आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भास्कर इंटरव्ह्यू:ॲलोपॅथी चूक असल्यास बंद करा... अन्यथा रामदेवविरुद्ध गुन्हा नोंदवा : आयएमएचे अध्यक्ष डॉ. जयलाल यांचे प्रत्युत्तर

तिरुवनंतपुरम / के.ए. शाजी18 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

योगगुरू बाबा रामदेव ॲलोपॅथीच्या उपचारावर प्रश्न उपस्थित करत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशनला त्यांनी २५ प्रश्न विचारले आहेत. मात्र, आयएमएचे अध्यक्ष डॉ. जॉनरोज ऑस्टिन जयलाल यांनी डॉक्टर्स रामदेव यांच्यासारख्या व्यक्तीच्या दबावात झुकणार नाहीत, असे स्पष्ट केले आहे. ॲलोपॅथीवर उपस्थित केलेल्या प्रश्नावर डॉ. जयलाल म्हणाले, आयुर्वेदिक डॉक्टरांशीही वादविवाद करण्यास तयार आहे. आपले गृहक्षेत्र कन्यााकुमारीहून भास्करशी फोनवर केलेल्या चर्चेतील काही अंश-

बाबा रामदेव ॲलोपॅथी उपचार पद्धती आणि डॉक्टर्सवर प्रश्न उपस्थित करताहेत...
आपल्या देशात उपचार पद्धतीचे आपले स्वत:चे पूर्ण तंत्र आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, आयसीएमआर, डीसीजीआय आहे. राज्यांची आरोग्य मंत्रालये आहेत. रामदेव यांना ॲलोपॅथीत अडचण असेल तर ते आरोग्य मंत्रालयाशी बोलू शकतात किंवा पंतप्रधानांना अर्ज करू शकतात. सरकारे ॲलोपॅथी उपचारास आयएमएच्या दबावाखाली मान्यता देत नाही. आरोग्य मंत्रालयाला वाटत असेल की, रामदेव यांचे आरोप योग्य आहेत तर ॲलोपॅथीची मान्यता रद्द करावी. डॉक्टरांना उपचार करण्यापासून रोखावे अन्यथा रामदेव यांच्यावर आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत गुन्हा नोंदवावा.

कोविड उपचारात आयुर्वेद वा अन्य पद्धती समाविष्ट कराव्यात, असे वाटते का?
ही मागणी मी कशी करू शकतो. हा सरकारचा विशेषाधिकार आहे. कोविड उपचार प्रोटोकॉल संशोधन व फीडबॅकनंतर बदलला आहे. मी आयुर्वेद किंवा अन्य पद्धतीवर भाष्य करू इच्छित नाही.

रामदेव म्हणतात, की औषध उद्योगाच्या दबावात आयुर्वेद नाकारले जातेय. तुम्ही सहमत आहात का ?
रामदेवबाबा कोण आहेत. मी कोणत्याही आयुर्वेदिक डॉक्टरशी चर्चा करण्यास तयार आहे. रामदेव तर डॉक्टर नाहीत. ते औषध उद्योगाच्या दबावाबाबत बोलत आहेत. तुम्ही स्वत: पाहा देशातील सर्वात मोठी फार्मा इंडस्ट्री कोणती आहे. रामदेव आणि त्यांचा पतंजली ब्रँडच दबाव टाकत आहे. आमच्या यंत्रणेत औषध कंपन्या खूपच कठोर नियमांतर्गत काम करतात. त्याच नियमांतर्गत मंजूर केलेली औषधेच डॉक्टर प्रिस्क्राइब करतात.

कोविडच्या उपचारांत वापरलेल्या अनेक औषधांचे गंभीर साइट इफेक्ट्स दिसले आहेत. ब्लॅक फंगस महामारीचे रूप घेत आहे. ट्रीटमेंट प्रोटोकॉल निश्चित करण्यात चूक झाली आहे का?
साइड इफेक्ट्स तर पतंजली प्रॉडक्ट्सचेही आहेत, हे अनेक अभ्यासांत आणि चाचण्यांत समोर आले आहे. ॲलोपॅथीच्या औषधांचेही साइड इफेक्ट्स आहे. कुठल्याही वैद्यकीय पद्धतीत साइड इफेक्ट्स तर असतातच. वैद्यकीय यंत्रणा ते कमी करण्यासाठी सतत संशोधन आणि चाचण्या करत असते. स्टेरॉइटच्या वापराने ब्लॅक फंगस झाला आहे, असे कोणी म्हटले? मी आधीच म्हटले की, कोविड प्रोटोकॉल निश्चित करण्यात आयएमएची कुठलीच भूमिका नाही. ट्रीटमेंट प्रोटोकॉल त्यांच्या सवलतीच्या हिशेबाने निश्चित व्हावी यासाठी रामदेवबाबा सरकारचे मन का वळवत नाही?

बाबा रामदेव यांचा दावा आहे की, ॲलोपॅथीत २५ लाइफस्टाइल डिसीजवर कुठलाही उपचार नाही. त्यावर आयएमएला पत्रही लिहिले आहे. तुमचे काय उत्तर आहे?
ज्याला वैज्ञानिक आधारच नाही अशा दुर्भाग्यपूर्ण पत्राचे उत्तर आम्ही का द्यावे? या प्रश्नाचे उत्तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेच द्यायला हवे. आधुनिक वैद्यकीय प्रणाली हे सतत विकसित होणार विज्ञान आहे. संशोधन आणि चाचण्यांद्वारे आम्ही सतत अपडेट होत आहोत.

बातम्या आणखी आहेत...