आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
भारताची पहिली स्वदेशी कोरोनारोधी लस कोव्हॅक्सीन बनवणारी हैदराबादची कंपनी भारत बायोटेक सरकारच्या मंजुरीची वाट पाहत आहे. या व्हॅक्सीनचे जवळपास 60 ते 70 लाख डोस तयार आहेत. त्याचे नमुणे टेस्टिंगसाठी पाठवण्यातही आले. सराकरी यंत्रणेची मंजुरी मिळताच विविध राज्यांमध्ये त्याचा पुरवठा केला जाईल.
भारत बायोटेकच्या सहाय्यक व्यवस्थापकीय संचालक सुचित्रा ऐल्ला यांनी दिव्य मराठीला विशेष मुलाखत दिली आहे. त्यांनी सांगितल्याप्रमाणे, हैदराबादच्या दोन ठिकाणांवर काम सुरू झाले आहे. तिसऱ्या प्रोजेक्टचे काम मार्च पर्यंत पूर्ण होईल. एकदा हे काम पूर्ण झाल्यास आम्ही 2021 च्या वर्षाखेरीस वार्षिक 20 कोटी डोस तयार करण्यास सक्षम होऊ. आम्ही युद्ध लढत आहोत. जोपर्यंत व्हॅक्सीन मिळणार नाही तोपर्यंत मिश्रांती कसली असेही त्या पुढे म्हणाल्या आहेत.
तुमच्या व्हॅक्सीनला कधीपर्यंत आपातकालीन मंजुरी मिळू शकते?
सुचित्राः सद्यस्थितीला काहीही ठोसपणे म्हणता येणार नाही. ड्रग रेग्युटेलर (सरकारी यंत्रणा) यावर अंतिम निर्णय घेतील. आमचे काम तर फक्त रोज होणाऱ्या चाचण्यांची आकडेवारी आणि निकाल जमा करणे असून ते आम्ही करत आहोत. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी आणि 65 वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्यांना हे डोस दिले जाणार आहेत. आमची तयारी पूर्ण झाली आहे. प्रत्येक राज्याने आपल्या व्हॅक्सीन संदर्भातील मागण्या केंद्र सरकारसमोर ठेवल्या आहेत. सर्वच गोष्टींचा विचार करून ड्रग रेग्युलेटर अंतिम निर्णय घेतील.
सीरम इंस्टिट्युटप्रमाणे तुम्ही सुद्धा आपातकालीन मंजुरी मिळण्यापूर्वीच व्हॅक्सीनचे उत्पादन सुरू केले का?
सुचित्राः होय. आम्ही धोका पत्करूनच प्रॉडक्शन सुरू केले आहे. जे नमुणे आमच्या व्हॅक्सीन मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीमध्ये बनले होते, ते कसौली येथील नॅशनल ड्रग टेस्टिंग फॅसिलिटीकडे चाचणीसाठी पाठवण्यात आले आहेत. आमच्याकडे 60 ते 70 लाख डोस तयार आहेत. हैदराबादेत तिसरे प्रकल्प बनताच वार्षिक 20 कोटी डोस तयार केले जाऊ शकतील.
तुमची लस व्हायरसच्या नवीन स्ट्रेनविरोधातही उपयोगी ठरेल का? की यात सुधारणा कराव्या लागतील?
सुचित्राः आम्ही पूर्ण व्हायरसचा वापर करून लस विकसित केली आहे. त्यामुळे, आमचे व्हॅक्सीन व्हायरसवर पूर्णपणे प्रभावी आहे. व्हायरसमध्ये थोडे-फार बदल झाल्यास काहीच फरक पडणार नाही. नवीन स्ट्रेनवर NIV मध्ये अभ्यास सुरू आहे. तरीही नवीन स्ट्रेन आम्हाला लवकरात लवकर मिळावा यासाठी प्रयत्न करत आहोत. जेणेकरून व्हॅक्सीन अजमावून पाहता येईल. यातून स्पष्ट होऊन जाईल की नव्या प्रकारच्या व्हायरसच्या स्ट्रेनवर आमचे व्हॅक्सीन उपयोगी आहे.
सरकारने म्हटले की व्हॅक्सीनचा प्रभाव 42 दिवसानंतर होईल. तुमच्या व्हॅक्सीनवर हे लागू होईल का?
सुचित्राः नक्कीच. हे काही पॅरासिटामॉल नाही, की घेतले आणि तीन तासांत परिणाम दिसून येतील. व्हॅक्सीनने शरीरात रोगप्रतिकार क्षमता विकसित होण्यास वेळ लागतो. लहान मुलांमध्ये सुद्धा एक ते तीन डोस द्यावे लागतात. तेव्हा त्यांच्या शरीरात त्या व्हायरसविरुद्ध लढण्यासाठी इम्यून रिस्पॉन्स विकसित होते. यात 42 नाही तर 60 दिवसही लागू शकतात.
कोव्हॅक्सीनचे दोन डोस 28 दिवसांच्या अंतराने लागतील. दुसरे डोस दिल्याच्या 14 दिवसानंतर व्हॅक्सीन सक्रीय होईल. अर्थातच (पहिले डोस दिल्यानंतर) एकूण 42 दिवसानंतर व्हॅक्सीन सक्रीय होईल. त्यातही महत्वाचे म्हणजे, सर्वांच्या बाबतीत असे घडणार नाही. व्हॅक्सीनचा प्रभाव दिसण्यात 45 ते 60 दिवसही लागू शकतात. तर काही लोकांमध्ये त्यापेक्षा लवकर व्हॅक्सीनचे परिणाम दिसून येतील. चाचण्यांमध्ये आम्ही 42 व्या दिवशी स्वयंसेवकांचे रक्ताचे नमुणे चाचणीकरिता घेत आहोत. यातूनच पत्ता लागतो की त्यांच्या शरीरात अँटीबॉडी बनल्या आहेत की नाहीत.
ही लस सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी सुरक्षित आणि परिणामकारक आहे का?
सुचित्राः आमच्या आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये कोव्हॅक्सीन परिणामकारक आणि सुरक्षित असल्याचे सिद्ध झाले. आंतरराष्ट्रीय गुणवत्तेच्या आधारावर पूर्ण लक्ष केवळ 18 वर्षांपेक्षा अधिक वयाच्या लोकांवर होता. याच वयोगटातील लोकांवर चाचण्या घेण्यात आल्या. 12 वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या लोकांवर लसीचे प्रयोग करायचे असतील तर त्यांच्या चाचण्या घ्याव्या लागतील. त्यानंतरच काही ठरवता येईल.
व्हॅक्सीन आल्यानंतर आपण सगळेच मास्क न लावता फिरू शकतो? सुचित्राः नाही. त्यासाठी वेळ लागेल. ही महामारी कधी संपेल हे सांगणे कठिण आहे. मी FDA, CDC किंवा ICMR मधून नाही. तरीही 2021 मध्ये सुद्धा सावध राहावे लागेल एवढेच सांगता येईल. त्यात आपल्या देशाची लोकसंख्या पाहता 2021 मध्येच सर्वांना व्हॅक्सीन लावले जाईल असे वाटत नाही. कोरोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी मास्क वापरावाच लागेल.
तुमचे व्हॅक्सीन आता अंतिम टप्प्यात आहे, आता काहीसा दिलासा मिळाला असेल?
सुचित्राः आम्हाला हे देखील माहिती नाही की आमचे काम झाले की नाही. आम्ही एप्रिलमध्ये काम सुरू केले होते. संशोधक, संशोधकांची टीम आणि टेक टीमने मार्च-एप्रिलपूर्वीच कामाला सुरुवात केली होती. अजुनही 24X7 काम करत आहोत. तीन शिफ्ट्समध्ये काम होत आहे. जेव्हा प्रत्येक व्यक्तीला लस मिळेल तेव्हाच आम्हाला दिलासा मिळेल. तोपर्यंत थांबून विश्रांती घेण्यासाठी वेळच नाही.
69 देशातील नेत्यांनी डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात भारत बायोटेकच्या मॅन्युफॅक्चरिंग फॅसिलिटीचा दौरा केला आणि टेक्नोलॉजी समजून घेतली. कोरोना व्हॅक्सीनवर काम करताना आपली दिनचर्या कशाप्रकारे बदलते?
सुचित्राः कंपनीत आमची कॅपेबल टीम आहे. सिस्टीम ठरल्याप्रमाणे सर्वकाही करते. मी सुरुवातीला 6-8 तास काम करायचे, पण महामारीने सर्वकाही बदलले. आता आमची टीम रोज 12-15 तास काम करत आहे. मीदेखील 12 तासांपेक्षा जास्त वेळ सक्रीय असते.
कोव्हॅक्सिनवर किती खर्च झाला आणि किती होणार आहे ? यात फंडिंग मिळत आहे का?
सुचित्राः कोव्हॅक्सिनसाठी आम्हाला ICMR कडून क्लीनिकल ट्रायल्ससाठी फंडिंग मिळाली आहे. यावर 70 ते 80 कोटी रुपये खर्च झाले आहेत. याशिवाय व्हॅक्सीनच्या डेव्हलपमेंट आणि इतर वस्तुंवर कंपनी खर्च रत आहे. आमचा असा अंदाज आहे की, कोव्हॅक्सिन बनवण्यामध्ये आणि शेवटच्या व्यक्तीपर्यंत पोहचवण्यामध्ये 70 ते 80 मिलियन डॉलर (500-600 कोटी रुपये) खर्च होतील.
कोरोना व्हॅक्सीन तयार करण्याची प्रक्रिया कधी सुरू झाली?
सुचित्राः हा खूप मोठा संघर्ष होता. संपूर्ण देशात लॉकडाउन होता, तेव्हा आम्ही काम करत होतो. व्हॅक्सीन तयाक करण्यासाठी आम्हाला व्हायरसचा लाइव्ह स्ट्रेन हवा होता. आम्ही ICMR आणि NIV ला पत्र लिहीले. त्यांच्याकडून व्हायरसचा भारतीय स्ट्रेन मिळवला. त्यावेळेस एअर कार्गो सुरू नव्हते. आम्ही बाय रोड पुण्यावरुन व्हायरसचा स्ट्रेन हैदराबादला आणला. त्यानंतर मोठ्या मेहनतीने त्याला इनअॅक्टिवेट केले. या वेळी हा विषाणू आमच्या वैज्ञानिक आणि इतर कर्मचार्यांना संक्रमित करू नये याची काळजी देखील घेतली.
तुमचे व्हॅक्सीन कशाप्रकारे इम्यून रिस्पॉन्स विकसित करते?
सुचित्राः आमची व्हॅक्सीन इनअॅक्टिवेटेड प्लेटफॉर्मवर काम करते. आम्ही यात कोरोना व्हायरसला कमकुमवत केले, म्हणजे तो शरीरात आपली संख्या वाढवू शकणार नाही. व्हॅक्सीन शरीरात इंजेक्ट केल्यावर शरीरात इम्यून रिस्पॉन्स डेव्हलप करते. आमचे सुरुवातीच्या 4 ते 6 आठवडे प्री-क्लीनिकल ट्रायल्समध्ये गेले. आम्ही आणि आमचे शास्त्रज्ञांची टीम हैदराबादच्या बाहेर राहिलो, घरीदेखील गेलो नाहीत.
आम्ही ठरवले होते की, स्पाइक प्रोटीन कंवा व्हायरसच्या भागाऐवजी संपूर्ण व्हायरससाठी व्हॅक्सीन तयार करावी. जगभरात वेगवेगळ्या टेक्नोलॉजी प्लॅटफॉर्मवर व्हॅक्सीन तयार होत आहे. पण, आमचा प्रयत्न होता की, अशा प्लॅटफॉर्मवर व्हॅक्सीन बनवली जावी, जी सर्वात जास्त विश्वासहार्य असेल. आज आम्ही तीन परदेशी यूनिव्हर्सिटींसोबत मिळून काम करत आहोत. त्यांच्याकडून टेक्नोलॉजीवर नॉलेज शेअरिंग सुरू आहे.
𝐈𝐧𝐝𝐢𝐚𝐧 𝐯𝐚𝐜𝐜𝐢𝐧𝐞 𝐚𝐠𝐚𝐢𝐧𝐬𝐭 𝐂𝐎𝐕𝐈𝐃-19 𝐝𝐫𝐚𝐰𝐬 𝐠𝐥𝐨𝐛𝐚𝐥 𝐚𝐭𝐭𝐞𝐧𝐭𝐢𝐨𝐧. The results of the #COVAXIN Phase-2 human clinical trials can be accessed at https://t.co/jjl1WifW2q pic.twitter.com/VKfvjeZuOE
— ICMR (@ICMRDELHI) December 24, 2020
सध्या व्हॅक्सीन ट्रायल्सचे स्टेटस काय आहे?
सुचित्राः या व्हॅक्सीनला तयार करण्यासाठी आमचा जापानी एंसेफिलाइटिससह अनेक व्हॅक्सीन बनवण्याचा अनुभव कामी आला. जुलैमध्ये आम्ही ड्रग रेगुलेटरकडून परवानगी घेऊन 400 वॉलंटियर्सवर फेज-1 ट्रायल्स केले. यात सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रीत केले होते. नंतर आम्ही 400 वॉलंटियर्स वर फेज-2 ट्रायल्स केले. यात व्हॅक्सीनची इम्युनोजेनेसिटीला तपासले. याच्या आधारे आम्ही देशभरातील 22 पेक्षा जास्त हॉस्पीटलमधील 26 हजार वॉलंटियर्सवर फेज-3 ट्रायल्स करत आहोत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.