आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भास्कर ओरिजिनल:सरकारने लॉकडाऊनआधीच स्थलांतरित मजुरांना घरी पाठवायला हवे होते,रिव्हर्स मायग्रेशनमुळे ते उशिरा परततील...मात्र परततीलच : प्रा.चिन्मय तुंबे

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • स्थलांतरणावरील जगप्रसिद्ध पुस्तकाचे लेखक, आयआयएमचे प्राध्यापक चिन्मय तुंबेंशी खास बातचीत
  • जूनएेवजी मार्चमध्येच घरी आले मजुर, परतण्यास होईल उशीर

(मनीषा भल्ला)

जगभरात स्थलांतरणावरील गाजलेले पुस्तक ‘इंडिया मूव्हिंग : अ हिस्ट्री ऑफ मायग्रेशन’चे लेखक, आयआयएम अहमदाबादमधील प्राध्यापक चिन्मय तुंबेंकडून सध्या अनेक राज्य सरकारांकडून स्थलांतरितांविषयी धोरण तयार करण्याबाबत सल्ला घेतला जात आहे. तुंबे सांगतात, कोविड-१९ मुळे जगभरात लॉकडाऊनची वेळ आली. मात्र संपूर्ण जगात स्थलांतरितांबाबत भारतात सर्वात वाईट घडले. या विषयावर त्यांच्याशी केलेल्या चर्चेतील संपादित भाग...

जूनएेवजी मार्चमध्येच घरी आले मजुर, परतण्यास होईल उशीर

मजुर सहसा जुन-जुलैमध्ये गावी जातात. यावेळी मार्चमध्येच आले. सप्टेंबरपर्यंत परतही जातात, मात्र यंदा ते उशीरा जातील, मात्र जातील नक्की. कारण मोठ्या शहरांत मजुरांचा तुटवडा भासेल आणि राज्यांकडेही यांच्यासाठी नोकऱ्या नाहीत.

> कोरोनाविषयी जगात जे सुरू आहेत यावर आपल्यातील व इतरांमधील मोठा फरक काय ?

इतर देशांमध्ये केवळ कोरोना चालू आहे. आपल्या देशात कोरोना आणि स्थलांतर दोन्ही सुरू आहे, हा आपल्या देशातील सर्वात मोठा फरक आहे.

> सरकारला स्थलांतरितांना घरी का पाठवायचे नव्हते ? यामागील काही विशेष कारण होते का?

देशातील किती लोकांना कोरोनाची लागण झाली हे सरकारला माहीत नव्हते. हर्ष मंदर यांच्यासह काही लोकांनी स्थलांतरितांच्या प्रश्नावर याचिका दाखल केली होती. यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाला उत्तर देताना आम्ही स्थलांतरितांना घरी पाठवू शकत नाही. कारण स्थलांतरितांपैकी एक तृतीयांश कोरोना संसर्गित असण्याचा धोका असू शकतो, असे सरकारने म्हटले होते. २५ मार्चला लॉकडाऊन लागू झाले. लॉकडाऊनआधीच सरकारने या लोकांना घरी पाठवायला हवे होते. जसे की, ब्रिटनसह अनेक देशांनी आपल्या देशातून विद्यार्थ्यांना एक आठवड्यापूर्वी घरी पोहोचवले. भारतातही स्थलांतरितांना घरी जायचे होते. सरकारही पाठवू शकले असते. मात्र लॉकडाऊन ए‌वढा कठोर होता की लोक घराकडे पायीच निघाले.

> मजूर त्यांच्या गावी पोहोचले आहेत तर काही जात आहेत, याचा काय परिणाम होईल?

कोरोनाचे आकडे तर वाढतीलच. मजुरांना घरी पाठवले तर कोरोना वाढेल असा सरकारचा युक्तिवाद होता. परंतु शहरांमध्ये लोक दाट वस्त्यांमध्ये राहत आहेत, जेथे फिजिकल डिस्टन्सिंग राखले जाऊ शकत नाही.

> सरकारांकडून कोणती चूक झाली?

राज्य सरकारांमध्ये समन्वय व एकमत नाही. एका राज्याने तर आपले निगेटिव्ह रुग्ण घेण्यासही नकार दिला. सर्व राज्यांना कोरोनाचे रुग्ण कमी असल्याचे दाखवायचे आहे. हे यामागील कारण आहे. महाराष्ट्राने तर दुसऱ्या राज्यांना तुमच्या राज्यातील लोक परत पाठ‌वायचे आहेत असे सांगितले. मात्र अनेक राज्यांनी सहमती दर्शवली नाही. केंद्र सरकारने पुढाकार घ्यायला हवा होता. या लोकांना रेल्वेचे तिकीटही मोफत द्यायला हवे होते.

> स्थलांतरणावर राजकारणही सुरू आहे, यातील पर्यायी मार्ग काय असू शकतो?

स्थिती भयावह होणार आहे. यावर उत्तर प्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांच्या सरकारने इतर राज्यांशी चर्चा करायला हवी, हा एकमेव उपाय आहे. जेथे मजुरांची कमतरता असेल तेथे आपल्याकडून स्थलांतरित आणि ग्रामस्थांना पाठवायला हवे.

> या स्थलांतराकडे तुम्ही कशा प्रकारे बघता ?

स्थलांतरण इतिहासापासून होत आहे. वेगवेगळे आर्थिक परिणाम यामागील कारण आहे. याचे एक चक्र असते. लोक एका ठिकाणाहून दुसरीकडे जातात. मात्र सध्या होत असलेले स्थलांतरण इतिहासातील सर्वात वेगळे स्थलांतरण आहे. कारण पहिल्यांदाच एकाच वेळी संपूर्ण देशात प्रत्येकी ठिकाणी स्थलांतरण सुरू आहे. याला रिव्हर्स मायग्रेशन म्हणतात. यापूर्वी छटपूजेसाठी लोक बिहारला जायचे. आंध प्रदेशात त्यांचे सण साजरे व्हायचे. म्हणजे काही न काही निमित्ताने वेगवेगळ्या वेळेवर स्थंलातरण व्हायचे. मात्र पूर्ण देश एकीकडून दुसरीकडे स्थलांतरण व शिवाय मरणयातना सहन करत जात आहेत.

> हे इतिहासातील सर्वात वेगळे स्थलांतर कसे?

एकाच वेळी पूर्ण भारत देश वाहतुकीची कुठलीही सोय नसताना पायीच निघाला. असे पूर्वी कधीही झाले नाही. मजूर यापूर्वी आपल्या इच्छेने वाहनातून गावी जात होते. मात्र एवढे पायी कधीही चालले नाही. नोटबंदीच्या वेळेसही स्थलांतरण झाले होते. मात्र तेव्हा रेल्वे सुरू होती. वाहतुकीविना हे देशातील पहिले स्थलांतरण आहे.

> साधारणत : किती कोटी लोक स्थलांतरित झाले किंवा पायी गेल्याचा काही आकडा आहे?

देशातील अनेक संस्था ही आकडेवारी शोधत आहेत. परंतु आतापर्यंत २.५ कोटी लोकांनी स्थलांतरण केले आहे. हा आकडा केवळ आंतरराज्यीय स्थलांतरणाचा आहे.

> लॉकडाऊन तर विदेशातही झाला, सरकारनुसार हा कोरोना रोखण्याचा सर्वात प्रभावी उपाय आहे, तर विदेशातही स्थलांतरण झाले ?

नाही, असे झाले नाही. अमेरिका किंवा चीनबाबत सांगायचे झाल्यास, तेथील मजूर कुटुंबासोबत राहतात. अशा काळात माणसाला घराची ओढ लागते. आपल्या देशात कुटुंबातील पुरुष कामासाठी शहरात येण्याची प्रथा आहे. अशा संकटात त्याला घरी जायचे असते. आपल्या मजुरांनाही घरी जायचे होते.  

बातम्या आणखी आहेत...