आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
जेसिका गोर्स
कोरोनाकाळात शाळा बंद आहेत, बाजारपेठांत लोकांचा मर्यादित सहभाग आहे. अशा स्थितीत मुले घराघरात कैद झाली. याचा दुसरा पैलू म्हणजे, मुले थोड्या-थोड्या गोष्टीवरून भांडायला उठतात. या पोरांनी तर वैताग आणलाय, अशा शब्दांत आई-वडील आपला त्रागा व्यक्त करतात. मात्र, मानसशास्त्रज्ञांच्या मते, मुलांच्या भांडणांतून तुमची सुटका होणे नाही. हे तर घराघरातील चित्र आहे. तुम्ही त्यावर नियंत्रण मिळवण्याची अपेक्षा करू शकता. भावा-बहिणीच्या भांडणाबाबत (सिबलिंग रायव्हलरी) अभ्यास करणाऱ्या कॉलेज ऑफ न्यूजर्सीतील मानसशास्त्राचे प्रा. जिनाइन विवोना म्हणाले, भाऊ-भाऊ वा भाऊ-बहिणीतील स्पर्धा जीवनातील वास्तव आहे. आई-वडिलांनी ही स्थिती सर्वोत्कृष्ट पद्धतीने सोडवली पाहिजे. एखाद्या कुटुंबातील भावंडात दर तासाला किमान ८ वेळा भांडणे होऊ शकतात, असे निरीक्षण आहे.
हे करा : मुलांना स्वत: उपाय शोधू द्या, वाद वाढल्यास हस्तक्षेप करा
भांडण का सुरू झाले याचा शोध घ्या
चाइल्ड अँड फॅमिली स्टडीजच्या सहयोगी प्रा. सॅली हंटर म्हणाल्या, भांडणाआधी काय झाले, याचा शोध घेण्याचा प्रयत्न करा. व्हिडिओ गेम खेळताना भांडत असतील तर कोणत्या शब्दामुळे वाद सुरू झाला ते पाहा. शब्दाने शब्द वाढत गेल्यास हस्तक्षेप करा.
सर्व एकत्र असतील, असे क्षण शोधा
मुलांचा मूड आणि व्यक्तिमत्त्व एकसारखे असू शकते किंवा नसूही शकते. दोघांना नृत्य आवडत असेल किंवा एकाला बुद्धिबळ चांगला वाटतो. असे समान क्षण किंवा खेळ शोधा, ज्यात आपुलकीची जाणीव व्हावी.
बोलू द्या, वाद सोडवायला शिकवा
एकदा भांडण सोडवल्यावर त्यांच्याशी आरोप-प्रत्यारोपांविना समस्येवर बोलण्याचा प्रयत्न करा. फिनबर्ग म्हणाले, प्रत्येक मुलास न टाेकता बोलू द्या. त्यांना स्वत:ला उपायापर्यंत येऊ द्या. कालानुरूप ते स्वत: तोडग्यावर येण्यास शिकतील.
कौतुक सर्वांसमोर, रागवा एकट्यात
हंटर म्हणाल्या, मुले परस्परात आपुलकी ठेवत असतील तर तोंडभरून कौतुक करा. वाईट बोलत असतील तर त्यांना एकटे रागवा. कारण, दुसऱ्या मुलास पहिल्यावर अधिकार गाजवायची संधी मिळू शकेल.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.