आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक्सप्लेनर:देशाला मिळणार 200 किमी लांबीचा पहिला इलेक्ट्रिक हायवे, जाणून घ्या यावर वाहने कशी धावतील ? आणि त्याचा सामान्यांना कसा फायदा होईल?

आबिद खानएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • याविषयी जाणून घ्या सविस्तर...

देशाला लवकरच पहिला इलेक्ट्रिक हायवे मिळू शकतो. दिल्ली आणि जयपूर दरम्यान इलेक्ट्रिक हायवे बांधण्याची सरकारची तयारी आहे.केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच राजस्थानच्या दौसा येथे याची घोषणा केली. या महामार्गावर सर्व इलेक्ट्रिक वाहने धावतील. यामुळे पैशाची बचत होईल आणि प्रदूषणही कमी होईल. केंद्रीय मंत्र्यांची ही घोषणा देशातील इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याच्या मार्गातील एक मोठे पाऊल मानले जात आहे.

इलेक्ट्रिक हायवे म्हणजे काय? हे कसे कार्य करते? याचा सामान्यांना कसा फायदा होईल? आणि जगात इलेक्ट्रिक हायवेवर कुठे काम चालू आहे?, याविषयी जाणून घ्या सविस्तर...

सर्वप्रथम, इलेक्ट्रिक हायवे म्हणजे काय ते जाणून घेऊया?

सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे, असा महामार्ग ज्यावर इलेक्ट्रिक वाहने चालतात. तुम्ही ट्रेनच्या वरच्या बाजूला एक विद्युत तार पाहिली असेल. रेल्वेच्या इंजिनला ही वायर एका आर्मच्या सहाय्याने जोडलेली असते, ज्यामधून संपूर्ण रेल्वेला वीज मिळते. तसेच महामार्गावर विद्युत ताराही लावण्यात येतील. महामार्गावरून जाणाऱ्या वाहनांना या तारांमधून वीज मिळणार आहे. याला ई-हायवे म्हणतात, म्हणजे इलेक्ट्रिक हायवे. या महामार्गावर इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी ठराविक अंतरावर चार्जिंग पॉईंट देखील असतील.

तो कोठे बांधला जात आहे?

नितीन गडकरी यांनी जाहीर केले आहे की, देशातील पहिला ई-हायवे दिल्ली आणि जयपूर दरम्यान बांधला जाईल. 200 किमी लांबीचा हा महामार्ग दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेसह नवीन लेनवर बांधला जाईल. ही लेन पूर्णपणे इलेक्ट्रिक असेल आणि त्यावर फक्त इलेक्ट्रिक वाहने चालतील. सरकार यासाठी स्वीडिश कंपन्यांशी चर्चा करत आहे. संपूर्ण तयार झाल्यानंतर हा देशातील पहिला ई-हायवे असेल.

ई-हायवेचे सामान्यांसाठी काय फायदे आहेत?

  • ई-हायवेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यात वाहनांचा खर्च कमी असेल. नितीन गडकरी म्हणाले होते की, ई-हायवेमुळे लॉजिस्टिक खर्च 70%कमी होईल. सध्या वस्तूंच्या किमती वाढण्याचे एक प्रमुख कारण म्हणजे वाहतूक खर्च. जर वाहतूक खर्च कमी झाला तर वस्तू स्वस्त होऊ शकतात.
  • हे पूर्णपणे पर्यावरणपूरक असतील. वाहने चालवण्यासाठी विजेचा वापर केला जाईल, जे पेट्रोल आणि डिझेलपेक्षा स्वस्त असेल आणि पर्यावरणासाठी कमी हानिकारक असेल.
  • पेट्रोल आणि डिझेलवरील अवलंबित्व कमी होईल. महागड्या पेट्रोल आणि डिझेलमुळे वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. याव्यतिरिक्त, पेट्रोल आणि डिझेल देखील पर्यावरणासाठी हानिकारक आहे.

इलेक्ट्रिक हायवे कसे काम करतात?

जगभरात ई-हायवेसाठी तीन वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञान वापरले जाते. भारत सरकार स्वीडिश कंपन्यांशी चर्चा करत आहे, त्यामुळे असे मानले जाते की स्वीडनमध्ये वापरले जाणारे तंत्रज्ञान भारतातही असेल.

पॅन्टोग्राफ मॉडेल स्वीडनमध्ये वापरले जाते, जे भारतातील गाड्यांमध्ये देखील वापरले जाते. यामध्ये, रस्त्याच्या वर एक वायर ठेवली जाते, ज्यामध्ये वीज वाहते. ही वीज वाहनाला पॅन्टोग्राफद्वारे पुरवली जाते. ही वीज थेट इंजिनला शक्ती देते किंवा वाहनातील बॅटरी चार्ज करते.

याशिवाय, कंडक्शन आणि इंडक्शन मॉडेल देखील वापरले जातात. कंडक्शन मॉडेलमध्ये वायर रस्त्याच्या आत बसवली जाते, ज्यावर पॅन्टोग्राफ स्पर्श करत चालतो.

कंडक्शन मॉडेलवर तयार केलेला ई-हायवे. यामध्ये वाहनाच्या मागील भागामध्ये पॅन्टोग्राफ लावण्यात आला आहे, जो रस्त्यावर टाकलेल्या विद्युत तारांपासून पुरवठा घेतो.
कंडक्शन मॉडेलवर तयार केलेला ई-हायवे. यामध्ये वाहनाच्या मागील भागामध्ये पॅन्टोग्राफ लावण्यात आला आहे, जो रस्त्यावर टाकलेल्या विद्युत तारांपासून पुरवठा घेतो.

तिसरे मॉडेल इंडक्शन मॉडेल आहे. त्यात कोणतेही वायर नसते. विद्युत चुंबकीय प्रवाहाद्वारे वाहनाला वीज पुरवली जाते.

इंडक्शन मॉडेलमध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्राद्वारे वाहनाला वीज पुरवली जाते. हे फार क्वचितच वापरले जाते.
इंडक्शन मॉडेलमध्ये विद्युत चुंबकीय क्षेत्राद्वारे वाहनाला वीज पुरवली जाते. हे फार क्वचितच वापरले जाते.

स्वीडन आणि जर्मनीमध्ये वापरल्या जाणाऱ्या इलेक्ट्रिक वाहनांमध्ये हायब्रीड इंजिन असते, म्हणजेच ते विजेवर तसेच पेट्रोल आणि डिझेलवरही चालू शकतात.

ई-हायवेवर कार-जीपसारखी वैयक्तिक वाहनेही चालवता येतील का?
स्वीडन, जर्मनीसारख्या देशांमध्ये त्यांचा वापर फक्त लॉजिस्टिक वाहतुकीसाठी केला जातो. वैयक्तिक वाहने जसे कार, जीप विजेवर चालतात, परंतु ती बॅटरीने ऑपरेट केली जातात. थेट पुरवठा फक्त ट्रक आणि सार्वजनिक वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या वाहनांमध्ये केला जातो. जर तुमचे वैयक्तिक वाहन इलेक्ट्रिक असेल तर तुम्ही या महामार्गाचा वापर करू शकाल. तुमच्या सोयीसाठी, प्रत्येक कमी अंतरावर एक चार्जिंग स्टेशन असेल, जिथे तुम्ही तुमचे वाहन चार्ज करू शकता.

या कामात कोणती आव्हाने आहेत? तेही समजून घ्या

  • पायाभूत सुविधा विकसित करणे हे सर्वात मोठे आव्हान आहे. इलेक्ट्रिक हायवे बांधण्याची किंमत सामान्य रस्त्याच्या तुलनेत जास्त असते. तसेच, सुरुवातीला देशभरात महामार्गांचे असे जाळे निर्माण करणे हे मोठे आव्हान आहे. हे काम खूप महाग आहे आणि त्यासाठी खूप वेळही लागतो.
  • केवळ इलेक्ट्रिक महामार्ग बांधणे पुरेसे नाही. त्यांच्यावर चालण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनेही असायला हवीत. पेट्रोल-डिझेलवर चालणारी वाहने इलेक्ट्रिक वाहनांमध्ये रिप्लेस करण्यास अनेक वर्षे लागू शकतात.
  • इलेक्ट्रिक वाहनांसाठी बॅटरी बनवणे हे एक अतिशय कठीण काम आहे. या प्रक्रियेदरम्यान अनेक धोकादायक रसायने सोडली रिलीज होतात. वापर केल्यानंतरही ते पर्यावरणासाठी हानिकारक आहे. पर्यावरण कार्यकर्त्यांनी हा प्रश्न अनेक वेळा उपस्थित केला आहे. तसेच, वाहनातील बॅटरी महाग असतात.

जगातील इतर कोणत्या देशात ई-हायवे आहे?
स्वीडन आणि जर्मनीमध्ये इलेक्ट्रिक हायवे वापरले जात आहेत. ई-हायवे सुरू करणारा स्वीडन हा जगातील पहिला देश आहे. स्वीडनने 2016 मध्ये ई-हायवे चाचण्या सुरू केल्या आणि 2018 मध्ये पहिला ई-हायवे सुरु केला.

स्वीडननंतर जर्मनीने 2019 मध्ये इलेक्ट्रिक हायवे सुरू केला. हा महामार्ग 6 मैल लांब आहे. या महामार्गाशिवाय जर्मनीने बसेससाठी वायरलेस इलेक्ट्रिक रस्ता देखील तयार केला आहे. स्वीडन आणि जर्मनीमध्ये सार्वजनिक वाहनांमध्ये इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी स्वतंत्र प्रकल्प सुरू आहेत. ब्रिटन आणि अमेरिकेतही ई-हायवेचे काम सुरू आहे.

बातम्या आणखी आहेत...