आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Dvm originals
  • What Is Femicide; Shraddha Murder Case | Bikini Killer Charles Sobhraj | Aftaab Poonawala | Femicide

नवऱ्याने बायकोचे 50 तुकडे करून फेकले:फेमिसाईड आहे समाजाचा भयावह चेहरा; आफताब, निर्भयाच्या खुन्यांची विचारसरणी सारखीच

लेखक: मृत्युंजय कुमारएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

काही दिवसांपूर्वीच श्रद्धाच्या हत्येचे प्रकरण समोर आले होते. यात खूनी आफताबने तिचे 36 तुकडे केले. झारखंडच्या रेबिकाच्या पतीने तिचे 50 तुकडे करत फेकून दिले.

लखनौमध्ये भावाने लहान बहिणीची हत्या करत तिचा मृतदेह घरातच पुरला. या सर्व घटनांत एक गोष्ट समान आहे - पीडित महिला आणि आरोपी पुरूष होता. काहींमध्ये आरोपी नातलग होता तर काहींमध्ये अज्ञात व्यक्ती.

अलिकडेच बिकिनी किलर नावाने कुख्यात चार्ल्स शोभराजही त्याच्या सुटकेमुळे चर्चेत राहिला. त्याने वेगवेगळ्या देशांच्या 24 हून अधिक महिलांची हत्या केली. निर्भयाही याच मानसिकतेची बळी ठरली.

तुमच्या मनात असा प्रश्न आला असेल की एखादा पुरूष एखाद्या महिलेची इतक्या निर्घृणपणे हत्या कशी करू शकतो? महिलेपासून पिच्छा सोडवणे किंवा फक्त फॅन्टसीसाठी एखाद्या महिलेची हत्या करणे योग्य आहे का?

पुरुषांच्या या मानसिकतेसाठी इंग्रजीत एक शब्द आहे - 'फेमिसाईड' फेमिसाईडचा सरळ अर्थ आहे - महिलांची त्यांच्या जेंडर म्हणजेच लिंगामुळे हत्या करणे.

अलिकडेच लॅटिन अमेरिकन देश मेक्सिकोतही हा शब्द चांगलाच चर्चेत आहे. कारण तिथे गेल्या काही महिन्यांत 1000 पेक्षा जास्त महिलांची हत्या झाली. या महिलांचा गुन्हा इतकाच होता की त्या महिला होत्या. बहुतांश प्रकरणांत हत्या करणारे त्या महिलांना ओळखतही नव्हते. फक्त लिंगामुळे त्यांनी त्यांची हत्या केली आहे.

काही उदाहरणांतून समजून घेऊया की हे फेमिसाईड काय आहे

गेल्या महिन्यात अमेरिकेतील एका विद्यापीठात तीन मुलींची झोपेतच गोळी घालून हत्या करण्यात आली. पोलिसांनी हे फेमिसाईडचे प्रकरण असल्याचे म्हटले.

2006 मध्ये अमेरिकेतील एका शाळेत मास शूटिंगची घटना घडली. मात्र हा गोळीबार थोडा वेगळा होता. माथेफिरू हल्लेखोराने फक्त मुली आणि महिला शिक्षकांनाच लक्ष्य केले होते.

1989 मध्ये कॅनडातील एका अभियांत्रिकी महाविद्यालयातील फेमिसाईडची सर्वात चर्चित घटना घडली. मॉन्ट्रिएल नरसंहार नावाने चर्चित या घटनेत स्वतःला अँटी फेमिनिस्ट म्हणणाऱ्या मुलाने गोळ्या झाडून महाविद्यालयातील 14 मुलींची हत्या केली. यात 10 मुली गंभीर जखमी झाल्या.

जगभरातील समाजांत फेमिसाईड वेगवेगळ्या प्रकारे बघायला मिळतो

रोमॅन्टिक किंवा निकट नात्यातील फेमिसाईड - अशा प्रकरणांत महिलेची हत्या तिचा वर्तमान किंवा माजी जोडीदार करतो. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जगभरात महिलांच्या जितक्या हत्या होतात, त्यापैकी 35 टक्के हत्या इंटिमेट पार्टनर म्हणजेच बॉयफ्रेंड, पती किंवा माजी प्रियकर करतो. अशा उदाहरणात अॅसिड फेकून किंवा चाकू-गोळीबार करून प्रेयसी किंवा माजी प्रेयसीची हत्या होते.

ऑनर फेमिसाईड - याचा अर्थ आहे प्रतिष्ठेसाठी महिलेची हत्या. मध्यपूर्व आणि दक्षिण आशियाई देशांत अशा हत्या सामान्य आहेत. यात आंतरजातीय किंवा आंतरधर्मीय विवाह किंवा रोमॅन्टिक संबंधांतून मुलींची हत्या त्यांच्याच कुटुंबातील सदस्याकडून होते.

युनायटेड नेशन पॉप्युलेशन फंडच्या आकड्यांनुसार जगभरात दरवर्षी 5000 हून जास्त मुली ऑनर फेमिसाईडच्या बळी ठरतात.

नॉन इंटिमेट फेमिसाईड - अशा प्रकरणांत महिला व मुलीचे खुनी त्यांच्या ओळखीतील नसतात. ते फक्त जेंडर पाहून हत्या करतात. मेक्सिकोत दरवर्षी सुमारे 1000 हून अधिक महिलांची अशा प्रकारे हत्या होते.

फेमिसाईडसाठी कोणते घटक पुरुषाच्या मनावर परिणाम करतात. हे जाणून घेण्यासाठी आम्ही ह्युमन बिहेविअर एक्सपर्ट बीएस निगम यांच्याशी चर्चा केली.

प्रा. निगम सांगतात...

प्राचीन समाजात ताकदीचा बोलबाला होता. जास्त ताकद असलेला कमजोर असलेल्याची हत्या करून खायचा किंवा त्याचे खाणे हिसकावून घ्यायचा. काही जनावरांत आजही अल्फा मेल ही संकल्पना असते. ज्यात सर्वात ताकदवान नरच अपत्ये जन्माला घालू शकतो आणि सर्वप्रथम जेवण करतो. आपल्या समाजातील काही पुरुष अजूनही जनावरांतील या अल्फा मेल संकल्पनेतून बाहेर पडू शकले नाही. त्यांना वाटते की महिला त्यांच्यासाठी बनवण्यात आल्या आहेत आणि जेव्हा महिला त्यांच्या मनानुसार वागत नाही तेव्हा ते त्यांना मारायलाही मागेपुढे पाहत नाही.

आफताबचेच उदाहरण बघा - त्याला श्रद्धासोबत नाते ठेवायचे नव्हते तर त्याच्याकडे खूप पर्याय होते. तो तिच्यापासून दूर जाऊ शकत होता, पळून जाऊ शकत होता, दुसर्या मुलीसोबत लग्न करू शकत होता किंवा श्रद्धाची माफी मागून वेगळा होऊ शकत होता. मात्र त्याने हे सर्व सोडून श्रद्धाला मारण्याची निवड केली. कारण एखाद्या मुलीची हत्या करणे त्याच्या नजरेत सर्वात योग्य मार्ग होता. हीच आहे फेमिसाईडची विचारसरणी.

थप्पड मारल्यानेही होते फेमिसाईडची सुरुवात

जेंडर इक्वॅलिटी अॅक्टिव्हिस्ट अदिती चौहान सांगतात - कोणताही पुरूष थेट फेमिसाईड करत नाही आणि एकाच दिवसात त्याच्यात हे करण्याचे धाडस येत नाही. आपल्या समाजाची रचनाच अशी आहे की ती काही पुरुषांना यासाठी तयार करते. एक मूल आपल्या घरात आईला मार खाताना पाहते. सुरुवातीला त्याला वाईट वाटू शकते. मात्र एका वेळेनंतर त्याला ही मारहाण सामान्य वाटू लागते. समाजातील अशाच घटना त्याच्या मनात फेमिसाईडचे बीज पेरतात.

भ्रूण हत्याही फेमिसाईड, 40 वर्षांत 1.2 कोटी भ्रूण हत्या

आंतरराष्ट्रीय नियतकालिक द लॅन्सेटमध्ये प्रकाशित एका संशोधनात दावा करण्यात आला आहे की गेल्या 40 वर्षांत देशात सुमारे 1.2 कोटी भ्रूण हत्या झाल्या. सेंटर फॉर ग्लोबल हेल्थ रिसर्चसोबत केलेल्या या संशोधनात 1991 ते 2011 पर्यंतच्या जनगणनेची आकडेवारी राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्व्हेक्षणाच्या आकड्यांसोबत जुळवून हे निष्कर्ष काढण्यात आले.

1.2 कोटी मुली, ज्या या जगात आल्या असत्या. त्यांना लिंगामुळे आधीच मारण्यात आले. ही सर्व फेमिसाईडची प्रकरणे होती. अशा प्रकारे हुंड्यासाठी हत्याही एक प्रकारचे फेमिसाईड आहे.

सेक्स फॅन्टसीसाठी महिलांची हत्या

तुम्ही गंगूबाई काठियावाडी चित्रपट बघितला असेल. चित्रपटात एक सीन आहे, ज्यात एक ग्राहक अचानकच गंगूबाईला मारहाण करायला लागतो. गंगूबाई कशीबशी जीव वाचवून करीम लालाकडे मदत मागायला जाते. हा केवळ फिल्मी सीन नाही.

असे वास्तविक आयुष्यातही होते. अनेक पुरुषांत सेक्स फॅन्टसीसाठी जोडीदाराला मारहाण आणि हत्या करण्याचीही प्रवृत्ती बघायला मिळाली आहे. हेही एक प्रकारचे फेमिसाईड आहे. इंग्रजीत यासाठी लस्ट मर्डर शब्दाचा वापर केला जातो.

असा प्रसिद्ध झाला फेमिसाईड शब्द

फेमिसाईड हा लॅटिन भाषेतील दोन शब्दांतून तयार झाला आहे. फेमिना(महिला)+साईड(हत्या). हा शब्द सु-साईड(आत्महत्या), जिनो-साईड(वंशीय हत्या) या शब्दांशी मिळताजुळता आहे.

तसे लिंगाच्या आधारे महिलांच्या हत्या नेहमीपासूनच होत आल्या आहेत. मात्र या विचारसरणीला सर्वप्रथम इंग्लंडमध्ये फेमिसाईड नाव देण्यात आले. 1848 मध्ये वार्टन लॉ लेक्सकॉनमध्ये पहिल्यांदा या शब्दाचा उल्लेख आढळतो.

1970-80 च्या दशकात युरोप आणि अमेरिकेत फेमिनिस्ट आंदोलनांदरम्यान हा शब्द प्रसिद्ध झाला. सरकार आणि युनायटेड नेशन फेमिसाईडशी संबंधित आकडेवारी गोळा करायला लागले.

मेक्सिकन महिलांसाठी काळ बनला 'फेमिसाईड'

सद्यस्थितीत 'फेमिसाईड'ची सर्वात वाईट घटना लॅटिन अमेरिकन देश मेक्सिकोत बघायला मिळाली. ड्रग्स, क्राईम आणि गँगवॉरसाठी प्रसिद्ध असलेल्या या देशात हत्येचे प्रमाण जास्त आहे. मात्र गेल्या काही वर्षांत इथे महिलांच्या हत्येच्या घटना खूप वाढल्या आहेत.

13 कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या या देशात रोज सुमारे 10 महिलांची त्यांच्या लिंगामुळे हत्या होते.

फेमिसाईडच्या जुन्या प्रथा, ज्या आता बंद झाल्या

अनेक जुन्या संस्कृतींमध्ये वेगवेगळ्या कारणांवरून महिलांच्या हत्येची परंपरा होती. मात्र त्या आता संपल्या आहेत.

अथेन्समध्ये कौमार्य चाचणीत अपयशी ठरल्यास मृत्यूदंड - प्राचीन अथेन्समध्ये अशी परंपरा होती की, लग्नानंतर पती त्याच्या पत्नीची कौमार्य चाचणी करू शकत होता. यात अपयशी ठरल्यावर महिलेला मृत्यूदंड दिला जात होता.

भारतात सती प्रथा, 1821 मध्ये बंदी - भारतात 1821 पर्यंत सती प्रथा होती. यात जिवंत महिला पतीच्या जळत्या चितेवर बसून देहत्याग करायची. यात सहसा घरातील आणि कुटुंबातील लोक महिलेला असे करण्यास प्रवृत्त करायचे. 1821 मध्ये गव्हर्नर जनरल लॉर्ड विल्यम बेंटिक यांनी ही प्रथा बेकायदेशीर ठरवली.

इंग्लंडमध्ये जादूटोण्याच्या संशयातून 50 हजार महिलांची हत्या - इंग्लंडमध्ये इसवी सन 1400 ते 1782 दरम्यान 50 हजारहून अधिक महिलाना जादूटोण्याच्या संशयातून जाळण्यात आले. 1735 मध्ये ब्रिटिश संसदेने विचक्राफ्ट अॅक्ट 1735 आणून असे करण्यास गुन्हा घोषित केले.

देशात कोणतीही जात, पंथ-समुदाय, संप्रदाय कोणताही असा. महिलांसाठी सर्वांच्याच विचारसरणीत एक आकस बघायला मिळतो. जगातील सर्व संस्कृतींचा इतिहास महिलांच्या रक्ताने माखलेला आढळतो. हजारो वर्षांपूर्वी जेव्हा फेमिसाईडसारखा शब्द प्रचलित नव्हता. तेव्हाही महिला मारल्या जात होत्या. महिला आजही मारल्या जात आहेत. प्राण्यांमध्ये आढळणारी अल्फा मेल संकल्पना पुरुषांच्या मेंदूतून बाहेर निघाली नाही तर कदाचित पुढेही मारल्या जातील.

जाता-जाता JNU चे फक्कड कवी रामाशंकर यादव विद्रोहींची ही कविताही वाचा, जी इतिहासात महिलांच्या हत्येवर एखादा व्यक्ती, समाजच नव्हे तर संपूर्ण मानवी सभ्यतेलाच सवाल करते...

मोहनजोदड़ो के तालाब की आख़िरी सीढ़ी है

जिस पर एक औरत की जली हुई लाश पड़ी है

और तालाब में इंसानों की हड्डियाँ बिखरी पड़ी हैं

इसी तरह से एक औरत की जली हुई लाश

बेबीलोनिया में भी मिल जाएगी

और इंसानों की बिखरी हुई हड्डियाँ मेसोपोटामिया में भी

मैं सोचता हूँ और बार बार सोचता हूँ

ताकि याद आ सके-

प्राचीन सभ्यताओं के मुहाने पर

एक औरत की जली हुई लाश मिलती है और

इंसानों की बिखरी हुई हड्डियाँ

इसका सिलसिला सीरिया के चट्टानों से लेकर

बंगाल के मैदानों तक चला जाता है

और जो कान्हा के जंगलों से लेकर

सवाना के वनों तक फैला हुआ है।

एक औरत

जो माँ हो सकती है

बहन हो सकती है

बेटी हो सकती है

बीवी हो सकती है

मैं कहता हूँ हट जाओ मेरे सामने से

मेरा ख़ून जल रहा है,

मेरा कलेजा कलकला रहा है,

मेरी देह सुलग रही है,

मेरी माँ को, मेरी बीवी को,

मेरी बहन को, मेरी बेटी को मारा गया है जलाया गया है

उनकी आत्माएँ आर्तनाद कर रही हैं आसमान में

मैं इस औरत की जली हुई लाश पर सिर पटककर

जान दे देता अगर मेरी एक बेटी न होती तो!

और बेटी है कि कहती है-

पापा तुम बेवज़ह ही हम लड़कियों के बारे में इतने भावुक होते हो

"हम लड़कियाँ तो लकड़ियाँ होती हैं जो बड़ी होने पर

चूल्हे में लगा दी जाती हैं"

ग्राफिक्स: सत्यम परिडा

बातम्या आणखी आहेत...