आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
 • Marathi News
 • Dvm originals
 • Corona Food Items Which Keep Oxygen Level In Blood High, Copper, Iron, Vitamin A, Riboflavin Vitamin B2, Niacin Vitamin B3, Vitamin B5, Vitamin B6, Folic Acid, Vitamin B9, Cobalamin Vitamin B12

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कोरोना काळातील महत्त्वाची बातमी:जाणून घ्या रक्तातील ऑक्सिजन वाढवण्यासाठी काय खावे; कोणती प्रथिने शरीराच्या सर्व अवयवांना ऑक्सिजन पोहोचवतात?

24 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक
 • जाणून घेऊया, आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागात रक्तातून ऑक्सिजन कसे पोहोचते...

कोरोनाच्या काळात लोकांना रोगाशी लढण्याची क्षमता वाढवण्यासोबतच रक्तातील ऑक्सिजनची पातळी चांगली राखण्याची काळजी वाटतेय. सर्वप्रथम जाणून घेऊया आपल्या शरीरातील वेगवेगळ्या भागात रक्तातून ऑक्सिजन कसे पोहोचते...

हिमोग्लोबिन (HB) हs आपल्या रक्तातील लाल रक्तपेशी (RBC) मधील एक असे प्रोटीन आहे जे फुफ्फुसांपासून शरीराच्या विविध अवयवांपर्यंत ऑक्सिजन (ओ 2) नेतो आणि तेथून कार्बन डायऑक्साईड (CO2) परत आणतो. या ऑक्सिजनचा उपयोग वेगवेगळ्या अवयवांच्या पेशींमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी केला जातो. आता जर आपल्याला शरीरात चांगल्या प्रमाणात ऑक्सिजन टिकवायचे असेल तर असे अन्न खावे जे आपल्या रक्तात हिमोग्लोबिन वाढवते. डॉक्टरांचे मते, पुरुषांमध्ये सुमारे 13.5 ग्रॅम / डेसी लीटर आणि महिलांमध्ये 12 ग्रॅम / डेसी लीटर हिमोग्लोबिन असणे आवश्यक आहे.

हॉर्वर्ड हेल्थ अँड अमेरिकेच्या फूड अ‍ॅण्ड ड्रग अ‍ॅडमिनिस्ट्रेशनच्या मते, शरीरात हिमोग्लोबिनची योग्य मात्रा राखण्यासाठी तांबे, लोह, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन बी 2 (राइबोफ्लेविन), व्हिटॅमिन बी 3 (नियासिन), व्हिटॅमिन बी 5, व्हिटॅमिन बी 6, फॉलिक अॅसिड आणि व्हिटॅमिन बी 12 घेणे आवश्यक आहे. अशा परिस्थितीत आपल्या रक्तातील या पोषक तत्त्वांचे सेवन केल्यास आपल्या रक्तातील ऑक्सिजनची पातळी वाढेल.

हे सर्व न्युट्रिएंट्स कोणत्या आहारातून मिळतात, हे जाणून घेऊया...

कॉपर

 • मांसाहार - ऑयस्टर, क्रॅब आणि टर्की
 • शाकाहार - चॉकलेट, तीळ, काजू, बटाटा, मशरुम
 1. सुमारे 90 ग्रॅम ऑयस्टरमध्ये आपल्या दैनंदिन गरजेच्या 245% तांबे असते.
 2. आपल्या दैनंदिन गरजेच्या 30% तांबे हे खेकडे आणि टर्कीमध्ये असते.
 3. चॉकलेट, बटाटा, तीळ, काजू, मशरूममध्ये भरपूर प्रमाणात तांबे असते.
 4. सुमारे 30 ग्रॅम चॉकलेट खाल्ल्याने 45% तांब्याची गरज पूर्ण होते.

लोह

 • मांसाहार - ऑयस्टर, चिकन, बदक आणि मटण
 • शाकाहार - बीन्स, हिरव्या भाज्या, डाळी आणि मटार
 1. ऑयस्टर, चिकन, मटण यातून शरीराची लोहची गरज सहज भागते
 2. सुमारे 180 ग्रॅम मांसाहारातून आपल्या रोजच्या लोहाच्या आवश्यकतेपैकी 52% लोह मिळते.
 3. बीन्स, हिरव्या पालेभाज्या, डाळी आणि मटार यातून लोहची गरज भागते.
 4. एक वाटी डाळीतून 100% लोह शरीराला मिळते.

व्हिटॅमिन A

 • मांसाहार - ऑर्गन मीट, मासे आणि अंडी
 • शाकाहार - गाजर, रकाळे, लवकी, आंबे, व्हॅनिला आयस्क्रीम आणि पालक
 1. व्हिटॅमिन ए लोहासारखेच असते. हे ऑर्गन मीट (लिव्हर), मासे आणि अंडी भरपूर प्रमाणात आढळते.
 2. सुमारे 90 ग्रॅम मांसाहारातून आपल्या रोजच्या गरजेच्या 444% व्हिटॅमिन A मिळते.रताळं, गाजर, लवकी, आंबा आणि पालकात बीटा कॅरोटीनच्या रूपात व्हिटॅमिन ए असते.
 3. व्हॅनिला आईस्क्रीम देखील व्हिटॅमिन ए चे एक स्रोत आहे.
 4. अर्धा कप गाजर आपल्या रोजच्या गरजेचे 184% व्हिटॅमिन ए देते.

व्हिटॅमिन B2 (राइबोफ्लेविन)

 • मांसाहार - अंडी आणि ऑर्गन मीट (किडनी-लिव्हर)
 • शाकाहार - दूध, दही, ओट्स, बदाम, बीन्स आणि टोमॅटो
 1. अंडी, ऑर्गन मीट (किडनी आणि लिव्हर) आणि दुधातून भरपूर प्रमाणात राइबोफ्लेविन मिळते.
 2. 90 ग्रॅम लीव्हर मीटपासून दररोजच्या आवश्यकतेच्या 223% राइबोफ्लेविन मिळू शकते.
 3. ओट्स, दही, दूध, बदाम, चीज, ब्रेड, सालयुक्त सफरचंद, बीन्स, सूर्यफूलाचे बी आणि टोमॅटोमध्येही राइबोफ्लेविन मिळते.

व्हिटॅमिन बी 3 (नायसिन)

 • मांसाहार - चिकन आणि टर्की
 • शाकाहार - भात, भाजलेले बटाटे, रोस्टेड लवकीचे बी आणि भूईमुगाच्या शेंगा
 1. 90 ग्रॅम चिकन किंवा टर्की आपल्या रोजच्या गरजेच्या 50% व्हिटॅमिन बी 3 प्रदान करते.
 2. त्याच वेळी, आवश्यकतेपैकी 12-26% एक वाटी भात ही गरज पूर्ण करते.
 3. भाजलेले बटाटे, लवकीचे दाणे, भाजलेले शेंगदाणे यातूनही 8% ते 26% नियासिन मिळते.

व्हिटॅमिन बी 5

 • मांसाहार - ऑर्गन मीट (लिव्हर), चिकन, मासे आणि अंडी
 • शाकाहार - मशरुम, बटाटा, एवाकाडो, भुईमुगाच्या शेंगा, ब्रोकली, ब्राऊन राइस, पनीर
 1. ऑर्गन मीट (लिव्हर), चिकन, फिश, अंडी यासारख्या मांसाहारात व्हिटॅमिन बी 5 मुबलक प्रमाणात आढळते.
 2. 90 ग्रॅम ऑर्गन मीट आपल्या रोजच्या गरजेच्या 166% पर्यंत व्हिटॅमिन बी 5 पुरवतो.
 3. मशरूम, बटाटे, शेंगदाणे, एवोकाडो, ब्रोकोली, ब्राउन राइस, ओट्स, चीज इत्यादींमध्ये 8% ते 52% पर्यंत व्हिटॅमिन बी 5 असते.

व्हिटॅमिन बी 6, बी 9 आणि बी 12

 • मांसाहार - ऑर्गन मीट, चिकन आणि मासे
 • शाकाहार - केळी, पालक, एव्हाकाडो, ब्रसेल्स स्प्राउट्स
 1. व्हिटॅमिन बी 6 आणि बी 9 ऑर्गन मीट (लिव्हर), चिकन, फिश, तसेच केळी, पालक, एवोकाडो, ब्रुसेल्स स्प्राउट्स इत्यादीमधून मिळू शकते.
 2. व्हिटॅमिन बी 12 सामान्यत: शाकाहारात आढळत नाही.
 3. पण विशिष्ट मशरुम म्हणजेच ब्लॅक ट्रम्पेट मशरूम, गोल्डन शानटरेल मशरूम यात बी 12 आढळते.
 4. समुद्री भाज्या ग्रीन लावेर आणि पर्पल लावेरमध्ये भरपूर प्रमाणात बी 12 असते.
बातम्या आणखी आहेत...