आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Extending A Helping Hand In Nandurbar District In The Corona Crisis; MGNREGA Will Provide Employment To 30,000 Tribal S

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मंडे पॉझिटिव्ह:कोरोना संकटात नंदुरबार जिल्ह्यात साथी हाथ बढाना; 30 हजार आदिवासींना मनरेगा देणार रोजगार

नवापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • सहा तालुक्यांमध्ये काम, 238 रुपये रोजंदारी, कामात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन

(नीलेश पाटील)

लॉकडाऊनमुळे गावाकडे परतलेल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झालेल्या नंदुरबार जिल्ह्यातील ३० हजार आदिवासी मजुरांना महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजनेंतर्गत (मनरेगा) रोजगार उपलब्ध झाला आहे. नंदुरबार जिल्हा प्रशासनाने मनेरगा योजनेंतर्गत धरणातून गाळ काढणे, शोषखड्डे, शौचालये, विहीर, सीसीपी,नाडेप, वनीकरण,रोपवाटिका,फळबाग लागवड आदी कामांच्या माध्यमातून मजुरांना रोजगार उपलब्ध होत आहे. नावली येथील मध्यम सिंचन प्रकल्पातून गाळ काढण्याचे काम गटविकास अधिकारी नंदकुमार वाळेकर यांनी मजुरांना उपलब्ध करुन दिले आहे. तसेच दोन महिने हे काम सुरु राहील ,अशी माहिती जिल्हाधिकारी डाॅ. राजेंद्र भारूड यांनी दिली.

सहा तालुक्यांमध्ये काम, २३८ रुपये रोजंदारी :

नंदुरबार जिल्ह्यातील सर्व ६ तालुक्यांत योजना सुरू केली. जवळपास ३० हजार स्थलांतरित व गावातील मजुरांना हाताला काम मिळाले आहे. प्रत्येक मजुराला दिवसाला २३८ रुपये मजुरी दिली जाते. आठ दिवसांत ही रक्कम त्यांच्या खात्यात जमा केली जात आहे.

कामात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन....

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मजुरांनाही काम करताना मजुरांना फिजिकल डिस्टन्सिंगसह इतर नियमांचे पालन करणे बंधनकारक केले आहे. तोंडाला मास्क बांधून प्रत्येक कुटुंबाला काम करण्यासाठी जागेची आखणी करुन दिली आहे. सॅनिटायझरही उपलब्ध करून दिले आहेत.

> 03 लाख 6,539 जॉब कार्डधारक > 01 लाख 46,225 मजूर अॅक्टिव्ह > 590 मजूर मनरेगावर

बातम्या आणखी आहेत...