आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्र आणि अमेरिकेत अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. दोन्ही ठिकाणी याची कारणे वेगळी आहेत.
महाराष्ट्रात मागणी जास्त पुरवठा कमी
राज्यात दररोज 2.25 कोटीहून जास्त अंड्यांची मागणी आहे. मात्र राज्यात अंड्यांचे दैनंदिन उत्पादन केवळ 1.25 कोटी आहे. त्यामुळे अंड्यांची मागणी जास्त आणि कमी पुरवठा आहे. म्हणूनच राज्यात सातत्याने अंड्यांच्या किंमती वाढत आहेत.
अमेरिकेत बर्ड फ्ल्यू आणि महागाई
काही दिवसांपूर्वी अमेरिकेत बर्ड फ्ल्यूचा प्रसार झाला होता. याशिवाय कोंबड्यांना खायला दिले जाणारे दाणे, तेल आणि वाढत्या मजुरीमुळे उद्योगाला नुकसान सहन करावे लागत आहे. यामुळे अमेरिकेत अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे आणि किंमती वाढल्या आहेत.
आज कामाच्या गोष्टीत जाणून घेऊया की, अंड्यांऐवजी खाण्यासाठी आणि स्वयंपाकासाठी काय वापरले जाऊ शकते. अंड्यांचे पोषण मूल्य किती आहे. एका दिवसात किती अंडी खाल्ली जाऊ शकतात आणि अंडी खाण्याने काही नुकसानही होते का?
प्रश्नः महाराष्ट्रात ही टंचाई कशी भरून काढली जात आहे?
उत्तरः महाराष्ट्रात कर्नाटक, तेलंगाणा आणि तमिळनाडूतून अंडी मागवली जात आहेत. याशिवाय राज्याचा पशूसंवर्धन विभाग अनुदान आणि इतर सुविधा देऊन अंड्यांचे उत्पादन वाढवण्याचे काम करत आहे. एका अंड्याचे पोषण मूल्य खालील पॉईंटसमधून समजून घ्या...
प्रश्नः तुमच्या राज्यातही अंड्यांचा तुटवडा निर्माण झाला तर त्याने काय अडचणी येऊ शकतात?
उत्तरः महाराष्ट्रात अंड्यांच्या किंमती वाढल्या आहेत, यामुळे
प्रश्नः बिस्किट, केक आणि बेकरीच्या दुसऱ्या गोष्टींत सहसा अंडे मिसळलेले असतात, त्याऐवजी काय टाकले जाऊ शकते?
उत्तरः स्वयंपाकात सामान्यपणे वेगवेगळे साहित्य बाईंड करण्यासाठी अंड्यांचा वापर केला जातो. अंड्यामुळे यात मऊपणा येतो. केक आणि ब्रेडसारख्या गोष्टी अंड्यामुळे फुलतात.
अंडे नसल्यास कुकिंगसाठी या गोष्टी वापरल्या जाऊ शकतात...
1. केळी
2. चिया आणि फ्लेक्ससीड
3. सिरका किंवा बेकिंग सोडा
4. दही किंवा ताक
5. अरारोड पावडर
6. कार्बोनेटेड वॉटर
7. भोपळा
8. बटाटे
9. ऑलिव्ह ऑईल
10. कॉर्नस्टार्च
प्रश्नः बालके, वृद्ध, गर्भवती महिला आणि प्रौढांनी एका दिवसात किती अंडी खाणे फायदेशीर आहे?
उत्तरः तुमच्या शरीराला प्रोटिनची किती गरज आहे यावर हे अवलंबून असते, की तुम्ही दिवसातून किती अंडी खाऊ शकता.
बालकेः लहान मुलांना एक किंवा दोन अंडी दिली जाऊ शकतात. मात्र त्यांना रोज अंडी देऊ नये. आठवड्यातून एक किंवा दोन वेळाच मुलांना अंडी द्या. प्रोटिनचे दुसरे स्रोत जसे दूध, डाळही द्या.
वृद्धः 1 किंवा 2 अंड्यांपेक्षा जास्त खाऊ नका. जास्त अंडी खाल्ल्याने पचनसंस्थेवर वाईट परिणाम होऊ शकतो. अंड्याचा पांढरा भाग खाणे चांगले ठरेल.
गर्भवती महिलाः यांनी अंड्याचा पांढरा भाग खाल्ला पाहिजे. फर्स्ट ट्रायमेस्टरनंतर त्यांना जास्त प्रोटिनची गरज भासते. 1 किंवा 2 अंड्यांपेक्षा जास्त खाल्ल्याने अपचनाची समस्या होऊ शकते.
प्रौढः बॉडी बिल्डिंग करणाऱ्या प्रौढांनी अंड्याचा पांढरा भाग खाल्ला पाहिजे. जर जिममध्ये जात नाही तर दिवसातून 3 ते 4 अंड्यांपेक्षा जास्त खाऊ नये.
नोटः अंडी खाण्याची सर्वात चांगली पद्धत ती उकडून खाणे ही आहे.
प्रश्नः अंडे सडलेले आहे की चांगले ते कसे ओळखावे?
उत्तरः अंडे सडलेले आहे की चांगले हे दोन प्रकारे ओळखले जाऊ शकते...
पाण्यात बुडवून ओळखले जाऊ शकते. यासाठी मोठ्या ग्लासचा वापर करू शकता. यात अंडे टाकल्यावर जर ते आडवे पाण्यात बुडाले तर ते फ्रेश आहे. जर ते आडवे झाले आणि तळाच्या थोडे वर राहिले तर थोडे जुने आहे. जर अंडे वर तरंगायला लागले तर सडले आहे.
फोडून कळू शकते की अंडे ताजे आहे की जुने. जर अंडे सडले असेल तर पिवळा भाग पांढऱ्या भागात मिसळलेला असतो. तो तुम्ही वेगळा करू शकणार नाही. तर फ्रेश अंड्यात पिवळा आणि पांढरा भाग वेगळा राहतो.
आता बोलुया अंड्याविषयीच्या मिथकांवर...
मिथकः अंड्यात कोलेस्ट्रॉल खूप जास्त असते.
तथ्यः अंड्यात कोलेस्ट्रॉल असते आणि ह्रदयाशी संबंधित आजारांचा सामना करणाऱ्यांनी दररोज अंडे खाल्ले नाही पाहिजे. सोबतच असे अनेक पदार्थ आहेत ज्यांच्यात ट्रान्सफॅट आणि सॅच्युरेटेड फॅट जास्त असतात. त्यानेही कोलेस्ट्रॉल वाढतो. ह्रदयाच्या आजाराचा सामना करणाऱ्या लोकांनी अंड्याचा पांढरा भाग खाल्ला पाहिजे.
मिथकः प्रत्येक अंड्यात बेबी चिकन असते.
तथ्यः असे नाही. केवळ फर्टिलाईज्ड अंड्यांमध्ये बेबी चिकन असते. ह्युमन कंझम्पशन म्हणजेच मानवांना खाण्यासाठी उत्पादित केलेली अंडी फर्टिलाईज्ड नसतात.
मिथकः मासिक पाळीदरम्यान अंडी खाऊ नये.
तथ्यः हे पूर्णपणे चुकीचे आहे. मासिक पाळीदरम्यान अंडी खाल्ली जाऊ शकतात.
मिथकः कच्चे अंडे खाणे फायदेशीर असते.
तथ्यः नाही, कच्च्या अंड्यात अनेक हानिकारक बॅक्टेरिया असतात. तुम्ही साल्मोनेला बॅक्टेरियाच्या विळख्यात येऊ शकतात. यामुळे फूड पॉईझनिंग होऊ शकते. याशिवाय पोटात मुरडा, डायरिया, उलटी आणि तापाची समस्या येऊ शकते.
मिथकः अंड्याचा पिवळा भाग खाल्ल्याने वजन वाढते.
तथ्यः अंड्याचा पिवळा भाग फॅट असतो. हा खाल्ल्याने वजन वाढू शकते.
मिथकः रोज अंडी खाल्ली जाऊ शकत नाही.
तथ्यः एका मर्यादेत तुम्ही रोज अंडे खाऊ शकता.
आजचे आमचे तज्ज्ञ आहेत डॉ. बालकृष्ण, कन्सल्टन्ट, फिजिशियन आणि हार्ट स्पेशालिस्ट आणि डॉ. रीमा हिंगोरानी, न्युट्रिशनिस्ट.
जाता-जाता
केवळ कोंबडीच नव्हे या जनावरांची अंडीही खाण्यासाठी वापरली जाऊ शकतात...
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.