आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
कोरोना महामारीत मधुमेहावर नियंत्रणासाठी दिल्ली एम्समध्ये प्रथमच अॅलोपॅथी व आयुर्वेद औषधांचे मिश्रण करून संशोधन करण्यात आले. बीजीआर-३४ आणि ग्लिबेनक्लामीड या दोन्ही औषधांचा एकत्र उपयोग करून तयार केलेल्या नवा औषधामुळे मधुमेह नियंत्रणात येईल, सोबत हृदविकाराशी संबंधित आजारांचा धोकाही कमी होईल. अंतरिम परीक्षणात निष्पन्न झाले की, हे औषध रक्तपेशींत बॅड कोलॅस्टेरॉलही साचू देत नाही. तसेच लठ्ठपणाही कमी होतो. दिल्ली एम्स फार्माकोलाॅजी विभागाच्या संशोधनात म्हटले की, आयुर्वेदिक औषध बीजीआर-३४ व अॅलोपॅथिक औषध ग्लिबेनक्लामीडच्या आधी स्वतंत्र आणि नंतर एकत्रित चाचण्या घेतल्या. दोन्ही चाचण्यांच्या परिणामांची तुलना केली असता एकाच वेळी दोन्ही औषधे घेतल्याने दुप्पट फरक पडल्याचे निष्पन्न झाले. यामुळे इन्सुलिनच्या पातळीत वेगाने वाढ होते. लेप्टिन हाॅर्मोनची पातळीही कमी होऊ लागते. फार्माकोलॉजी विभागाचे सहायक प्रोफेसर डॉ. सुधीरचंद्र सारंगींच्या देखरेखीतील हे संशोधन मार्च २०१९ पासून तीन टप्प्यांत होत आहे. पहिल्या टप्प्यातील प्री-क्लिनिकल ट्रायलच्या (उंदरांवर) अंतरिम परिणामात उपराेक्त निष्कर्ष काढला आहे. तज्ज्ञांनुसार, इन्सुलिनची पातळी वाढल्याने मधुमेह नियंत्रित होऊ लागतो, तर लेप्टिन हार्मोन कमी झाल्याने स्थूलता व चयापचयाशी संबंधित नकारात्मक प्रभाव कमी होतात. तसेच त्याच्या वापराने कोलेस्टेरॉलमध्ये ट्रायग्लिसराइड व व्हीएलडीएलची पातळीही घटत आहे. म्हणजे, मधुमेहाच्या रुग्णात हार्ट अटॅकची शक्यता कमी होऊ लागते. ते एचडीएलची (गुड कोलेस्टेराॅल) पातळी वाढवून धमन्यांत ब्लॉकेज हाेऊ देत नाही.
बीजीआर ३४ ची अँटी डायबेटिक क्षमतेचा माग घेण्यासाठी केले संशोधन
एम्सच्या डॉक्टरांनी हे संशोधन बीजीआर-३४ च्या अँटी डायबेटिक क्षमतेचा माग घेण्यासाठी केले आहे. हे आयुर्वेदिक औषध लखनऊच्या सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिसिनल अँड अॅरोमॅटिक प्लँट्स आणि नॅशनल बॉटेनिकल रिसर्च इन्स्टिट्यूटच्या वैज्ञानिकों शोधले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.