आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Farmers Fear That The Agitation Will Be Stopped Due To Intruders, Farmers Worried As Other People Crowd On Kundli Border

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

ग्राउंड रिपोर्ट:घुसखोर लोकांमुळे आंदोलनावर पाणी फेरण्याची शेतकऱ्यांना भीती, कुंडली सीमेवर इतर लोकांची गर्दी झाल्याने शेतकरी चिंताक्रांत

राजेश खोखर | पानिपतएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
सीमा ठप्प : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात कुंडली सीमेवर अनेक विद्यार्थी आंदोलनात सामील झाले होते. - Divya Marathi
सीमा ठप्प : हरियाणातील सोनीपत जिल्ह्यात कुंडली सीमेवर अनेक विद्यार्थी आंदोलनात सामील झाले होते.
  • नवी कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणातील कुंडली सीमेवर बुधवारीही आंदोलन सुरूच होते

नवी कृषी कायद्याच्या विरोधात हरियाणातील कुंडली सीमेवर बुधवारीही आंदोलन सुरूच होते. आतापर्यंत शेतकरी आंदोलनाला १०० हून जास्त संघटनांनी पाठिंबा दर्शवला आहे. त्यात अनेक इतर क्षेत्रांतील संघटनांचाही समावेश आहे. आंदोलनस्थळी अशा संघटनांचे पदाधिकारी व इतर लोकांची गर्दीही वाढली आहे. त्यावर शेतकऱ्यांचे नियंत्रण नाही. हे लोक या मुद्द्यावर वादग्रस्त वक्तव्येही करतात. त्यावर शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे. पतियाळाचा तरुण शेतकरी नेता सतिंदर म्हणाला, काही चुकीचे लोकही सहभागी झाले आहेत. त्यांचे वर्तन योग्य नाही. त्यांनी चूक केल्यास आम्हा शेतकऱ्यांना माफी मागावी लागते. बाहेरच्या लोकांमुळे आंदोलन व्यर्थ जाण्याची भीती वाटते. शेतकरी नेते बलदेव सिंह म्हणाले, आम्ही बाहेरील लोकांवर निगराणीसाठी तरुणांची फळी तयार केली आहे. येथे मंच तयार होताच गर्दी होते. ही गर्दी रात्रीच्या वेळी येते. शाहीनबागच्या महिलांपासून जेएनयू, डीयूपर्यंतच्या विद्यार्थ्यांची टीमही येथे येत आहे. अखिल भारतीय शेतकरी समन्वय समिती, मासेमारी संघ महाराष्ट्र, मेधा पाटकर यांच्या संघटनेपासून सिटू, एआयकेएस, खापपर्यंत सर्वांनी पाठिंबा दिला आहे. त्याशिवाय केरळ, आेडिशा, मध्य प्रदेशचे शेतकरी नेतेही आले आहेत. पंजाबचे शेतकरी नेते सतनामसिंह बेहरू म्हणाले, आम्ही राजकीय लोकांना मंचावर येण्याचे आवाहन केले आहे.

गॅस सिलिंडर सांभाळा; मंचावरून इशारा

पंजाबमधून आलेल्या शेतकऱ्यांच्या ट्रॅक्टर-ट्रॉलीत गॅस सिलिंडर ठेवलेले आहेत. लंगर सेवा देणारे दिल्ली, हरियाणा, पंजाबच्या गुरुद्वाऱ्याचे गॅस सिलिंडरही आंदोलनस्थळी आलेले आहेत. त्यामुळे सिलिंडरची संख्या हजारोंच्या घरात आहे. म्हणूनच रोज सायंकाळी शेतकऱ्यांना मंचावरून सिलिंडरबद्दल इशारा दिला जातो. शेतकरी रात्री वेगवेगळ्या पाळ्यांमध्ये त्यावर निगराणी ठेवत आहेत.

हरियाणाचा स्वतंत्र डेरा

कुंडली सीमेवरही आतापर्यंत पंजाब व हरियाणाचे शेतकरी बसत होते. आता हरियाणाच्या शेतकऱ्यांनी डेरा लावला आहे. मंचावर बोलायची वेळ येते तेव्हा ते येथे जाऊन बोलतात. हे आंदोलन केवळ पंजाबच नव्हे तर हरियाणाचेदेखील आहे, हे दाखवण्यासाठी असे करत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser