आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदू विरोध हा द्रविड राजकारणाचा पाया:आर्य आक्रमणकारीचा युक्तिवाद, 55 वर्षांपासून तमिळनाडूत द्रविड पक्षांची सत्ता

लेखक: नीरज श्रीवास्तव/अविनीश मिश्रा2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विजयासह, हिंदुत्व ही राजकीय यशाची गुरुकिल्ली म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने हाच फॉर्म्युला वापरला. भाजपच्या लागोपाठच्या विजयानंतर तो सत्तेच्या यशाचा मंत्र म्हणून स्वीकारला गेला. काँग्रेसनेही तोच मार्ग अवलंबला. मात्र, त्यांचा मार्ग सॉफ्ट हिंदुत्वाचा होता. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी पक्षाचे अध्यक्ष असलेले राहुल गांधी यांची हिंदू प्रतिमा निर्माण करण्यासाठी पक्षाने कोणतीही कसर सोडली नाही.

ही झाली हिंदुत्वाच्या माध्यमातून सत्तेपर्यंत पोहोचण्याची गोष्ट. पण दक्षिणेकडील तमिळनाडूमध्ये हिंदुत्वाच्या समर्थनाऐवजी हिंदू विरोध हीच सत्तेत यशाची चावी आहे. हे विस्ताराने समजून घेण्याआधी तमिळनाडूतील सत्ताधारी पक्ष द्रमुकच्या दोन नेत्यांची विधाने पाहूया...

द्रमुकच्या दोन बड्या नेत्यांच्या या विधानांमुळे तमिळनाडूच्या राजकारणात धर्म आणि भाषेचा वाद पुन्हा एकदा गडद होऊ लागला आहे. खरं तर, याची सुरुवात 1916 मध्ये झाली, जेव्हा टीएम नायर आणि पी त्यागराज चेट्टी यांनी द्रविड राजकारणाला सुरुवात केली. या दोन्ही नेत्यांनी तमिळनाडूतील रहिवाशांना द्रविड मानत त्यांना उत्तर भारतातील आर्यांपेक्षा वेगळे असल्याचे सांगितले.

तमिळनाडूचे द्रविड राजकारण समजून घेण्यासाठी, त्यातील महत्त्वाची पात्रे कोणती आहेत ते जाणून घ्या…

तामिळनाडूला देश बनवण्याची मागणी काश्मीरपेक्षाही जुनी, पेरियार यांनी 1939 मध्ये द्रविडनाडूची मागणी केली होती.
तमिळनाडूमध्ये द्रविड राजकारण स्वातंत्र्याच्या पूर्वी सुरू झाले होते. टीएम नायर आणि पी. त्यागराज चेट्टी यांनी 1916 मध्ये पहिल्यांदा जस्टिस पार्टीची स्थापना केली होती. 1925 मध्ये इरोड वेंकट रामास्वामी म्हणजेच ईव्ही रामास्वामी उर्फ ​​पेरियार या चळवळीत सामील झाले. पेरियार यांनीच 1944 मध्ये जस्टिस पार्टीचे नाव बदलून द्रविड कळघम केले.

1939 मध्ये पेरियार यांनी वेगळ्या देशाच्या मागणीसाठी एक परिषद आयोजित केली होती. 17 डिसेंबर 1939 रोजी त्यांनी आपल्या भाषणात द्रविडांसाठी द्रविडनाडूचा नारा दिला. पेरियार यांनी आर्यांना आक्रमणकारी म्हटले. ब्राह्मण आल्यानेच तमिळ समाजात फूट पडल्याचेही ते म्हणायचे.

तमिळनाडूत 55 वर्षांच्या सत्तेत द्रविड फॅक्टर, 234 पैकी 170 जागांवर प्रभाव
तमिळनाडूमधील 234 विधानसभा जागांपैकी सुमारे 170 जागांवर द्रविड मतदारांचा थेट प्रभाव आहे. राज्यातील दोन प्रमुख पक्ष द्रमुक आणि एआयडीएमके हे दोन्ही पक्ष द्रविड संकल्पनेवरच चालतात. गेल्या एका शतकात हा फॅक्टर किती प्रबळ झाला आहे, याचा अंदाज या वस्तुस्थितीवरून लावता येतो की, गेली 55 वर्षे तमिळनाडूमध्ये द्रविड राजकारण करणारे पक्ष द्रमुक आणि अण्णाद्रमुक यांचीच सत्ता आहे.

द्रविड व्होटबँकेच्या जोरावर तमिळनाडूतील पक्षांनी केंद्रातील सरकारांनाही दिले आहेत धक्के...

जयललिता यांचे ऐकले नाही तर अवघ्या एका मताने अटलजींचे सरकार पडले.
1998 मध्ये केंद्रात अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार स्थापन झाले. युतीमध्ये भाजपचे 182 खासदार होते, तर AIADMK 19 खासदारांसह आघाडीतील दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष होता. जयललिता यांनी आपल्यावरील सर्व खटले मागे घेण्याची मागणी केली. तमिळनाडूचे करुणानिधी सरकार बरखास्त करण्यासही सांगितले. अटलबिहारी वाजपेयी यासाठी तयार नव्हते, म्हणून जयललिता यांनी पाठिंबा काढून घेतला. संसदेत अवघ्या एका मताने वाजपेयींचे सरकार पडले.

करुणानिधींनी मनमोहन सिंहांवर दबाव आणला, पटले नाही तर पाठिंबा काढून घेतला
2004 मध्ये काँग्रेसच्या नेतृत्वाखाली यूपीए सरकार स्थापन झाले. मनमोहन सिंह हे पंतप्रधान झाले. करुणानिधींच्या द्रमुकने महत्त्वाच्या मंत्रालयांबाबत जोरदार वाटाघाटी केल्या. करुणानिधी यांच्या कुटुंबातील ए राजा आणि कनिमोझी यांना कॅबिनेट मंत्रीपद मिळाले. यूपीएच्या दुसऱ्या कार्यकाळात हे दोन्ही नेते टूजी घोटाळ्यात अडकले. यानंतर द्रमुकने 2013 मध्ये सरकारचा पाठिंबा काढून घेतला.

भाजपने लोकसभा अध्यक्षांकडे केली राजांबद्दल तक्रार, निवडणूक लढवण्यास बंदी घालण्याची मागणी

द्रमुक नेते ए राजा यांनी मनुस्मृतीला शूद्र विरोधी म्हटले आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे संतप्त झालेल्या तमिळनाडू भाजपने लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली. ए राजा यांना निवडणूक लढविण्यास बंदी घालण्याची मागणी पक्षाने केली. राजांनी विल्लुपुरममधील एका सरकारी कार्यक्रमात म्हटले होते - मनुस्मृतीने शूद्रांचा अपमान केला आणि त्यांना समानता, शिक्षण, रोजगार आणि मंदिरात प्रवेश नाकारला. भाजपने म्हटले- त्यांचे वक्तव्य एका समुदायाविरुद्ध द्वेष पसरवणारे आहे. लोकसभेतील कामकाजाच्या नियम 233A अन्वये याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

अधिकृत आकडेवारीत तमिळनाडूतील द्रविड हिंदू, पण राजकारणात ब्राह्मणांना विरोध

भारत सरकारच्या आकडेवारीत द्रविड समाजाला हिंदू वर्गात ठेवण्यात आले आहे, पण राजकारणाचा विचार केला तर हा वर्ग ब्राह्मणांच्या विरोधात उभा राहिलेला दिसतो. या अजेंड्याचा अवलंब करून मिळालेल्या यशाच्या जोरावर द्रविड पक्ष चेन्नईपासून दिल्लीपर्यंतच्या राजकारणात हस्तक्षेप करतात. वर नमूद केलेली सर्व उदाहरणे याचीच आहेत. दर 10 वर्षांनी होणाऱ्या जनगणनेत द्रविड समुदायाचा वेगळा उल्लेख नसल्यामुळे त्यांची नेमकी संख्या उपलब्ध नाही.

बातम्या आणखी आहेत...