आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • During The Corona Period, The Risk Of Malnutrition Increased Among Many Household Members, With Many Poor Families Falling Into This Pit; UNICEF's Pediatric Advisor Dr. Mridula Phadke Expressed Concern

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोना काळात अनेक घरांतील सदस्यांत कुपोषणाचा धोका वाढला, अनेक गरीब कुटुंबे याच्या गर्तेत; युनिसेफच्या बालरोग सल्लागार डॉ. मृदुला फडके यांनी व्यक्त केली चिंता

दीप्ती राऊत | नाशिक8 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • कुटुंबाचे उत्पन्न 10% घटल्यास बालकांच्या आहारातही 1% घट

लॉकडाऊनच्या काळात अनेकांचा रोजगार गेल्याने त्या कुटुंबातील मुलांच्या आहारात आणि पोषणात घट झाली आहे. एखाद्या कुटुंबाचे उत्पन्न १० टक्क्यांनी घटते तेव्हा त्या कुटुंबातील बालकांच्या आहारात १ टक्क्याने घट होते, असे मत मांडत युनिसेफच्या बालरोग सल्लागार आणि महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या माजी कुलगुरू डॉ. मृदुला फडके यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘पोषण महा’ अभियानानिमित्ताने त्यांनी “दिव्य मराठी’शी संवाद साधला.

डॉ. फडके यांनी सांगतिले की, कुटुंबाचे उत्पन्न कमी झाल्यास त्याचा थेट परिणाम त्या कुटुंबातील लहान बालके, महिलांच्या आहारावर होत असल्याचे अनेक अर्थतज्ञांच्या अभ्यासातून पुढे आले आहे. एखाद्या कुटुंबाच्या उत्पन्नात १० टक्क्यांनी घट झाल्यास त्या घरातील बाळाचा आहार १ टक्क्याने घटतो. यातही प्रामुख्याने बालकांच्या आहारातून १ टक्का प्रथिने, अर्धा टक्का स्निग्ध पदार्थ आणि अर्धा टक्का पिष्ठमय पदार्थ हद्दपार झाल्याने त्यांची पोषण स्थिती खालावत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले. त्यासाठी सध्याच्या काळात घरपोच रेशन गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. लॉकडाऊन व स्थलांतर या दोन्ही गंभीर परिस्थितीमुळे अनेक कुटुंबे दारिद्रयाच्या खाईत लोटली गेली. त्या कुटुंबांमधील बालकांच्या आणि महिलांच्या पोषणाचा स्तर खालावल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले. मात्र, यास पुष्टी देणारी आकडेवारी अद्याप उपलब्ध नसल्याचे त्या म्हणाल्या.

कोरोना काळात वजन-उंची मोजण्यात मर्यादा

कुपोषण निर्मूलनासाठी अंगणवाडी सेविका प्रत्येक बालकाचे वजन, उंची मोजमाप घेऊन नोंदी ठेवतात. मात्र, कोविडमुळे ते शक्य झालेले नाही. त्यावर दंडघेर माेजणे या पर्यायाचा विचार गरजेचा असल्याचे डॉ. फडके यांनी सांगितले. ६ महिन्यांपासून ६ वर्षांपर्यंतच्या बालकांचे पोषण याद्वारे समजू शकते. चांगले पोषण असलेल्या बालकांचा दंडाचा घेर १२.५ सेंमी, ११.५ ते १२.५ सेंमी घेर मध्यम स्वरूपाचे, तर ११.५ सेंमीखालील घेर असलेल्या बालकांमध्ये तीव्र कुपोषण मानले जाते. अंगणवाडी सेविकांना या मोजपट्ट्या उपलब्ध करून देणे गरजेेचे असल्याचे त्या म्हणाल्या.

२ ते ५ वर्षांपर्यंत फक्त अर्धा तास ऑनलाइन

डाॅ. फडके म्हणाल्या, ऑनलाइन शिक्षणामुळे मुले अनेक तास मोबाइल, संगणक स्क्रीनच्या संपर्कात येणे हे त्यांच्या आरोग्यासाठी धोकादायक आहे. अमेरिकन अकादमी ऑफ पिडीयीट्रिशियनने यावर संशोधन करून काही निकष जाहीर केले. यात दोन वर्षांखालील बालकांना स्क्रीनच्या संपर्कात आणू नये, २ ते ५ वर्षांपर्यंतच्या बालकांसाठी अर्ध्या तासापेक्षा अधिक वेळ ऑनलाइन शिकवू नये. पाच वर्षांवरील मुलांनाही ऑनलाइन शिकवत असताना दर काही मिनिटांनी वेगळी अॅक्टिव्हिटी देऊन स्क्रीन ब्रेक अत्यावश्यक असल्याचे त्या म्हणाल्या.

बातम्या आणखी आहेत...