आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • DVM Special : Lung And Heart Disease Increases In 45% Of People Recovering From Epidemic, Experts Worried About Increasing Non Infectious Diseases Like Stroke Diabetes

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:कोरोनातून बऱ्या झालेल्या 45% लोकांना फुप्फुस, हृदयाचे आजार जडले; स्ट्रोक-मधुमेह आदी रोग वाढल्याने तज्ज्ञ चिंतित

समीर राजपूत | अहमदाबादएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • लाइव्ह केस मधुमेह वाढला, फुप्फुसे कमकुवत झाली, थकवा, किडनीच्या धमन्या ब्लॉक
  • असंसर्गजन्य आजारांमुळे आता वाढू शकतो मृत्युदर

कोरोनातून बरे झालेल्या ४५% रुग्णांवर आता साइड इफेक्ट्स दिसू लागले आहेत. या रुग्णांना हायपरटेन्शन, सांधेदुखी, धाप लागणे, पक्षाघात, मधुमेह हे त्रास होत आहेत. अपोलो रुग्णालयाचे सीओओ डॉ. करण ठाकूर म्हणाले, देशात कोरोनापूर्वी असंसर्गजन्य रोगांमुळे रुग्णांचा मृत्युदर ७०% पेक्षा जास्त होता. मात्र आता अशा समस्या वाढल्याने मृत्युदर वाढण्याची शक्यता आहे.

मधुमेह नियंत्रणाच्या बाहेर

एका ६३ वर्षीय महिलेवर रक्तदाब, मधुमेह, थॉयरॉइडसारख्या को-मोर्बिड स्थितीमुळे आयसीयूमध्ये उपचार करण्यात आले. मधुमेह नियंत्रणाबाहेर गेल्याने पुन्हा ओपीडीत उपचार करावे लागले. फुप्फुसांची कार्यक्षमता मजबूत करण्यासाठी १५ दिवसांपर्यंत लंग्ज रिहॅब थेरपी देण्यात आली.

थकवा, नैराश्य, चिंता स्ट्रेसही

आयसीयू आणि व्हेंटिलेटरवर उपचार झाल्यानंतर १० पेक्षा जास्त रुग्ण बरे झाले. मात्र नंतर त्यांना नैराश्य, पोस्ट ट्रॉमॅटिक स्ट्रेस सिंड्रोम जडल्याचे आढळले. अशा रुग्णांना न्यूरोफिजिशियन आणि सायक्रियाटिक उपचारांची गरज भासते. नैराश्याच्या रुग्णांचे सरासरी वय ४० वर्षे होते.

मेंदूच्या नसमध्ये ब्लॉकेज

एका ४५ वर्षीय रुग्णाला कोविड वॉर्डातून डिस्चार्ज दिल्याच्या ६ दिवसांतच हा त्रास उद्भवला. त्याच्या शरीरातील उजव्या भागात दौर्बल्य आले होते. पक्षाघातामुळे मेंदूच्या एक नसमध्ये ब्लॉकेज झाल्याचे एमआरआयमध्ये आढळले. यानंतर हे ब्लॉकेज न्यूरोफिजिशियनने काढले.

सुटीच्या दोनच आठवड्यांत धाप लागण्याचा त्रास

३८ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची सामान्य लक्षणे होती. ऑक्सिजन द्यावा लागल्यानंतर ते १४ दिवसांत बरे झाले. नंतर दोनच आठवड्यांत त्यांना धाप लागू लागली. त्यांच्या फुप्फुसांत फायब्रोसिस झाला होता. ऑक्सिजन आणि फुप्फुंसाच्या व्यायामाने ते बरे झाले.

अति आत्मविश्वास बाळगू नका, प्रोटोकॉलचे पालन करा : तज्ज्ञ

डॉक्टर तेजस पटेल म्हणाले, निष्काळजीपणा नकाे. हा नव्या प्रकारचा रोग आहे. अति आत्मविश्वास जीवघेणा ठरू शकतो. मास्क घाला, हात धुवा आणि दोन मीटर अंतराच्या प्रोटोकॉलचे पूर्णपणे पालन करा.