आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • Famous Personalities Deaths In 2020; Egyptian Former President Hosni Mubarak, American Basketball Player Kobe Bryant To George Floyd And Actor Chadwick Boseman

2020 मध्ये जग सोडणारे जगातील 11 दिग्गज:मॅराडोना, पहिला बॉन्ड आणि ब्लॅक पँथर यांसह अनेक सुपरहिरो ज्यांना 2020ने आपल्यापासून हिरावून घेतले

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

2020 ने अनेक सुपरहिरो आणि Larger Than Life कॅरेक्टर्स आपल्यापासून हिरावून घेतले. कोणाच्या पायाची थरकाप हा कोट्यावधी लोकांच्या हृदयाचा ठोका होता. कोणची स्फुर्ती आणि चालाखी पाहण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी थिएटरमध्ये तुफात गर्दी व्हायची. कोणी पहिला ब्लॅक हिरो ठरला आणि अनेकांचा रोल मॉडेल बनला. कधी यांनी आपल्या कामाद्वारे जगभरात नाव कमावले होते, परंतु या दिग्गजांनाही यातनांनी भरलेल्या 2020 या वर्षाला मात देता आली नाही. येथे आम्ही अशा 11 व्यक्तींचा उल्लेख करीत आहोत, जे आता फक्त आपल्या आठवणींत राहतील.

गर्व, ड्रामा, घोटाळे आणि व्यसनयुक्त आयुष्य मागे टाकत मॅरोडानाने 25 नोव्हेंबर 2020 ला वयाच्या 60 वर्षीय जगाचा निरोप घेतला. कधी तो देव बनला तर कधी बदमाश आणि सैतान. एकट्याच्या दमावर अर्जेंटिनाला 1986 मध्ये फुटबॉल वर्ल्डकप जिंकवणाऱ्या मॅराडोनाला 1994 फुटबॉल वर्ल्डकपमधून अपमानित करून बाहेर देखील हाकलले होते.

मॅराडोना क्लब अर्जेंटिनोस ज्युनियर्सचे उपाध्यक्ष म्हणाले होते की,
'जेव्हा सरकार अडचणीत होते, मॅराडोना यापासून लक्ष हटवण्याचे साधन होते. त्यांनी लोकांना आनंदी ठेवले. रोमन सरकारने यासाठी सर्कसचा वापर केला होता. आमच्या सैन्याने फुटबॉल मैदानांचा उपयोग केला.'

1981 मध्ये होस्नी मिस्र गादीवर बसले आणि 30 वर्षांपर्यंत कायम राहिले होते. 2011 मध्ये जेव्हा लाचार होस्नीला कैरो कोर्टात हजर केले तेव्हा त्यांची प्रभावी प्रतिमा लोकांच्या मनातून निघून गेली. त्यांच्यावर भ्रष्टाचार, घोटाळे आणि बेकायदेशीर हत्यांचे आरोप होते. 25 फेब्रवारी 2020 मध्ये त्यांचा मृत्यू झाला.

बास्केटबॉल सुपरस्टार कोबे ब्रायन्ट यांनी 20 वर्षांच्या कारकिर्दीत दोन ऑल्मपिक सुवर्ण आणि पाच एनबीए किताब जिंकले. महान मायकल जॉर्डन निवृत्त झाल्यानंतर एनबीएच्या लीगमध्ये झालेली पोकळी कोबेने भरून काढली. 26 जानेवारी रोजी या स्टार खेळाडूचे कॅलिफोर्नियात घराजवळ एका हेलिकॉप्टरच्या अपघातात निधन झाले. त्यांची 13 वर्षाची मुलगी जियाना मारिया ओनोर ब्रायन्ट हिचा देखील यात मृत्यू झाला.

अमेरिकन काँग्रेसचे सदस्य जॉन लुईस यांचे जीवन हे गेल्या आठ दशकांतील वंशविरोधी चळवळीचे दस्तऐवज आहे. मार्टिन ल्यूथर किंग यांच्यासह चळवळीशी संबंधित 6 मोठ्या नेत्यांपैकी ते एक होते. निषेधाच्या वेळी त्यांना मारहाण झाली, तुरूंगात डांबण्यात आले पण त्यांनी हार मानली नाही. जुलैमध्ये जग सोडून गेलेल्या लुईसचे हे शब्द त्यांचा वारसा राहतील… 'आमच्याकडे असलेले मतं सर्वात शक्तिशाली अहिंसक शस्त्र आहे.'जुलाई में दुनिया छोड़ जाने वाले जॉन लुईसच्या अनुयायांना हे फार चांगले समजले. ते जॉर्जियातून पहिल्यांदा 1987 मध्ये निवडणूक जिंकले होते. यानंतर सलग 16 वेळा त्यांची निवड झाली. त्यांना कधीच 69% पेक्षा कमी मतदान मिळाले नाही.

पहिले जेम्स बॉन्ड शॉन कॉनरी यांनी जे यश आणि श्रीमंती लाभली होती, त्यामुळे त्यांना पुढे काम करण्याची गरज नव्हती. मात्र तरीही त्यांनी 'द नेम ऑफ द रोज' सारख्या चित्रपटांत अवघड भूमिका केल्या. मात्र कॉनरी यांचे नाव नेहमीच बॉन्डशी संबंधित राहिले. सर्व जेम्स बॉन्ड कलाकारांची त्यांनीच बनवलेल्या मानकांवर चाचणी घेतली जात होती.

परिपूर्ण शरीर, एक घट्ट स्कॉटिश उच्चारण आणि गंभीर आवाजासह कॉनरी आपल्या वैयक्तिक जीवनात अतिशय सभ्य होते. वयाच्या 90 व्या वर्षी जग सोडून गेलेले कॉनरी स्वतः म्हणायचे ... "अभिनेता होणे काही विशेष बाब नाही."

रूथ बेडर गिंसबर्ग अमेरिकन सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीश होणाऱ्या दुसऱ्या महिला होत्या. 1993 मध्ये बिल क्लिंटन यांनी त्यांची निवड केली होती. पुढील 27 वर्षे त्या पदावर होत्या. जसजसे सर्वोच्च न्यायालयात उजव्या विंगांचा प्रभाव वाढत गेला तसतसा गिनसबर्गचीही चर्चा वाढत गेली. बर्‍याच प्रकरणांमधील त्यांचे मतभेद चर्चेत राहिले. अमेरिकेत समलैंगिक विवाहाला मंजुरी देणाऱ्या प्रकरणाला त्या कारकिर्दीतील विशेष खटला मानत होत्या. त्याच्या निर्णयांमध्ये दोन गोष्टी वारंवार ऐकल्या गेल्या ...

अमेरिकेत महिलांसोबत भेदभाव होतो आणि हा भेदभाव अमेरिकन संविधानाचे उल्लंघन आहे.

'ब्लॅक पँथर' ऑस्करमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नामांकन मिळालेला पहिला सुपरहिरो चित्रपट होता. या चित्रपटाने 10 हजार कोटींची विक्रमी कमाई केली होती. चित्रपटाचे केंद्रबिंदू होते चॅडविक बोसमॅन. ब्लॅक लीड अभिनेता जो केवळ एक सुपरहिरो चित्रपटच नाही तर संपूर्ण हॉलीवूडमध्ये विरळच दिसतो. त्यांनी वकांडाच्या राजाची भूमिका केली होती. हा सुपरहिरो 28 ऑगस्ट रोजी वयाच्या 43 व्या वर्षी कर्करोगाला मात देऊ शकला नाही.

1960 च्या दशकात बीटल्स, फुटबॉल वर्ल्ड कप उचललेले बॉबी मूर, जेम्स बॉन्ड बनलेले शॉन कॉनरी यांच्यासोबत डायना रिग देखील जगभरात चर्चेत होत्या. ब्रिटीश टीव्हीवरील 'द अॅव्हेंजर्स' शो मध्ये सीक्रेट एजन्टची भूमिका करताना त्यांनी अनेक फॅशन ट्रेंड बनवले. त्यांनी अनेक चित्रपटही केले, मात्र प्रसिद्ध गेम 'गेम ऑफ थ्रोन्स' मधून त्यांनी आपला टीव्ही स्टारडम पुन्हा मिळविला. यात त्यांनी लेडी ओलेना टायरेलचा व्यक्तिरेखा केली होती. शो ची रेकॉर्डिंग पूर्ण करून त्यांनी हृदयाची शस्त्रक्रिया केली. बरे झाल्यानंतर म्हणाल्या की... 'देव म्हणाला असेल, हे जुने पोतं परत पाठवा, मी सध्या हे घेत नाही.'

मानवाला चंद्रावर पाठवण्यात मोलाची भूमिका निभाणार्‍या नासाच्या गणिताज्ञ कॅथरीन जॉनसन यांचे 24 फेब्रुवारी रोजी निधन झाले. त्या 101 वर्षांच्या होत्या. ही आफ्रिकन-अमेरिकन गणितज्ञ पहिल्या अमेरिकन अंतराळ मोहिमेशी संबंधित होती. त्या बहुचर्चित अपोलो-13 मोहिमेच्या भाग देखील होत्या.

कॅथरीन यांच्या जीवनावर आधारित 'द हिडन फिगर्स' नावाचा चित्रपटही बनला आहे. हा चित्रपट याच नावाच्या पुस्तकावर आधारित होता. या चित्रपटाला तीन विभागात ऑस्करचे नामांकन मिळाले होते. मात्र विजय मिळवला नाही. 2015 मध्ये त्यांना राष्ट्रपती बराक ओबामा यांनी 'प्रेसिडेंशियल मेडल ऑफ फ्रीडम’ने सन्मानित केले होते.

2016 मध्ये मीरा नायर दिग्दर्शित डिस्नेच्या 'क्वीन ऑफ कटवे' या चित्रपटात संस्मरणीय भूमिका साकारणारी निकिता पर्ल वलिगावा हिने देखील जगाचा निरोप घेतला. ती 2016 पासून ब्रेन ट्यूमने ग्रस्त होती. उपचारादरम्यान वालिगावाची भारतात शस्त्रक्रिया केली होती. या चित्रपटात ज्याप्रकारे युगांडाचे वर्णव दाखवले, त्याचे कौतुक झाले होते. वालिगावाने 'ग्लोरिया'चे पात्र साकारले होते.

जॉर्ज प्रसिद्ध नव्हता, परंतु त्याच्या मृत्यूनंतर, तो 2020 मधील सर्वात लोकप्रिय व्यक्ती बनला. पोलिसांच्या क्रौर्यामुळे त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यू नंतर अमेरिकेत हिंसक निदर्शने करण्यात आली. ब्रिटन आणि अमेरिकेत गुलामीच्या व्यवसायाशी संबंधित लोकांचे पुतळे पाडले होते. अमेरिकन पोलिस विभागात बदल झाले. पोलिसांच्या वतीने जाहीर कार्यक्रमही झाले, ज्यात पोलिसांनी वर्णद्वेषाबद्दल दिलगिरी व्यक्त केली. अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत ट्रम्पविरूद्ध हा एक मोठा मुद्दा बनला.

बातम्या आणखी आहेत...