आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Elections In Bengal Are Nine Months Away, But The Politics Of Leaflets And Placards Are Also In Corona

देशाचा आँखों देखा हाल:बंगालमध्ये निवडणूक नऊ महिने दूर मात्र कोरोनातही पत्रके, फलकांचे राजकारण

कोलकाताहून शशी भूषण3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
भाजप आमदार देवेंद्र नाथ रॉय यांच्या हत्येनंतर कोलकातामध्ये निदर्शने करण्यात आली.
  • कोरोनाने त्रस्त प. बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीचे वातावरण

पश्चिम बंगाल सध्या कोरोनाने त्रस्त आहे. राजधानी कोलकाता आणि हावडासह काही जिल्ह्यांत संसर्गाची स्थिती चिंताजनक आहे. पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीने वेग घेतला आहे. शहरात ‘बांग्लार गर्बो ममता’चे पोस्टर लागले आहेत. व्हर्च्युअल रॅली सुरू आहेत. भाजप आमदार देवेंद्रनाथ रॉय यांचा मृतदेह आढळल्याने सोमवारी दोन्ही पक्षांमधील वातावरण पुन्हा तापले. प्रदेश समितीप्रमाणेच भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनीही ही हत्या असल्याचे सांगत ममता सरकारवर हल्ला चढवला. ममता केंद्र सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करतात.

राज्यात सर्वकाही पंतप्रधान मोदी, मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आणि दोघांवर ‘माता’ (माझी माणसे, तुझी माणसे) याभोवती फिरत आहे. ‘माता’ची गोष्ट यासाठी की, येथे पक्ष प्रत्येक व्यक्तीला कोणत्या ना कोणत्या पक्षाचा मानतात. आदिवासी आणि दलितांमध्ये सक्रिय रंजितकुमार राय सांगतात की, लोक भाजप आणि टीएमसी दोघांवर नाराज आहेत. कोरोनासारख्या बिकट स्थितीत लोकांच्या समस्या कमी करण्याऐवजी दोन्ही पक्ष आपल्या राजकीय भाकरी भाजत आहेत. भाजपचे कार्यकर्ते घरोघरी जात पत्रके वाटत आहेत तर तृणमूल शहरात ममताची पोस्टर लावत आहेत. दुसरीकडे भाजपच्या मोठ्या नेत्यांच्या व्हर्च्युअल सभा विधानसभानिहाय सुरू आहेत. या सभांमध्ये मुख्य मुद्दा कोरोनाशी लढण्यासाठी पंतप्रधान मोदींनी जाहीर केलेले २० लाख कोटींचे पॅकेज आणि ममता सरकारचे अपयश आहे. अशाच सभांद्वारे तृणमूलची बूथपर्यंत जाण्याची तयारी आहे. टीएमसीच्या रणनीतीला पडद्यामागून प्रशांत किशोर आकार देत आहेत. प तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांना अपेक्षा आहे की, तृणमूल व भाजपकडे गेलेले त्यांचे लोक परत येतील. लोकसभा निवडणुकीत दोन्ही पक्षांची २०.६९% मते घटली होती. उत्तर चोवीस परगणा जिल्ह्यातील वकील रामजित राम यांचे मत आहे की, येत्या विधानसभा निवडणुकीत घोटाळ्याचे सर्व जुने विक्रम मोडले जातील. धनशक्ती, बळाचा उघडपणे वापर होईल. ममतांना आव्हानांना तोंड द्यावे लागेल, त्यांच्यासाठी सत्ता वाचवणे सोपे नाही.

आक्रमक नव्हे, तर ममता दीदीची सावध भूमिका

गेल्या लोकसभा निवडणुकीत ममता बॅनर्जींना जो धक्का बसला त्यातून त्या अजून सावरलेल्या नाहीत. सध्याची राजकीय स्थिती अशी आहे की दीदी भाजप व केंद्रावर आक्रमक जेवढ्या दिसताहेत त्यापेक्षा जास्त सावध पवित्र्यात आहेत. नाट्यकलाकार महेश जायस्वाल यांचे म्हणणे आहे की, या वेळी िवधानसभा निवडणुकीत ममता काँग्रेस आणि डाव्या पक्षांशी आघाडी करू शकतात.

बंगालमध्ये निवडणूक हिंसाचाराचा इतिहास खूप जुना

सोमवारी पश्चिम बंगालच्या हेमताबाद आमदार देवेंद्रनाथ रॉय (५९) यांचा मृतदेह आढळला. भाजपचा आरोप आहे की, त्यांची हत्या करण्यात आली. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सांगितले की, ममता बॅनर्जी सरकारमध्ये गुंडाराज आहे. कायदा व सुव्यवस्था ढासळली आहे. अशा सरकारला लोक माफ करणार नाहीत, असा आरोप केला. बंगालमध्ये दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये हिंसाचाराच्या घटना आधीही झाल्या आहेत. निवडणूक जशी जवळ येईल तशा या घटना वाढतील असे राजकीय तज्ञांचे म्हणणे आहे.