आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Emotional Intelligence Importance In Career; Emotional Intelligence | Succesful Career | Career Guidance

दिव्य मराठी एक्सक्लूझिव्हजीवनमंत्र VIDEO:करिअरमध्ये यश मिळवून देणारी भावनिक बुद्धिमत्ता असते काय, तिचा वापर कसा करावा?

मनोज कुलकर्णी । औरंगाबाद24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जगातले अनेक कीर्तीवंत नापास झालेत. अनेकांना दहावी आणि बारावीच्या पुढे सरकताच आले नाही. मात्र, तरीही टॉपर विद्यार्थ्यांच्या कैकपट यश त्यांनी मिळवले. हे बुद्ध्यांकामुळे (Intelligence quotient) नव्हे, तर केवळ भावनिक बुद्धिमत्तेमुळे (Emotional Intelligence) घडले.

मग आपल्या करिअरमध्ये, यशात आणि प्रगतीत अत्यंत महत्त्वाची असणाऱ्या या भावनिक बुद्धिमत्तेची भानगड असते काय? तिचा वापर कसा करावा, हे जीवन मंत्र या सीरिजमध्ये आपल्याला सांगणार आहेत, या विषयाचे तज्ज्ञ किशन वतनी.

यशात किती योगदान?

अतिशय महत्त्वाचे कौशल्य म्हणून भावनिक बुद्धिमत्तेकडे पाहिले जाते. आपल्या यशात महत्त्वाचे योगदान हे भावनिक बुद्धिमत्तेचे असते. एका संशोधनानुसार आपल्यातल्या 90 टक्के लोकांची भावनिक बुद्धिमत्ता ही चांगली असते. त्यातल्या 70 टक्के लोकांचा बुद्ध्यांक सरासरी असतो. म्हणजे ते गोडमेडलिस्ट नाहीत. टॉपर नाहीत. फार हुशार नाहीत. बॅक बेंचर्स आहेत. एखाद्या वेळेस फेल झालेत. मात्र, भावनिक बुद्धिमत्ता चांगली असली ना यश मिळण्याची शक्यता खूप जास्त असते.

थोडा अपरिचित शब्द

भावनिक बुद्धिमत्तेला ईक्यू (Emotional Intelligence) म्हणतात. बऱ्याच जणांना याबद्दल वैज्ञानिक माहिती नाही. आपल्याला परिचित शब्द आहे आयक्यू (Intelligence quotient). आपण बुद्धिमत्तेवर प्रचंड फोकस करतो. आपण सुरुवातीला भावनांक (EQ) आणि बुद्ध्यांक (IQ) म्हणजे काय ते पाहू. त्यानंतर टप्प्याटप्प्याने या विषयाची उकल करू.

अशी होते मोजणी

आयक्यू म्हणजे इंटलिजिन्स कोशंट. ईक्यू इमोशनल इंटलिजिन्स. एखादी गोष्ट समजून घेणे आणि त्याचे लॉजिकल उत्तर देता येणे, ही जी आपल्या बुद्धीची क्षमता असते त्याला आपण मेंदूचा इंटिलिजिन्स म्हणतो. काय तर गोष्टी समजून त्याचे लॉजिकल उत्तर देता आले पाहिजे. हे सारे विज्ञान, गणित किंवा इतर कोणत्याही विषयात झाले, तर तो झाला आयक्यू.

भावनेवर भर द्या

आता हीच समज भावनेच्या बाबतीत असेल? म्हणजे भावना आपल्याला समजल्या पाहिजेत. त्यांचा लॉजिकल उपयोग करून घेता आला पाहिजे. ही भावनिक बुद्धिमत्ता. आता आजपर्यंत आपल्या शिकवले किंवा असे शिकत आलो की, प्रॅक्टिकल व्हा. भावना बाजूला ठेवा. मग भावना का समजून घ्यायच्यात? कारण कुठल्याही यशामध्ये भावनिक बुद्धिमत्तेचे योगदान 53 टक्के आहे. तर आयक्यू अर्थातच बुद्धिमत्तेचे योगदान फक्त 14 टक्के. आहे की नाही कमाल.

प्रमाण खूप कमी

कधीकाळी आपल्याला वाटायचे आयक्यूमुळेच आपल्याला यश मिळते. त्यामुळे आपली सर्व शिक्षण पद्धती आयक्यू ओरिएंटेड आहे. शाळेमध्ये सुद्धा मुलांचा आयक्यू चेक करतात. चांगले गुण असतील, तर त्याचा आयक्यू चांगला आहे. मात्र, चांगले मार्क असतील, तर मुलांना यश मिळते का? याचे प्रमाण खूप कमी आहे.

थोडे सजग व्हा

आपल्या यशात 53 टक्के योगदान असणाऱ्या भावनिक बुद्धिमत्तेबद्दल आपल्याला फारसे माहितीच नाही. मात्र, ज्या आयक्यूचे योगदान फक्त 14 टक्के आहेत, त्याबद्दल बरीच माहिती असते.आहे. तर आयक्यू अर्थातच बुद्धिमत्तेचे योगदान फक्त 14 टक्के आहे. हाच धागा पकडून आपण हा विषय उलगडणार आहोत. भावनिक बुद्धिमत्तेचे वेगवेगळे अंग...उपयोग पाहणार आहोत.

(टीपः भावनिक बुद्धिमत्तेचा विषय सविस्तर समजून घेण्यासाठी बातमीतला व्हिडिओ जरूर पाहा.)

बातम्या आणखी आहेत...