आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराएकनाथ शिंदे यांनी गुरूवारी 42 आमदारांचा एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून ते आता खरी शिवसेना असल्याचा दावा करत आहेत. यानंतर शिंदे गटाचे आमदार महाविकास आघाडीपासून वेगळे होऊन भारतीय जनता पक्षासोबत सरकार स्थापन करू करतील, असे मानले जात आहे. शिंदे गटाचे नेते भाजपसोबत उभे राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. 2014 मध्येही अशीच परिस्थिती निर्माण झाली होती आणि भाजपसोबत जाण्यावरून शिवसेनेत बंडखोरी झाली होती आणि त्यानंतर उद्धव यांना बंडखोरांची मागणी मान्य करावी लागली होती.
दिव्य मराठी नेटवर्कने 2014 च्या तसेच आजच्या परिस्थितीची तुलना करून तपास केला. त्यासाठी तुम्ही आमचे हे विशेष वृत्त वाचा…
2014 मध्येही फडणवीस यांच्या नावावर उद्धव यांचा आक्षेप होता
माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत काम केलेल्या एका माजी अधिकाऱ्याने सांगितले की, 2014 च्या निवडणुकीत शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वतंत्रपणे लढले होते.
शिवसेनेला 63 तर भारतीय जनता पक्षाला 122 जागा मिळाल्या. निवडणुकीनंतर भाजपला शिवसेनेसोबत पुन्हा सत्तेत यायचे होते, मात्र अडीच वर्षे मुख्यमंत्रीपदासाठी चढाओढ सुरूच होती. तसंच फडणवीस यांच्या नावावरही उद्धव यांना आक्षेप होता. नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व्हावे अशी त्यांची इच्छा होती.
2014 मध्ये शिंदे गटाच्या 25 आमदारांनी केले होते बंड
निवडणूक प्रचारादरम्यान उद्धव यांच्या वतीने फडणवीस आणि भाजपवर जोरदार चिखलफेक करण्यात आली. उद्धव यांना फडणवीसांसोबत जावेसे वाटले नसेल, पण असे सुमारे 25 आमदार होते जे भाजपसोबत सरकार स्थापन करण्याच्या निर्णयावर ठाम होते.
हे सर्व आमदार एकनाथ शिंदे गटाचे होते. त्यावेळी पक्षाच्या अंतर्गत बैठकीत काही आमदारांनी भाजपसोबत सरकार स्थापन न केल्यास शिवसेनेशी फारकत घेण्याचे संकेतही दिले होते.
राष्ट्रवादीच्या प्रवेशाने समीकरण बदलले
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मोठे कार्ड खेळत महाराष्ट्रात सरकार स्थापन करण्यासाठी भाजपला बाहेरून पाठिंबा जाहीर केला. त्यावेळी राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल म्हणाले होते, "केंद्रातही भाजपचे सरकार आहे, त्यामुळे येथेही स्थिर सरकारसाठी राष्ट्रवादी भाजपला बाहेरून पाठिंबा देण्यास तयार आहे."
पक्षाच्या आमदारांच्या दबावामुळे, पक्ष कोलमडून पडू नये आणि राष्ट्रवादीच्या पुढाकारानंतर अखेर उद्धव ठाकरेंना नमते घ्यावे लागले आणि त्यांनी भाजपला पाठिंबा देण्याचे मान्य केले.
एकत्र राहूनही उद्धव गट भाजपला विरोध करत
महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीने सरकार स्थापन केले, पण हे दोन्ही पक्ष एकमेकांच्या भांडणामुळे नेहमीच चर्चेत राहिले. भाजपच्या राजकीय आणि आर्थिक धोरणांविरोधात उद्धव गटाचे नेते नेहमीच आक्रमक राहिले आहेत.
त्यामुळेच शिवसेनेची तुलना विरोधी पक्षाशी करण्यात आली. नोटाबंदीचा निर्णय असो किंवा मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन सुरू करण्याचा निर्णय असो किंवा मुंबई मेट्रोच्या आरे कारशेडचा विरोध असो, उद्धव गटातील शिवसेना नेते अनेकदा भाजपच्या विरोधात दिसले. सरकारवरही भ्रष्टाचाराचे आरोप होऊन राजकीय उलथापालथ झाली.
2014 मध्येही उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री व्हायचे होते
भाजप आणि शिवसेना या दोघांनाही आपल्या विजयाची खात्री असल्याने त्यांना अधिक जागा हव्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या निकालाने भाजप उत्साहात असतानाच शिवसेनेने मोदी लाट संपल्याचे सांगितले. तसेच राज्यात शिवसेनेचाच जास्त प्रभाव असल्याचा दावा केला.
जुलै 2014 मध्ये शिवसेनेचे युवा शाखा प्रमुख आदित्य ठाकरे यांनी 'मिशन 150' लाँच केल्यावर दोघांमधील वाद सुरू झाला. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री करणे हा या मिशनचा उद्देश होता. भाजपला ही गोष्ट आवडली नाही आणि तेव्हापासून हा वाद सुरूच आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.