आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

लाइट, कॅमेरा, अॅक्शन!:मुंबई-पुण्यात कोरोनाचा कहर असल्यामुळे मराठी सिनेसृष्टीची पाऊले वळली माहेराकडे

कोल्हापूर3 महिन्यांपूर्वीलेखक: प्रिया सरीकर
  • कॉपी लिंक
अभिनेता हर्षद जोशीच्या हस्ते नारळ फोडून ‘तुझ्यात जीव रंगला’चे चित्रीकरण सुरू झाले.
  • कोल्हापूरच्या निसर्गरम्य परिसरात चित्रीकरणासाठी मिळतेय पसंती

मराठी सिनेमांचं एकेकाळी माहेरघर असलेल्या कोल्हापूरला पुन्हा सुगीचे दिवस येत आहेत. मुंबई-पुण्यात कोरोनाचा उद्रेक कमी होत नसल्याने तेथील चित्रपट व मालिकांचे चित्रीकरण ठप्प पडले आहे. तुलनेने कोल्हापुरात कमी प्रादुर्भाव असून तेथील परिसरही निसर्गरम्य आहे. चित्रीकरणास आवश्यक सुविधा जिल्ह्यात उपलब्ध असून तुलनेने खर्चही कमी आहे. त्यामुळे हिंदी- मराठी मालिकांच्या निर्मात्यांनी कोल्हापूकडे पुन्हा कूच केली आहे. येथे ऑगस्ट महिन्यात महेश कोठारे यांच्या जोतिबावर आधारित मालिकेसह कलर्स वाहिनीवरील दोन मालिकांचे चित्रीकरण सुरू होणार आहे. ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेच्या चित्रीकरणाला प्रारंभ झाला आहे. ‘राजा राणीची गं जोडी’, ‘जीव झाला येडापिसा’ या दोन मालिकाही सुरू होतील. कलर्सवरील नाटी पिंकी आणि शुभारंभ या दोन हिंदी मालिकांचेही चित्रीकरण सुरू करण्यात येत आहे. याशिवाय अनेक हिंदी वेब सिरीज आणि मालिकांच्या निर्मात्यांनी कोल्हापुरात येऊन माहिती घेतली आहे. सध्या ८ दिवस लाॅकडाऊन असल्याने चित्रीकरण थांबले आहे.

स्थानिकांना सुगीचे दिवस : 

एकेकाळी सर्वच मराठी चित्रपटांचे चित्रीकरण कोल्हापुरात होत असे. पण कालांतराने चित्र बदलले आणि स्थानिक कलाकार, तंत्रज्ञ यांच्यावर उपासमारीची वेळ आली. आता चित्रीकरण सुरू झाल्यानंतर अनेकांच्या हाताला काम मिळाले आहे.

अनेक जण उत्सुक

कोल्हापूरमध्ये तीन मराठी मालिकांचे चित्रीकरण सुरू होते. लॉकडाऊनमुळे चित्रिकरण तात्पुरते बंद असले तरी ऑगस्ट महिन्यात नव्या मालिकांसह चित्रिकरण सुरू होणार आहे. अनेक निर्माते लोकेशन बघून गेले आहेत. त्यामुळे हिंदी आणि मराठी अशा दोन्ही इंडस्ट्री कोल्हापूरात यायला उत्सुक आहेत - आनंद काळे, अभिनेता महालक्ष्मी सिने सर्व्हिस.