आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • Farmers Protest (Kisan Andolan); Who Is Greta Thunberg In Marathi| Delhi Police Files FIR Against Sweden Climate Change Activist Greta Thunberg Toolkit

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी एक्सप्लेनर:ग्रेटा थनबर्गने सोशल मीडियावर शेअर केलेली टूलकिट म्हणजे नेमके काय? भारतातील शेतकरी आंदोलनात का होत आहे यावरून वाद

जयदेव सिंह3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • दिल्ली पोलिस ग्रेटाविरुद्ध कारवाई करू शकतात का? येथे वाचा

भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनावर स्वीडनची जगप्रसिद्ध पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग गेल्या तीन दिवसांपासून काही ना काही लिहित आहे. तिने बुधवारीच शेतकऱ्यांच्या समर्थनात सोशल मीडियावर आपली भूमिका मांडताना एक डॉक्युमेंट शेअर केले. हीच टूलकिट बनवणाऱ्यांच्या विरोधात दिल्ली पोलिसांनी एफआयआर दाखल केला. सुरुवातीला बातम्या अशाही आल्या की एफआयआर ग्रेटाविरुद्ध दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर मात्र, पोलिसांनी टूलकिट बनवणाऱ्यांविरुद्ध एफआयआर दाखल केल्याचे स्पष्ट केले.

दिल्ली पोलिसांच्या एफआयआरनंतर ग्रेटा थनबर्गने पुन्हा आपण भारतातील शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत. तसेच कुठल्याही धमकीला घाबरून हा निर्णय बदलणार नाही असे स्पष्ट केले. यानंतर तिने टूलकिट अपडेट करून शेअर केली. पण, ग्रेटाने जे टूलकिट शेअर केली आणि त्यावरून एवढी चर्चा रंगली ते नेमके आहे तरी काय? सविस्तर जाणून घेऊ...

काय आहे टूलकिट हा प्रकार?
हे टूलकिट एक प्रकारचे डॉक्युमेंट आहे. सोशल मीडियावर ते शेअर करून शेतकरी आंदोलनासाठी समर्थकांची संख्या कशा प्रकारे वाढवता येईल याची ही एक मार्गदर्शक तत्वांची एक यादी म्हणता येईल. सोशल मीडियावर आवाहन करताना कोणत्या हॅशटॅगचा वापर करण्यात यावा? आंदोलन करत असताना काही अडचण आल्यास कुणाशी संपर्क करावा? आंदोलनात काय करावे आणि काय करू नये? या सर्व गोष्टी त्यात समजावून सांगण्यात आल्या आहेत.

पहिल्यांदा चर्चेत नाही अशा प्रकारचे टूलकिट
टूलकिट हा प्रकार चर्चेत आल्याची ही पहिली वेळ नाही. अमेरिकेत गतवर्षी पोलिसांनी एका कृष्णवर्णीय नागरिकाची रस्त्यावर हत्या केली होती. त्याविरोधात जगभरातून प्रतिक्रिया उमटल्या होत्या. यानंतर 'ब्लॅक लाइफ मॅटर्स' अशा नावाची मोहिम सुरू झाली. भारतासह जगभरातील लोकांनी त्यामध्ये सहभाग घेऊन कृष्णवर्णीयांवरील अत्याचाराविरुद्ध आवाज उठवला. आंदोलकांनी हे टूलकिट तयार केले होते.

यात आंदोलनाशी संबंधित काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या होत्या. आंदोलनात सहभागी होण्यासाठी कसे जावे लागेल, कुठे जायचे आणि कुठे जाऊ नये, पोलिसांनी कारवाई केल्यास काय करावे? आंदोलनात सहभाग घेताना कपड्यांमुळे अडचण येणार नाही यासाठी कशा प्रकारचे कपडे घालावे, पोलिसांनी पकडल्यास तुमचे काय अधिकार आहेत? यासोबतच, हाँगकाँग आणि चीनमध्ये सुद्धा आंदोलन सुरू असताना अशा टूलकिट तयार करण्यात आल्या होत्या.

ग्रेटाविरुद्ध कारवाई करू शकते का दिल्ली पोलिस?
NALSAR युनिव्हर्सिटी ऑफ लॉचे कुलगुरू फैजान मुस्तफा यांच्या मते, या FIR ने ग्रेटाला काहीच फरक पडणार नाही. जो भारतात नाही त्याविरुद्ध एफआयर दाखल करून काहीच साध्य होणार नाही. हा केवळ पोलिसांचा प्रसिद्धीचा फंडा असू शकतो.

कोण आहे ग्रेटा थनबर्ग?

  • ग्रेटा थनबर्ग 3 जानेवारी 2003 रोजी स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये जन्मली. ग्रेटाची आई एक ऑपेरा सिंगर असून तिचे वडील स्वांते थनबर्ग अभिनेता आहेत. ग्रेटाचे आजोबा एस. अरहॅनियस एक संशोधक होते. त्यांनी ग्रीनहाउस इफेक्टवर एक मॉडेल तयार केले. त्यासाठी त्यांना 1903 मध्ये रसायनशास्त्रातील नोबेल मिळाले होते.
  • सध्या 18 वर्षांची असली तरीही ग्रेटाने 11 वर्षांची असतानाच हवामान बदल, पर्यावरण यावर आपली मोहिम सुरू केली. इतक्या कमी वयातच तिने दर शुक्रवारी संसदेच्या बाहेर जलवायू परिवर्तनावर लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्यास सुरुवात केली. तिच्या #FridaysForFuture या मोहिमेत जगभरातील अनेक देश सहभागी झाले.
  • 2019 मध्ये तिने संयुक्त राष्ट्र (UN) सभेत जलवायु परिवर्तनावर दिलेल्या भाषणातून साऱ्या जगाचे लक्ष वेधले. या भाषणातून तिने जगभरातील बलाढ्या देशांच्या नेत्यांवर थेट टीका केली. तिच्या 2019 च्या भाषणावरून टाईम मॅगझीनने तिला पर्सन ऑफ द इयर निवडले होते.
  • पर्यावरण बदल व्यतिरिक्त ग्रेटाला सोशल मीडियावर बिनधास्त मतांसाठी ओळखले जाते. एकदा तर तिने अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात टीका केली. तेव्हा ट्रम्प आणि तिच्यात सोशल मीडियावर चांगलीच जुंपली होती.
बातम्या आणखी आहेत...