आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दृष्टिकोन:भारताला कोण सांभाळेल ही चिंता करण्याचे कारण नाही

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

आपण ठरवले तर सर्व काही शक्य आहे. यशासाठी सर्वांना संधी मिळते, हीच लोकशाहीची पद्धत आहे. भारत कुशल आणि सक्षम नेत्यांचा देश आहे. आपण घराण्याचा वारस शोधणे आणि बदलास घाबरणे सोडले, तर देश नेहमीच भविष्याची वाट धरू शकेल.

गेल्या काही काळापासून गेमस्टाॅप कंपनीच्या कथा चर्चेत आहेत. काही लहान व्यापाऱ्यांनी रेडिटवर मोठ्या हेज फंडांना धडा शिकवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी गेमस्टाॅपच्या शेअर्सवर एकाधिकार मिळवून केवळ लाखो कमावलेच नाहीत, तर रेडिट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीव्ह हफमॅन यांचे म्हणणे खरे ठरवले. ते म्हणायचे, की सामान्य लोकांत असामान्य शक्ती असते. त्यांना स्वत:ला जोडून घेण्यायोग्य उद्देश मिळला की त्यांच्यातील ही शक्ती दिसून येते. इथे सगळ्यांना न्यूयाॅर्क स्टाॅक एक्स्चेंज आणि गेमस्टाॅपच्या कथेविषयी माहिती नाही. त्यामुळे मी ओळखीचे उदाहरण देईन. ही ‘बिग बुली’ची कथा.

डोनाल्ड ट्रम्प यांचा भीतिदायक कालखंड संपणार नाही, असे वाटत असतानाच तो संपला. गर्विष्ठ, आत्ममग्न ट्रम्प यांना विश्व पटलावर गोंधळ घालताना, हवामान बदलावरील पॅरिस करार, इराणसोबतचा अणुकरार मोडताना, जागतिक आरोग्य संघटनेला सोडचिठ्ठी देताना आणि अनेक करार-मदार बाजूला सारताना पाहणाऱ्यांनी लोकांनी ट्रम्प यांना बाजूला सारले. गोऱ्या वर्चस्ववाद्यांसाठी ट्रम्प यांचा पाठिंबा वाढत गेला तसे अमेरिकेत ‘ब्लॅक लाईव्हज् मॅटर’ आंदोलनानेही वेग घेतला. यामुळे उदारमतवादी गोरे काळजीत पडले. ते गोऱ्या पोलिस अधिकारी डेरेक शाॅविनकडून झालेल्या आफ्रिकन-अमेरिकन जाॅर्ज फ्लॉइडच्या हत्येमुळेही नाराज होते. यामुळे ते ट्रम्प यांना केवळ गुंडच नाही, तर लांच्छनास्पद मानू लागले, अशी ट्रम्प यांची प्रतिमा नकारात्मक बनत गेली. विचारशील नेते, प्रसार माध्यमे, सिनेकलाकार, मोठ्या व्यक्ती, स्टॅण्डअप काॅमेडियन यांनी प्रश्न उपस्थित करणे सुरू केले. त्यामुळे मोठी मदत झाली. हळूहळू ट्रम्प यांनी पसरवलेली घाण कमी होऊ लागली आणि त्यांचे समर्थकही कमी झाले. त्यांच्यासोबत काही श्वेत कचरा आणि लालची सहकारी उरले. ट्रम्प यांनी निवडणुकीत फसवणुकीचा दावा केला आणि कॅपिटल हिलवरील हिंसाचाराच्या घटनेनंतर आणि जो बायडन यांच्या शपथविधीत सहभागी होण्यास नकार दिल्यानंतर रिपब्लिकन पक्षातील त्यांचे समर्थकही मागे हटले. अमेरिकन लोकांनी हिमतीने बायडन यांना मते दिली. राजकीय निवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेल्या या बुजुर्ग आणि कमजोर व्यक्तीला कोणी दमदार उमेदवार मानत नव्हते. पण, अमेरिकन लोकांनी बदल सर्वांत महत्वाचा मानला. मी याचा उल्लेख अशासाठी केला की आपल्या देशाला जवाहरलाल नेहरू हे पहिले पंतप्रधान लाभल्यानंतर नेहमीच प्रश्न उपस्थित केला जात असे की, नेहरूंच्या नंतर कोण? इंदिरा गांधींनी आणीबाणी पुकारल्यानंतर लोक नाराज झाले. त्यावेळीही हाच प्रश्न त्यांच्या समर्थकांनी पुढे आणला. त्यांनी पाकिस्तानचा पराभव केला, बांगलादेश बनवण्यात मदत केली. त्यांची जागा कोण घेऊ शकतो? असा प्रश्न जगभर विचारला गेला.

आपल्या देशात ही मोठी चर्चा आहे. आज आम्ही १३८ कोटी लोक आहोत. आपल्यातील काही विशिष्ट क्षेत्रांत वर्ल्ड लीडर आहेत. आपल्याकडे विज्ञान, तंत्रज्ञान, व्यवस्थापन, कला आदी प्रत्येक क्षेत्रात नोबेल, पुलित्झर, बुकर, आॅस्कर, फुकुओका, मॅगसेसे, एबेल असे पुरस्कार विजेते आहेत. आज अमेरिकेतील उच्च काॅर्पोरेशन भारतीय चालवत आहेत. तेथील उत्तम इस्पितळांमध्ये भारतीय डाॅक्टर आहेत. आणि आम्हाला काळजी वाटते की देशाचे नेतृत्व कोण करेल? आपला देश क्रियाशील प्रजासत्ताक आहे. इथे आजही संविधानाची मूल्ये जतन करणाऱ्या उत्तम संस्था आहेत.

सुदैवाने आतापर्यंत आपल्याला ट्रम्पसारखा कोणी मिळालेला नाही. इतिहासकार म्हणतील, तुघलक याच्या जवळ होता. अशा आहे, असा कोणी होणारही नाही. हे लक्षात ठेवले पाहिजे, की कोणत्याही लोकशाहीत भीती वाटता कामा नये. देशाला कोण सांभाळेल, याची चिंता न करता, कोणत्याही नेत्याला कधीही नाकारले जाऊ शकते. भारत अप्रतिम कौशल्ये, असामान्य बुद्धिमान आणि सक्षम नेत्यांचा देश आहे. भारताने घराण्याचा वारसदार शोधणे आणि बदलास घाबरणे सोडून दिले, तर देश नेहमीच भविष्याची वाट धरू शकेल. कोणत्याही कंपनीचे सीईओ असो वा मुख्यमंत्री, योगशिक्षक, राजकीय पक्षाचा प्रमुख, बँकर, राजदूत किंवा अणुशास्त्रज्ञ; तुम्ही कोणालाही शोधा, ते नेहमीच सापडतील. हीच लोकशाहीची पद्धत आहे. इथे सर्वांना यशाची संधी मिळत असते.

प्रीतीश नंदी, वरिष्ठ पत्रकार व चित्रपट निर्माता
pritishnandy@gmail.com

बातम्या आणखी आहेत...