी इंग्रजांनी क्रूरतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या. सिद्धू आणि कान्हू यांना इंग्रजांनी पकडले आणि 26 जुलै 1855 रोजी भोगनाडीह गावात झाडाला लटकवून फाशी दिली. या हुतात्म्यांच्या स्मरणार्थ दरवर्षी 30 जून रोजी हूल क्रांती दिवस साजरा केला जातो. या महान क्रांतीमध्ये सुमारे 20 हजार लोकांनी हौतात्म्य पत्करले होते.
स्रोत: Scheduled Castes and Scheduled Tribes Research and Training Institute (SCSTRTI), Bhubaneswar, https://ignca.gov.in/, Austroasiatic Studies: state of the art in 2018।
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.