आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:ऑनलाइन गैरवर्तनाची भीती : 5 पैकी एक मुलगी सोडतेय सोशल मीडिया; 39% म्हणाल्या- लैंगिक छळामुळे परिणाम झाला

नवी दिल्ली/वॉशिंग्टन7 महिन्यांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक
  • 71 देशांत काम करणाऱ्या संस्थेचे भारतासह 22 देशांमध्ये 14 हजार मुलींवर सर्वेक्षण
  • सामान्य अत्याचारांत अपमानजनक भाषा, शिवीचा समावेश

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म, ज्यावर रोज लोक बराच वेळ असतात. मित्रांशी बोलतात, सुख-दु:खाच्या गोष्टी करतात. मात्र, हा प्लॅटफॉर्म अशी जागा आहे, जेथे महिलांबाबत ऑनलाइन गैरवर्तन व अत्याचार वाढले आहेत. यामुळे मुली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म सोडत आहेत. ७१ देशांत काम करणारी संस्था प्लॅन इंटरनॅशनलच्या सर्वेक्षणात ही बाब समोर आली आहे. संस्थेने हे सर्वेक्षण भारत, अमेरिका व ब्राझीलसह २२ देशांमध्ये केले. यात १५ ते २५ वर्षांच्या १४ हजार मुलींचा समावेश करण्यात आला. सर्व्हेत ५८% पेक्षा जास्त मुलींनी मान्य केले की, त्यांना कोणत्या ना कोणत्या पद्धतीने ऑनलाइन गैरवर्तनाचा सामना करावा लागला. २२% मुलींनी सांगितले की, त्यांना शारीरिक हल्ल्याची भीती होती.

सर्व्हेत सहभागी मुलींनी सांगितले की, सोशल मीडियावर हल्ल्याच्या सामान्य पद्धतीत अपमानजनक भाषा आणि शिवीगाळीचा समावेश आहे. ४१% मुलींनी सांगितले की, हेतुपूर्वक अपमानाने त्यांना प्रभावित केले. तसेच बॉडी शेमिंग व लैंगिक छळाच्या भीतीने ३९% मुलींवर परिणाम झाला. अशाच प्रकारे जातीय अल्पसंख्याकांवर हल्ले, वांशिक गैरवर्तन, एलजीबीटी समूहाशी संबंधित मुलींचे शोषण खूप जास्त होते. अभ्यासात दिसले की, ऑनलाइन शोषणामुळे प्रत्येक पाच मुलींपैकी एकीने सोशल मीडियाचा वापर करणे थांबवले किंवा कमी केले. सोशल मीडियावर लक्ष्य झाल्यानंतर प्रत्येक १० मुलींपैकी एकीने सोशल मीडियावर व्यक्त करण्याच्या पद्धतीत बदल केला.

ऑनलाइन हल्ले मुलींच्या स्वातंत्र्यासाठी धोका

प्लॅन इंटरनॅशनलच्या सीईओ अॅनी-बिर्गिट्टे अल्ब्रेक्टसेन यांनी सांगितले, असे हल्ले शारीरिक नसतात. मात्र, ते नेहमी मुलींच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी धोका असतात. दरम्यान, फेसबुक व इन्स्टाग्रामनुसारी, ते गैरवर्तनाशी संबंधित कृत्यावर लक्ष ठेवतात. त्रास देणाऱ्याची ओळख पटवून कारवाई करतात. ट्विटरनुसार, ते अपमानजनक साहित्याची ओळख करून ते रोखणाऱ्या तंत्राचा वापर करतात.

बातम्या आणखी आहेत...