आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इअरफोन ठरु शकतो घातक:वायरलेस इयरबडचा वापर आरोग्यासाठी आहे धोकादायक; यामुळे वाढतो मेंदूचा कर्करोग आणि बहिरेपणाचा धोका, जाणून घ्या कसा करावा बचाव

4 महिन्यांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घ्या सविस्तर...

ब्लूटूथ हेडफोनचे चलन सतत वाढत आहे. बाजारात अनेक प्रकारचे नवीन एअरपॉड्स, इयरबड्स आणि वायरलेस नेकबँड्स उपलब्ध आहेत. लहान ब्लूटूथ हेडफोन हँडी आणि वायरलेस असल्याने त्याचा वापर सोपा होतो. परंतु त्यांच्याद्वारे उत्सर्जित होणारे रेडिओ फ्रिक्वेंसी (आरएफ) रेडिएशन आरोग्यास मात्र मोठी हानी पोहोचवते. एका संशोधनानुसार, ब्लूटूथ इयरबड्सचा जास्त वापर केल्याने मेंदूच्या कर्करोगाचा धोका वाढू शकतो.

अमेरिकेच्या कोलोराडो विद्यापीठातील बायोकेमिस्ट्रीचे प्राध्यापक जेरी फिलिप्स यांच्या संशोधनानुसार, ब्लूटूथ किंवा वायरलेस हेडफोनमुळे मेंदूच्या कर्करोगाचा धोका वाढतो. इयरबड्समधून बाहेर पडणाऱ्या लाटा ब्रेन टिश्यूंना नुकसान पोहोचवतात. या व्यतिरिक्त यामुळे न्यूरोलॉजिकल, आनुवंशिक विकारांसारखे गंभीर आजार देखील होऊ शकतात. वायरलेस हेडफोन्सच्या अति वापरामुळे स्मृती देखील गमावली जाऊ शकते. मुले आणि गर्भवती महिलांना याचा सर्वाधिक धोका असतो.

वायरलेस इयरबडचा वारंवार किंवा दीर्घकाळ वापर धोकादायक का आहे?

ब्लूटूथ रेडिओ फ्रिक्वेंसी (आरएफ) रेडिएशनच्या मदतीने फोन किंवा इतर उपकरणांना जोडतो. या कारणास्तव, ब्लूटूथ हेडफोनमध्ये केबल किंवा वायर नसतात. वायरलेस असल्याने, लहान इयरबडच्या मदतीने चालताना, व्यायाम करताना किंवा इतर गोष्टी करताना बोलणे किंवा गाणे ऐकणे सोपे होते.

इयरबड्समधून बाहेर पडणाऱ्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक फ्रिक्वेंसीमुळे आपल्या शरीराला खूप नुकसान होते. जेरी फिलिप्स यांच्या संशोधनापूर्वी, सुमारे 42 देशांतील 247 शास्त्रज्ञांनी वायरलेस उपकरणांमधून उत्सर्जित इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डशी संबंधित आरोग्य परिणामांविषयी संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटने(डब्ल्यूएचओ) कडे याचिका दाखल केली होती, ज्यात वायरलेस उपकरणांमधून उत्सर्जित इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्डशी संबंधित आरोग्य परिणामांविषयी सांगितले गेले होते.

शास्त्रज्ञांच्या मते, लहान हेडफोनच्या रेडिएशनमुळे ब्रेन टिश्यूंचे नुकसान होऊ शकते. दीर्घकालीन वापरामुळे मेंदूचा कर्करोग होऊ शकतो. कारण लहान इअरबड्स कानाच्या आत घातलेले असतात. या कारणास्तव ब्लूटूथमधून बाहेर पडणारे रेडिएशन कान आणि मेंदू दोघांसाठीही धोकादायक ठरू शकते.

लहान ब्लूटूथ हेडफोनचे धोके काय आहेत?

 1. न्यूरोलॉजिकल आजार: सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशनच्या अहवालानुसार, नॉन-आयोनायझिंग रेडिएशनच्या डायरेक्ट कॉन्टॅक्टमुळे ब्रेन टिश्यूंचे नुकसान होऊ शकते, जे न्यूरोलॉजिकल आजारांना कारभीभूत ठरते.
 2. मेंदूचा कर्करोग: इयरबड्समधून बाहेर पडणारे रेडिएशन ब्रेन टिश्यूचे नुकसान करते. या व्यतिरिक्त, जर मेंदूमध्ये आधीच गाठ असेल, तर रेडिएशन त्यांना वाढवण्याचे काम करते, ज्यामुळे कर्करोगासारख्या गंभीर आजारांचा धोकाही वाढतो.
 3. कानाच्या पडद्याला इजा: हेडफोनचा जास्त वापर केल्याने कानाच्या पडद्यावरही परिणाम होतो. मोठ्या आवाजामुळे कानाच्या पडद्यावर सतत कंपने येतात, ज्यामुळे पडदा फुटण्याची शक्यता असते.
 4. श्रवणशक्ती कमी होणे किंवा बधिरता: दीर्घ कालावधीसाठी उच्च आवाजात गाणे ऐकल्याने श्रवणशक्ती कमी होऊ शकते. आपल्या कानांची ऐकण्याची क्षमता फक्त 90 डेसिबल आहे, जी हळूहळू कमी होऊन 40-50 डेसिबलपर्यंत कमी होते. ज्यामुळे बहिरेपणाची तक्रार सुरू होते. बऱ्याच वेळा लोकांना जोरात हॉर्न वाजवूनही ऐकू येत नाही आणि अपघातांचे बळी ठरतात.
 5. संक्रमणाचा धोका: दुसऱ्याच्या हेडफोनच्या वापरामुळे कानात संसर्ग होण्याचा धोका असतो. जर तुम्हाला संसर्ग टाळायचा असेल तर नेहमी स्वतःचे हेडफोन वापरा. जर तुम्हाला दुसऱ्याचे हेडफोन​​​​​​​ वापरायचे असतील तर आधी ते स्वच्छ करा.
 6. टिनिटस: ही एक अशी स्थिती आहे ज्यात रुग्णांना कानात सतत आवाज ऐकू येतो. इयरफोनवर मोठा आवाज ऐकल्याने हे घडण्याची शक्यता वाढते. डॉक्टरांच्या मते, मोठ्या आवाजात गाणे ऐकल्याने​​​​​​​ टिनिटस, चक्कर येणे यासारख्या समस्या निर्माण होतात.
 7. डोकेदुखी: वायरलेस इयरबडमधून बाहेर पडणाऱ्या रेडिएशनमुळे मेंदूवर वाईट परिणाम होतो. कधीकधी डोकेदुखी किंवा झोप न येण्यासारख्या समस्या देखील येऊ लागतात.

गर्भवती महिला आणि लहान मुलांसाठी इयरबड्स अधिक धोकादायक असतात

गरोदरपणात इअरबड्सवर बराच वेळ गाणी ऐकणे किंवा बोलणे हे अधिक हानिकारक आहे. काही संशोधकांच्या मते, गर्भधारणेदरम्यान रेडिएशन असलेल्या गॅझेटचा वापर आई आणि गर्भात असलेल्या बाळाला हानी पोहोचवू शकतो. रेडिएशनच्या प्रभावामुळे प्रेग्नेंसीच्या काळात धोका नेहमीपेक्षा जास्त असतो. त्याच्या प्रभावामुळे मुलामध्ये एक प्रकारचा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर होण्याची शक्यता असते. संशोधक गर्भवती महिलांना ब्लूटूथ इयरबड्स व्यतिरिक्त इतर सर्व गॅझेटपासून दूर राहण्याचा सल्ला देतात. जे नॉन-आयोनायझिंग इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन तयार करतात.

अमेरिकेतील कॅलिफोर्नियातील जॉन वेन कॅन्सर इन्स्टिट्यूटमधील न्यूरो-ऑन्कोलॉजिस्ट डॉ. संतोष केसरी सांगतात, ब्लूटूथ इयरबड्स मुलांसाठी खूप धोकादायक असतात, कारण लहान मुलांचे डोके प्रौढांपेक्षा लहान असतात, त्यामुळे मुलांच्या मेंदूच्या पेशींना रेडिएशनचा धोका अधिक असतो. मुलांना इअरबड वापरण्यापासून रोखणे महत्वाचे आहे.

या रेडिएशनपासून स्वतःचे संरक्षण कसे करावे?

आधुनिक तंत्रज्ञान आणि सध्याच्या काळाजी गरज लक्षात घेता, या साधनांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करणे शक्य नाही, परंतु जर तुम्हाला या गोष्टी वापरायच्या असतील तर या गोष्टी लक्षात ठेवा ...

 • वायर्ड हेडफोन आणि स्पीकर्स अधिक वापरा.
 • 10 इंच अंतरावर फोन धरून बोला.
 • वापरात नसताना हँडसेट, फोन, इतर गॅझेट शरीरापासून दूर ठेवा.
 • उशाखाली फोन ठेवून झोपू नका.
 • बराच काळ व्हिडिओ पाहण्यासाठी किंवा ऑडिओ ऐकण्यासाठी स्पीकरचा वापर करा.
 • वापरात नसताना वायरलेस डिवाइस कान आणि डोक्यापासून दूर ठेवा. वायरलेस उपकरणे काढा.
 • झोपताना तुमचा फोन आणि इतर गॅझेट दूर ठेवा.
 • स्वस्त इयरफोनऐवजी चांगल्या दर्जाचे इयरफोन वापरा.
 • दिवसभरात 60 मिनिटांपेक्षा जास्त इयरफोन वापरू नये.
बातम्या आणखी आहेत...