आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

निसर्गाचे व्हेंटिलेटर!:आज वनसंवर्धन दिन : प्राणवायू देणारे 13 हजार चौरस फुटांतील 2 वटवृक्ष

दिनेश लिंबेकर | बीड3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • एक वडाचे झाड देते 712 किलो प्राणवायू

लॉकडाऊनमुळे प्रदूषण घटले, हवेची गुणवत्ता सुधारली. पण कोरोनाच्या धास्तीने तोंडावर मास्क चढला अन् प्रत्येक श्वासाचं महत्त्व कळू लागलं. हजारो वर्षांपासून नैसर्गिक व्हेंटिलेटरसारखा प्राणवायू देणाऱ्या या वृक्षवल्लींच्या संवर्धनासाठी आता तरी माणूस पुढे येईल हीच वृक्षसंवर्धन दिनानिमित्त अपेक्षा...

काळोबाचा डोंगर : बीडपासून ६ किमीवर कोल्हारवाडी शिवारात १०० मीटर उंचीचा काळोबाचा डोंगर आहे. त्यावर १३ हजार चौरस फूट क्षेत्र व्यापलेले हे दोन वटवृक्ष अविरत प्राणवायू देत आहेत. वृक्षसंवर्धन दिनी ‘दिव्य मराठी’ वाचकांसाठी सचिन नलावडे यांनी घेतलेले वरील छायाचित्र.

एक वडाचे झाड देते ७१२ किलो प्राणवायू

वडाच्या पारंब्यांमुळे विस्तार वाढत जातो. वडाचे आयुष्य हजारो वर्षे असते. वटवृक्ष नैसर्गिक व्हेंटिलेटरचे काम करतो. त्याच्यापासून आसपासच्या लोकांना शुद्ध प्राणवायू मिळतो. एक पूर्ण विकसित वडाचे झाड तासाला ७१२ किलो प्राणवायू वातावरणात सोडते, अशी माहिती बीडचे वनपरिक्षेत्र अधिकारी अमोल मुंडे यांनी दिली.

एका झाडाच्या खोडाने व्यापली आठ गुंठे जमीन

काळोबा डोंगराला चारही बाजूंनी दगडी शिळांचा कठडा आहे. या डोंगराच्या आवारात दोन महाकाय वडांची झाडे इतिहासाची साक्ष देत डाैलदारपणे आजही उभी आहेत. शेकडो वर्षांपासून हे वृक्ष येथे आहेत. प्राणवायू देणाऱ्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारी आपल्यावर आहे. या डोंगरावरून बीड शहराचे दर्शन होते असे निसर्गाची देण असलेले हे ठिकाण आहे. -रामनाथ खोड, निसर्ग मित्र, बीड.