आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्लॅकबोर्डमुलीवर गँगरेप, आपल्या घरात 700 दिवसांपासून कैद कुटुंबीय:भावाला नोकरी मिळेना, इंटरव्ह्यूत ओळख पटताच देतात नकार

हाथरस|लेखक: मृदुलिका झाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

बहिणीवरील सामूहिक बलात्काराच्या घटनेला दोन वर्षे झाली आहेत. तेव्हापासून आम्ही घरीच आहोत - होम अरेस्ट. तरूण आहे, पण नोकरीवर जाऊ शकत नाही. मुलींना शाळेत पाठवू शकत नाही. सण-वार आले अन् गेले. कुणी शुभेच्छा देण्यासाठी आले नाही, की अश्रू पुसण्यासाठी कुणी पुढाकार घेतला. बहिणीच्या अस्थीही प्रतीक्षेत आहेत. आमचे सर्वांचे आयुष्य प्रतीक्षेत आहे की, न्याय मिळाला तर काळ पुढे सरकेल. हे तेच घर आहे, जिथे काळ दोन वर्ष आधीच्या सप्टेंबरमध्येच स्तब्ध झाला आहे. चेहऱ्यावर मास्क लावलेला युवक अनेक गोष्टी सांगतो. काही कॅमेऱ्यावर, काही कॅमेऱ्याच्या मागे. जेव्हा आम्ही बोलत आहोत, तेव्हा CRPF चे सशस्त्र जवान सोबत उभे आहेत. गेरू आणि शेणाने सारवलेले हे कच्चे-पक्के घर नोव्हेंबर 2020 मध्ये अचानकच छावणीत रुपांतरित झाले. लोकांना सुरक्षेची गरज होती. का? कारण की इथेच ती दलित समुदायातील मुलगी राहत होती, जिचा सामूहिक बलात्कारानंतर मृत्यू झाला. गोष्ट इथेच थांबली नाही. अपरात्रीच तिच्या मृतदेहाचे दहन करण्यात आले. कुटुंबीयांच्या अनुपस्थितीत.

अनेक महिने वातावरण तप्त राहिले. कधी नेते यायचे, कधी NGO वाले. नंतर हेही थांबले. आता हाथरसच्या बूलीगढीमध्ये काहीच नवे नाही. सुमारे 1 हजार लोकसंख्येच्या या गावात रविवारच्या सकाळी ना ताजी हवा आहे, ना ताजे हास्य. घरांच्या बाहेर एक-दोन लोक दिसतात. जे मीडियाचे नाव ऐकताच दार बंद करतात. हे बंद दरवाजे आणि निर्जन रस्त्यांमधूनच आम्ही पीडितेच्या घरी पोहोचलो. चहूबाजूंनी CCTV कॅमेरे होते. तिथे पोहोचताच नाव, पत्ता नोंदवला गेला. कार्ड तपासण्यात आला. काही कॉल्स करण्यात आले, नंतरच ठरले की तुम्ही आत जाण्यास योग्य आहात की नाही. कोणत्याही परिस्थितीत एकटे नाही, सशस्त्र दल सोबतच राहील. मुलाखतीदरम्यानही सोबतच राहील. परतताना सही केल्यावरच बाहेर सोडले जाईल. प्रश्न तितकेच, ज्यात भावनिकतेतून काहीबाही तोंडातून न निघावे. उत्तरेही मोजून मापूनच. न सांगितलेले सांगण्याची सूट नाही, मात्र वातावरणच सर्वकाही सांगून जाते. ज्या अंगणात आम्ही बसलो आहोत, तिथे चारा कापण्याचे मशीन ठेवले आहे. मी निरखून पाहून विचारले की याला गंज का चढला आहे. तिकडून उत्तर आले, दोन वर्षांपासून घरात बंद राहून आमच्यावर गंज चढला तर मशीन काय चीज आहे.

चारा कटाई मशीनच्या मागे उभ्या सायकलीलाही गंज लागला आहे. तिचे घासलेले हँडल सांगते की ती ऐटीने गावात फिरत असावी असाही एक काळ होता.
चारा कटाई मशीनच्या मागे उभ्या सायकलीलाही गंज लागला आहे. तिचे घासलेले हँडल सांगते की ती ऐटीने गावात फिरत असावी असाही एक काळ होता.

मृत पीडितेचा भाऊ समोर बसला होता. म्हणत होता, कोव्हिडदरम्यान घटना घडली. नोकरी गेली. आता मुलाखतीला गेलो, तरी कुणी कामावर ठेवत नाही. चेहरा न दाखवताही ओळख सोबतच असते. जीवाचा धोका आहे, तो वेगळाच. लहान भाऊ आणि मी दोघेही घरात बसून आहोत. एखादे महत्त्वाचे काम किंवा पेशी असेल तरच बाहेर पडतो. कार्यक्रम, पार्टी सर्वच संपलंय. लहान भाऊ जवळच उभा होता, त्याच्याकडे बघून विचारले की, दिवसभर काय करतो? काय करणार, एक म्हैस आहे, तिला चारा-पाणी करतो आणि घरात फिरत राहतो. दिवस जात नाही.

तीन खोल्या, अंगण, दालन आणि छताचे घर. या घरात 7 जण सुमारे 700 दिवसांपासून बंद आहेत. 14 सप्टेंबर 2020 रोजी या घरापासून काही शे मीटर अंतरावर एका शेतात युवतीचा रक्तबंबाळ देह तिच्या आईला दिसला. 15 दिवसांनंतर रुग्णालयात तिचा मृत्यू झाला. कुटुंबीयांचा आरोप आहे की, गावातील 4 सवर्ण युवकांनी तिच्यावर बलात्कार केला. गावातील अनेक कुटुंब रागातच हे ऑनल किलींग असल्याचे म्हणतात. या उल्लेखावर मृत पीडितेचा भाऊ म्हणतो - CBI तपासही झाला. यानंतरही कुणी अशा गोष्टी करत असेल, तर काय करू शकतो. सैतान सर्वांना सैतानाच्या नजरेनेच बघतो. सुमारे तीस वर्षांच्या या युवकाचा आवाज शांत आहे. थकवा आणि वीट आल्यामुळे आलेली शांती. या प्रश्नाचे उत्तर त्याने कदाचित हजारो वेळा दिले असेल आणि हजारो वेळा देणे बाकी असेल. भावासोबत बोलतानाच मृत पीडितेची वहिनीही तिथे आली. मध्यम उंचीच्या या महिलेच्या अनेक व्यथा आहेत. लग्नाच्या वयाची नणंद गेली. सोबत मनाचा एक कोपरा कोरडा करून गेली.

पीडितेची वहिणी सांगत होती की, तिची मोठी मुलगी 7 वर्षांची झाली होती. शाळेत जाऊ शकत नव्हती म्हणून तिला माहेरी पाठवले. आम्ही तर कैदेत आहो, तिने तर तिचे जीवन जगले पाहिजे.
पीडितेची वहिणी सांगत होती की, तिची मोठी मुलगी 7 वर्षांची झाली होती. शाळेत जाऊ शकत नव्हती म्हणून तिला माहेरी पाठवले. आम्ही तर कैदेत आहो, तिने तर तिचे जीवन जगले पाहिजे.

त्या सांगतात - ऑगस्टच्या शेवटी मुलगी झाली आणि काही दिवसांनी दीदीसोबत ही घटना घडली. मी रुग्णालयात जाण्यासाठी खूप रडले, पण कोव्हिडमुळे सर्वांनी नकार दिला. नंतर कधीच नणंदेला बघू शकले नाही. जवळच ती मुलगी खेळत होती. शेणाने सारवलेल्या अंगणात इथे-तिथे बागडणाऱ्या त्या चिमुकलीने बाहेरचे जग बघितले नाही. तिला या तीन-चार खोल्यांतले विश्वच माहिती आहे. तिला माहिती नाही की घरातील लोक बाहेर जाऊन नोकरीही करतात. ते बाजार-पार्कमध्येही जातात. तिला हेही माहिती नाही की तिची मोठी बहीण तिच्यासोबत का राहत नाही. मृत पीडितेची शेवटची आठवण त्यांनी सांगितली. मी गरोदर होते, तेव्हा सर्व कामे दीदी करायची. त्या दिवशी शेतात जाण्यापूर्वी ती म्हणाली होती, की मला स्वप्न पडलंय की गावात आग लागली आहे आणि सर्व जण इकडे-तिकडे पळत आहेत. मी तिला टोकले आणि चांगले स्वप्न सांग म्हणाले, तर ती हसून निघून गेली. घरी येताना सासूबाईंसाठी औषधही तिला आणायचे होते. तेव्हा मी तिला शेवटचे बघितले होते. आता खूप तातडीचे काम असताना घराबाहेर गेल्यावर शेतावरून नजर हटत नाही. वाटते की, दीदी कुठेतरी दिसेल. आवाज देऊन चांगले स्वप्न सांगेल. मुलाखतीदरम्यान मृत पीडितेच्या अस्थींचा उल्लेख झाला, त्या न्याय मिळाल्यानंतरच नदीत प्रवाहित केल्या जाणार आहेत. मी अस्थी दाखवण्याची इच्छा व्यक्त केल्यावर मोठा भाऊ म्हणाला, त्या आम्ही दाखवू शकणार नाही, न्याय मिळाल्यावरच अस्थी बाहेर काढल्या जातील.

तिच्या आईकडे मुलीच्या आठवणीत हुंदके देण्याशिवाय काहीही नाही. म्हणतात - म्हणायला आम्ही जिवंत आहोत, पण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा काळ पुढे सरकणार नाही.
तिच्या आईकडे मुलीच्या आठवणीत हुंदके देण्याशिवाय काहीही नाही. म्हणतात - म्हणायला आम्ही जिवंत आहोत, पण जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा काळ पुढे सरकणार नाही.

अपरात्री कोणत्याही विधीशिवाय दहन करण्यात आलेल्या मृत पीडितेने लावलेली तुळस हीच तिच्या आठवणीतील या घरातील शेवटची गोष्ट आहे. तुळशीकडे पाहून तिची आई म्हणते, माझी मुलगी खूपच धार्मिक होती. तुळशीला पाणी टाकल्याशिवाय काहीही खात नव्हती. आता नवरात्र येत आहेत. बाकीचे लोक फळे खातात. ती असेच नऊ दिवस काढत होती. बोलता-बोलता त्या रडायला लागतात. डोक्यावरून तोंडावर ओढलेल्या पदराखालूनही त्यांचे हुंदके दिसतात. ज्या आईला न सांगता तिच्या मुलीचा मृतदेह दहन केला त्या आईचे हुंदके. अखेरच्या क्षणी आपल्या मृत मुलीला जिला बघताही आले नाही. घरातून निघून आम्ही घटनास्थळावर गेलो. समोर चारा ठेवण्याची कुटी बनवलेली होती. त्या कोपऱ्यातच दोन वर्षांपूर्वी मुलगी रक्तबंबाळ अवस्थेत सापडली होती. आता तिथे रक्ताचे डाग नाही. चित्कार हवेत विरून गेलेत. तिला जखमी करणारे हातही गायब आहेत. समोर ती जमीन आहे, जी आपल्या हिरवळीने सर्व आठवणी पुसून टाकू इच्छित आहे. जमीनीविषयी कळते की ही जमीन गावातीलच कोणत्यातरी व्यक्तीच्या नातेवाईकाची आहे. सुरूवातीला शांती होती, मात्र आता पेरणी, कोळपणी सर्व काही होते.

ही तिच जागा आहे, जिथे मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत सर्वप्रथम पाहिल्याचा दावा आईने केला. सुरूवातीचे काही महिने इथे काहीही शेती झाली नाही. पण आता शेत हिरवे झाले आहे.
ही तिच जागा आहे, जिथे मुलीला रक्तबंबाळ अवस्थेत सर्वप्रथम पाहिल्याचा दावा आईने केला. सुरूवातीचे काही महिने इथे काहीही शेती झाली नाही. पण आता शेत हिरवे झाले आहे.

पीडितेच्या घरातून निघल्यानंतर आमची भेट वकील मुन्ना सिंह पुंधीर यांच्याशी झाली. त्यांचा तर्क पीडितेची वेदना चिरडून टाकतो.
याविषयी ते तीन तर्क सांगतात
1. चार आरोपींमध्ये दोन काका-पुतणे होते. सख्खे. एकाच घरात राहणारे. आता तुम्हीच सांगा भारतीय संस्कृतीत काका-पुतण्या एखाद्या मुलीवर सोबतच अत्याचार करू शकतात का?
2. घटना दिवसा घडली. घटनास्थळ रस्त्याला लागूनच होते. लोक शेतात काम करतात. अशात नऊ-साडेनऊ वाजता सामूहिक बलात्कार कसा होऊ शकतो?
3. पीडितेचे आरोपींपैकी एका मुलासोबत प्रेमसंबंध होते. मुलीच्या कुटुंबीयांचा यावर आक्षेप होता. त्यांनी त्यांच्या मुलीला मारहाण केली आणि प्रकरण चिघळले. त्यांचीही मारण्याची इच्छा नसावी.
गावाची हद्द संपता-संपता सायकलवर एक वृद्ध येताना दिसले, जे चार आरोपींपैकी एकाचे वडील आहेत. चेहऱ्यावर सुरकुत्या आणि पाणीदार डोळे. माहिती नसेल तर या चेहऱ्याला थंड पाणी आणि गुळ खाऊ घालावा वाटेल. इतक्या निस्पृह चेहऱ्याचा तर्कही अफेअरवरच अडकला.
ऑन कॅमेरा काहीही बोलण्यास नकार देत ते म्हणाले, 'तुम्ही तर माझ्या मुलीच्या वयाच्या आहात. बोलायला चांगले वाटत नाही, पण मुलीचे काहीतरी होते. तिच्या घरच्यांना कळले, तर रागात त्यांनी तिला इतकी मारहाण केली, की ती अर्धमेली झाली आणि तिचा मृत्यू झाला. आणखी एक गोष्ट- परमात्मा सर्वकाही पाहत आहे. तो जेव्हा न्याय करेल, तेव्हा सर्वजण पाहत राहतील.
यादरम्यान सायकलला दोन मुले येऊन लटकतात. हे त्यांचे नातू आहेत. त्यांच्याकडे पाहून म्हणतात, तरूण मुलगा तुरुंगात आहे, वृद्ध बाप त्याची पत्नी-मुलांच्या पालनपोषणासाठी मजुरी करत भटकत आहे. माहिती नाही, अजून किती परीक्षा द्याव्या लागतील.'

आरोपींच्या कुटुंबीयांनीही सुरुवातीला सातत्याने याचना केली होती, पण आता सर्वांनी चुप्पी साधली आहे. कितीही विचारा, चुप राहणार.
आम्ही हाथरसच्या शेवटच्या कोपऱ्यात येऊन पोहोचलो. शेवटचे दुकान. गँगरेपच्या चर्चेवर दुकानदाराने लगेच विचारले, तुम्ही कुठच्या आहात? नंतर म्हणाला, घटना कुठे घडत नाही. तुमच्या दिल्ली-मुंबईत बलात्कार होत नाही का, दुर्दैवाने आमचे शहर बदनाम झाले.
हे कॅमेऱ्यावर बोलण्यास सांगितले, तर नकार देत लगेच हिंगाचा डबा काऊंटरवर त्यांनी ठेवला. म्हणाले, हाथरसची हीच ओळख आहे. छौंक लावल्यावर घटना-वटना विसरून जाल.
(मुलाखत समन्वयन - शुभम गुप्ता)

बातम्या आणखी आहेत...