आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोरोना संकट:कोरोनाच्या संकटातही घरांच्या किमती फार कमी होण्याची शक्यता नाही

औरंगाबादएका वर्षापूर्वीलेखक: महेश जोशी
  • कॉपी लिंक
  • फार तर ३ ते ५ टक्के दर घटण्याचा अंदाज

कोरोनाच्या संकटामुळे जगभराची आर्थिक नाकेबंदी झाली असली तरी त्याचा बांधकाम क्षेत्रावर फार परिणाम पडण्याची शक्यता नाही. कोराेनानंतर भारतातील मालमत्तांच्या किंमतीत फारतर ३ ते ५ टक्क्याचीच घट होऊ शकते, असे एका जागतिक पाहणीचा अंदाज आहे. ही घट पुढील वर्षापर्यंत कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कोराेनानंतर मालमत्तांच्या किमतीत मोठी घसरण होण्याची शक्यता नाइट फ्रँकच्या प्राइम ग्लोबल रेसिडेन्शियल फोरकास्टने बुधवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालाने चुकीची ठरवली आहे. या अहवालात २० प्रमुख शहरांच्या २०२० आणि २०२१ मधील अपेक्षित स्थितीचा अभ्यास केला आहे. यासाठी सरकारने जाहीर केलेल्या उपाययोेजना लक्षात घेण्यात आल्या.

या अहवालनुसार जगात पहिल्यांदाच आर्थिक अनिश्चितता निर्माण झाली आहे. २०२० मध्ये जगभरात मालमत्तांचे दर वाढतील अशी सकारात्मक चिन्हे दिसत होती. पण कोविडमुळे या क्षेत्राची वाढ घटली आहे. आम्ही अभ्यास केलेल्या २० शहरांपैकी १६ शहरांमध्ये २०२० मध्‍ये मालमत्तांचे दर कमी होणार आहेत. मुंबईसह राज्यातील प्रमुख शहरातल्या निवासी मालमत्तांच्या दरात २०२० मध्ये ५ टक्के तर २०२१ मध्ये ३ टक्के घट होण्याची शक्यता आहे. कोरोनानंतर घरापासून रेल्वे किंवा रस्तेमार्गाने सहज पोहोचता येईल अशा ठिकाणी घर खरेदीला पसंती मिळेल. दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय तसेच भांडवलाचा साठा म्हणून मालमत्तेचे आकर्षण कायम राहील. विक्रीचे आकडे उसळी घेतील पण दीर्घकालीन सरासरीच्या खालीच राहतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

ग्राहकांना फायदा होणार

कोरोनाचे परिणाम बांधकाम क्षेत्रातही जाणवणार आहेत. भारतातील प्रमुख बाजारपेठांमध्येही अनिश्चिततेचा प्रभाव राहणार आहे. हातात पैसा नसल्याने ग्राहकाचा आत्मविश्वास ढासळला आहे. यामुळे मालमत्तांच्या दरात ५ टक्क्यापर्यंत घसरण होईल. नवीन किंवा सेकंड होमचा विचार करणाऱ्यांसाठी ही संधी असेल. -शिशिर बैजल, अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँकचे इंडिया

बातम्या आणखी आहेत...