आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

जागतिक पर्यावरण दिन :विदेशी मुळाच्या झाडांनी बिघडवली जैवविविधता, ख्यातनाम पर्यावरण अभ्यासक माेहंमद दिलावर यांचे मत

नागपूर (अतुल पेठकर)एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • विदेशी मुळाच्या वनस्पती व झाडे भारतीय वंशाच्या झाडांच्या मुळावर

नॅशनल ब्युरो आॅफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसच्या अभ्यासानुसार भारतातील सुमारे १८ हजार प्रजाती मूळ भारतीय नाहीत. यामुळे दरवर्षी ३० टक्के पिकांचे नुकसान होते. शिवाय विदेशी मुळाच्या वनस्पती व झाडे भारतीय वंशाच्या झाडांच्या मुळावर आल्याची माहिती ख्यातनाम पर्यावरण अभ्यासक माेहंमद दिलावर यांनी “िदव्य मराठी’ला दिली.

भारतीय जैवविविधतेची साखळी पुन्हा जोडायची असेल तर मूळ भारतीय वंशाची झाडे लावणे खूपच गरजेचे आहे, असे दिलावर यांनी स्पष्ट केले. मोहंमद दिलावर हे “वर्ल्ड स्पॅरो डे’चे प्रणेते आहेत.

सद्य:स्थितीत भारतात ४० टक्के वनस्पती व वृक्ष विदेशी मुळाची आहेत. यातील ५५ टक्के अमेरिकन आहेत. स्वातंत्र्यानंतर भारतात झाडांची ओळख व माहिती देणारी माहिती शास्त्रीयदृष्ट्या ठेवण्यात आली नाही. नॅशनल ब्युरो आॅफ प्लँट जेनेटिक रिसोर्सेसच्या अभ्यासानुसार विदेशी मूळ असलेल्या २५ टक्के वनस्पती व झाडे अतिशय आक्रमक असून त्या देशी मुळाच्या झाडांवर हल्ला करून त्यांना संपवतात.

तसेच लँटेनामुळे सर्वाधिक नुकसान झाल्याचे सांगताना ते म्हणाले, जगातील दहा आक्रमक, विनाशी वनस्पतीत लँटेना म्हणजे घाणेरीचा समावेश होतो. भारतात लँटेनामुळे सर्वाधिक नुकसान झाले आहे. सुमारे १३ मिलियन जमीन लँटेनाच्या अतिक्रमणाने व्यापलेली आहे.

यामुळे सर्वाधिक नुकसान वनविभागाचे झाले आहे. जगात लँटेनाच्या ६३० प्रजाती विकसित झाल्या आहेत. याशिवाय आता भारतामध्ये आतापर्यंत सर्वाधिक नुकसान वनजमिनीचे झाल्याचे या वेळी माेहंमद दिलावर यांनी सांगितले.


याकरता लावा देशी झाडे

देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्ट्यात पर्यावरणाचा समतोल साधतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते. या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, किडे, कीटक सामावलेले असतात. देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवरील पाचोळ्यातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढतो. विघटन झालेल्या पालापाचोळ्याच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करतात. म्हणून देशी झाडेच लावली पाहिजे, असे मोहंमद दिलावर यांनी सांगितले.  

0