आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Dvm originals
  • For The First Time In Odisha, No One Was Killed In The Cyclone, 4300 Women's Groups Fighting; Shelter For Physical Distance In 7,000 Buildings Overnight

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंफानचा तडाखा:ओडिशात प्रथमच वादळात एकही मृत्यू झाला नाही, 4300 महिला गटांचा लढा; फिजिकल डिस्टन्सिंगसाठी रात्रीतून 7 हजार इमारतींमध्ये केली निवाऱ्याची सोय

भुवनेश्वरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • कोरोनासोबत वादळाशी ओडिशाचे दोन हात...एनडीआरएफ ओडिशा मॉडेलचीच देण

१३ मे रोजी हवामान विभागाने अंफन या चक्रीवादळाचा इशारा दिला. आमच्यासमोर दोन अडचणी होत्या. एक कोविडशी आम्ही लढत होतो, आता वादळ. वादळाच्या काळात वापरली जाणारी २५० निवारागृहे आम्ही क्वॉरंटाइन सेंटर म्हणून घेतली होती. ५६७ निवारेच शिल्लक होते. ही संख्या अपुरी होती. फिजिकल डिस्टन्सिंगही महत्त्वाचे होते. २४ तासांत आम्ही १२ जिल्ह्यांत काही इमारती निवडल्या. १८ मे रोजी लोकांना हलवण्यात यावे अशा सूचना सर्व जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या. पहिल्या रात्री १५ हजार लोकांना हलवले. १९ मे रोजी वादळी वारे नव्हते. त्यामुळे ५-६ हजार लोक परत निघाले. वादळ धडकेल तेव्हा पाहू, असे त्यांचे म्हणणे होते. मात्र, हे धोकादायक होते. त्यामुळे सर्व अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. प्रत्येकाची समजूत काढून परत आणा, असे कळवण्यात आले. १९ मेपर्यंत दुपारी ३ पर्यंत एकूण ३५ हजार लोकांना हलवण्यात आले. रात्री ९ वाजेपर्यंत ही संख्या १ लाखावर गेली.

विशेष म्हणजे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी या लोकांना निवारागृहांत पायीच आणण्यात आले. त्यांच्या वस्तीपासून दीड किमी अंतरात त्यांना ठेवण्यात आले. पेच असा होता की, कोरोनामुळे इतके दिवस आम्ही लोकांना सांगत होतो की, “घरातच राहा, सुरक्षित राहा...’ आणि आता सांगावे लागत होते लवकर घराबाहेर पडा आणि सुरक्षित स्थळी जा. अगोदर लोक तयार नव्हते. त्यांची समजूत काढली. अशा प्रकारे २ लाख लोकांना आम्ही हलवले. साधारण स्थितीत एवढे लोक ४०० छावण्यांत ठेवता येतात. परंतु, कोरोनामुळे ही संख्या ४३१६ करावी लागली. यावर स्थानिक ग्रामपंचायती आणि महिला बचत गटांची खूप मदत झाली. आम्ही गावागावांत बचत गटांना प्रशिक्षण सुरू केले. या गटांना सर्व निवारागृहांत जेवण तयार करणे व प्रत्येकापर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली. असे ४३०० बचत गट आमच्यासोबत होते. या मदत व बचावकार्यात १० हजार लोकांची मदत घेण्यात आली. सोबत अग्निशमन दलाचे ३ हजार, वन विभागाचे दीड हजार, वीज व पाणीपुरवठा विभागाचे साडेतीन ते चार हजार लोक तसेच तत्पर कृती दलाच्या ३६ पथकांतील १ हजार जवान होेते. मी आणि दोन-तीन वरिष्ठ अधिकारी ४८ तास सलग भुवनेश्वरच्या राजीव भवनातील नियंत्रण कक्षात ठाण मांडून होतो. १९-२० मे रोजी रात्री आमचे ३५-४० कर्मचारी तेथे होते. यादरम्यान अंफन वादळाने दिशा बदलल्याची अफवा सोशल मीडियावर पसरली. आम्ही प्रचंड हादरलो. मी तत्काळ भुवनेश्वरच्या हवामान विभागाचे एच. आर. विश्वास, दिल्लीतील महासंचालक मृत्युंजय महापात्रा आणि पारादीपमध्ये डॉप्लर रडार सेंटरच्या अधिकाऱ्यांशी रात्री ३ ते पहाटे ५ दरम्यान चार वेळा संपर्क साधला. आम्हाला यश आले. या वेळी प्रथमच वादळात मनुष्यहानी कमी झाली. एकही मृत्यू झाला नाही.

एनडीआरएफ ओडिशा मॉडेलचीच देण

ओडिशा आपत्ती व्यवस्थापनाचे मॉडेल २० वर्षांत तयार झाले आहे. आपत्ती व्यवस्थापन विभाग व तत्पर कृती दल प्रथमच उभारण्यात आले. या वेळी महिलाही यात सहभागी होत्या. ओडिशाच्या याच धर्तीवर केंद्राने एनडीआरएफ उभारले.

कोरोनासोबत वादळाशी ओडिशाचे दोन हात...

१९९९ मधील वादळात ओडिशात १० हजार जणांचा मृत्यू झाला. तेव्हापासून सलग बदलांचा परिणाम असा झाला की आता अंफानसारख्या वादळाशी राज्य पूर्ण सज्जतेने झुंजले व एकही मृत्यू झाला नाही. प्रथमच ४३०० महिला समूहांनी आपत्ती व्यवस्थानात सहभाग घेतला. व्यवस्थापन व लोकसहभागामुळे वादळावर असा विजय मिळवला.

प्रदीप जेना, विशेष मदत आयुक्त, ओडिशा राज्य

बातम्या आणखी आहेत...